दहा एक महिन्यांपूर्वीची गोष्ट. आम्ही फ्रॅंकफर्टहून लुफ्तान्साच्या फ्लाईटने बंगलोरला येत होतो. माझ्या शेजारच्या सीटवर म्युनिकहून आलेली एक जर्मन बाई बसलेली होती. मी तिला सहज विचारलं की तुम्ही भारतात कुठे आणि कशासाठी चाललायत? तर तिने दिलेलं उत्तर ऐकून मला धक्काच बसला. ती पुट्ट्पूर्तीला चाललेली होती. सत्य साईबाबांच्या ८५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जगातील वेगेवेगळ्या भाषांमध्ये त्यांची प्रार्थना गाण्याच्या आंतरराष्ट्रीय समुहातील ती एक होती. तिथे जाऊन महिनाभर राहून ते लोक त्या प्रार्थनांचा सराव करणार होते. म्युनिक मध्येच काय संपूर्ण जगभरात त्यांचे भक्तगण पसरलेले आहेत. मला खूपच आश्चर्य वाटलं. तसं पुट्टपूर्तीला सत्य साईबाबांनी विविध सेवा कार्य काढलेली आहेत, त्यांचे भक्तगण सर्वदूर पसरलेले आहेत असं ऐकीवात होतं आज प्रत्यक्ष पहायला मिळालं.
मी जेव्हा पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनीत शिकवत होते तेव्हाची गोष्ट. एकदा अध्यापक कक्षात एक साडी नेसलेली आणि प्रचंड लांबलचक असं कपाळभर कुंकु लावलेली एक व्यक्ती आलेली पाहीली. सोलापूर ज्ञान प्रबोधिनीची कार्यकर्ती होती. पण एकूण अवतारावरून तर असंच वाटत होतं की कुठल्यातरी आश्रमातून आलेली किंवा चाललेली आहे. मी नंतर चौकशी केली तेव्हा समजलं की ती पुट्टपूर्तीला कायमची रहायला चाललेली होती. मला तेव्हा सुद्धा अधिक आश्चर्य वाटलं होतं.
महाविद्यालयात द्वितीय वर्षाला असताना मी महिन्याच्या सुट्टीत मी इगतपुरीला विपश्यना शिबीरासाठी गेले होते. दहा दिवसाचं शिबीर संपवून आल्यावर वर्तमानपत्रात एक ठळक बातमी पाहिली होती. सत्य साई बाबांवर त्यांच्याच दोन भक्तांनी गोळ्या झाडून प्राणघातक हल्ला केला. गोळ्या झाडणार याची कल्पना आल्यावर बाबांनी तिथून पळ काढला आणि थोडक्यात बचावले. नुकतंच विपश्यना शिबिरात प्रवाचानात ऐकलं होतं की आपल्या मनात प्रेम असेल तर अगदी वाघासारख्या हिंस्त्र पशुच देखील मत परिवर्तन आपण करू शकतो. मग मला प्रश्न पडला की सत्य साई बाबां सारखे चमत्कार करणारे अध्यात्मिक गुरू आणि त्यांचेच शिष्य असलेले ते हल्लेखोर मग बाबांच्या मनातील प्रेमाचा त्यांच्यावर प्रभाव कसा नाही पडला? असो.
या हल्ल्यांच्या घटनेच्याही आधी काही वर्षांपूर्वी इंडीया टुडेच्या मुखपृष्टावर सत्य साईबाबांचा मोठा फोटो आणि ते हातातून घड्याळ काढतायत असा काहीसा फोटो पाहील्याचं आठवतंय. मी त्यावेळी बरीच लहान असल्याने इंग्रजी फारसं समजत नव्हतं पण चित्रं मात्रं खूप इंटरेस्टिंग असायची.
पहिल्यापासूनच माझी देवावर किंवा परामात्मा या स्म्काल्पनेवर श्रद्धा आहे. पण मी अशा हातातून घड्याळे किंवा सोन्याच्या अंगठ्या, साखळ्या, अंगारे काढणार्या बुवांवर कधीच विश्वास ठेवला नाही. प्रत्येक माणसात देवत्व आहे हे सत्य साईबबांचं म्हणणं खरं असलं तरी मला मनापासून अशा एखाद्या व्यक्तीच्या भजनी लागणं कधी जमलंच नाही. मला प्रत्येकवेळी काही मूलभूत प्रश्न पडतात. १) जर सत्य साई बाबा हे शिर्डीच्या साईबाबांचा अवतार आहेत तर मग ते असे चमत्कार दाखवून इतकी सम्पत्ती कशी काय गोळा करू शकतात? कारण शिर्डीच्या साईबाबांनी चमत्कार दाखवले आणि लोकांना त्याचा प्रत्यय आला पण त्यांनी कधीच हातातून भौतिक गोष्टी काढल्यानाहीत. नरेंद्र दाभोळकर किंवा जादूगार रघुवीर यांना सुद्धा हातचलाखी दाखवून हातातून घड्याळ, सोन्याची साखळी, अंगारा, कुंकू काढता येतात. मग हीच त्यांची आध्यात्मिक शक्ती कशी?
२) स्वत:च्या मनातील प्रेमाने त्यांनी त्यांच्यावर हल्ला करणार्या भक्तांच्या मनात प्रेम का नाही भरले? मग त्यांच्यावर हल्ला झालाच कसा?
३) चमत्कारांनी जर इतरांची दुखणी बरी केली तर मग स्वत:चं आजारपण का नाही बरे करू शकले?
सत्य साईबाबांनी नंतरच्या काळात निर्माण केलेली सेवा कार्ये हे एक उल्लेखनीय कार्य नक्कीच आहे. पण मग त्याच बरोबर भोंदू पणा करून लोकांना फसवणे कितपत योग्य आहे? अगदी मोठमोठे राजकीय नेते , मोठमोठे उद्योगपती (की ज्यातील 95% हून अधिक भ्रष्टाचारी आहेत) असे सर्वच जन बाबांचे भक्त. मग या लोकांच्या भ्रष्ट मानसिकतेत का नाही फरक पडत? मग सत्य साई बाबांनी आपल्या हातातून सोन्याच्या साखळ्या काढून देशावरील कर्जाचा बोजा का नाही कमी केला?
माणसाला मानसिक आधार म्हणून परमेश्वर, देव अशा संकल्पना लागतात. परमेश्वर, त्याचं अस्तित्त्व हे मी सुद्धा मान्य करते पण त्या श्रद्धेत डोळसपणा आहे. उगाचच एखाद्याच्या मागे जनता धावतेय म्हणून आपणही धावा असं करू नये. जग जितकं आधुनिक बनत चालंय तितकीच या बुवाबाबांच्या भजनी लागलेल्यांची संख्या भरमसाठ वाढते आहे. सामान्य जनतेचं जाउदेत लोक शास्त्रज्ञ म्हणून काम करतात पण नवस बोलायला शिर्डीला जातात. हा काय प्रकार आहे मला सुद्धा समजलेलं नाही. मग त्या शास्त्रीय ज्ञानाला काय अर्थ? म्हणतात ना दुनिया झुकती है.....झुकाने वाला चाहिये
khare aahe tai ! Mi tar asehi aikle hote ki jadugar K. Lal, p.c. Sorkar ani satya saibaba he ekatrach ekach gurukadun jadu shikle aahet. Lal ani sorkar yanni hi vidya pramanikpane vaparli. Yanni ticha vapar buvabajisathi kela. Satya saichya sarv samajik karyabaddal puresa adar balgunhi ya buvabajiche matra samarthan nahi hovu shakat. Je chuk aahe te chukach aahe. Tithe kshama nahi.
ReplyDelete101 % टक्के पटलं.. सेम टू सेम विचार मनात आले होते..
ReplyDeleteबाबांच्या नादाला लागून बाब्या बिघडतो. सुधारणे तर दूर राहिले..
ReplyDelete1. चमत्कारांनी जर इतरांची दुखणी बरी केली तर मग स्वत:चं आजारपण का नाही बरे करू शकले?
ReplyDelete2. सत्य साईबाबांनी नंतरच्या काळात निर्माण केलेली सेवा कार्ये हे एक उल्लेखनीय कार्य नक्कीच आहे. पण मग त्याच बरोबर भोंदू पणा करून लोकांना फसवणे कितपत योग्य आहे?
असेच मलाही वाटते.
आणि चमत्कारातही दोन व्यवहार - श्रीमंतांना सोन्याची साखळी, अंगठी वगैरे काढून देणार आणि गरिबांना भस्म, विभूती किंवा तत्सम प्रकार.
kuhp chan post aavdali
ReplyDeletemi hi kahi yach dhatnichi post takli aahe aavdate ka bagh :) pan tumachi post tyahun changli jhali aahe :)
अपर्णा ताई...एकदम पटलय.
ReplyDeleteमाझे सजेशन्स:०
ReplyDeleteया बाबा लोकांना बॉर्डर वर उभं करावं, आणि यांना हातातून रॉकेट , गोळ्या वगैरे झाडायला सांगावं. ह्यांना हातातून प्लुटोनियम, युरेनियम वगैरे पदार्थ ज्यांची देशाला गरज आहे ते काढायला सांगावे. या माणसाला जेंव्हा ते टेररिस्ट आले होते, तेंव्हा ताज मधे जाऊन त्यांना पकडायचे काम द्यायला हवे होते. :)
१००% सहमत! सचिन तेंडुलकर त्यांच्या भेटीसाठी कालची मॅच खेळणार नव्हता असं ऐकल्यावर वाईट वाटलं.संस्कारक्षम मुलांना सचिन दोन्ही प्रकारचे संकेत देतोय? ४० करोड ते १ लाख करोड च्या वारशासाठी म्हणे आता लफडी होतील! भोंदूपणा करून कमवायचे आणि समाजकार्य करायचं हे माफियासदृष्य वाटत नाही? काय पटत नाही बॉ! स्पष्टं लिहिल्याबद्दल धन्यवाद!
ReplyDeleteमाझे मत आपल्या सगळ्यांपेक्षा वेगळे आहे. मला वाटते साईबाबांच्या कार्याचा गौरव करणे महत्वाचे आहे. त्यांनी कोणता मार्ग स्वीकारला हे "आता" गौण आहे. त्यांनी जे आपल्यापैकी कोणालाही जमलेले नाही ते करून दाखवले आहे. आता आपल्यासारख्या डोमकावळ्यांनी कावकाव करून काय फायदा आहे ?
ReplyDeleteज्या गोरगरिबांना त्यांनी मोफत शत्रक्रिया करून दिल्या त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना भेटले आहात का आपल्यापैकी कोणी ? त्यांच्या आशीर्वादावर साईबाबा एवढे मोठे झाले आणि एवढे समाज कार्य उभे केले.
लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांचे पण मार्ग वेगवेगळे होते, परंतु दोघेही एकाच कार्यासाठी झटत होते. मार्ग वेगळे होते म्हणून कोणी चांगला आणि दुसरा वाईट नाही. लहान सहन हातचलाखी करून जर २७ लाख करोड रुपयांचे सामाजिक कार्य उभे राहणार असेल तर त्यात काहीच चूक नाही असे माझे मत आहे.
आपल्याकडे म्हणतात मेलेल्या शत्रूबद्दल पण वाईट बोलू नाही आणि साईबाबांनी तर केवढे मोठे शैक्षणिक व वैद्यकीय समाजकार्य केले आहे.
[मी कुठल्याही बाबांचा भक्त नाही ]
Hi Aparna,
ReplyDeleteWe agree on very few things :).. But this is one topic I hundred percent agree. Politicians going to visit him, I can atleast see why. They are in the business of obtaining votes. But I am more surprised at people like Sachin Tendulkar who has shown so much levelheadedness in the cricket field to have fallen into the trap.
After seeing such foolishness sometimes I feel.. 'Bharatacha kaahi hou naahi shakat'.
@Vijay,
ReplyDeleteWhat he has done for the poor is surely exceptional. But the means he has used has destroyed more lives than what he has saved. The problem is that all his sin's are hidden behind the 40 thousand crore worth trust, while only the good things are shown. Same is the case with Melinda Gates foundation, which donates 5% for improving the lives of poor while investing 95% in industries which spoil the lives of the poor in the first place.
I am sure if we analyse Sai-baba trust we will find bigger skeletons.. the only question is who has the guts and the power to do that.
Hi Rahul, actually I am sure we agree on many things but do not agree on few things. Probably we have interacted on those few things only. :-)
ReplyDelete@विजय, एकाचे पैसे लुटुन दुसर्याला मदत करणे यात फार काही मोठं काम आहे यातला भाग नाही. यालच काळ्या पैशाचं पांढरं करणं म्हणतात. उद्या ओसामा बिन लादेनला सुद्धा लोक महात्मा म्हणतील. फुलनदेवीने सुद्धा तेच केलं. मग तिला सुद्धा महान व्यक्ती म्हणणार का? "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले" या उक्तीला काही अर्थच राहीला नाही. उल्हासनगर मधील सर्व काळ्या धंद्यांचा मालक पप्पु कलानी आहे. स्वत:च्या काळ्या पैशाचे पांढरे करण्यासाठी त्याने विविध समाज कार्य उभी केली आहेत. उल्हासनगर म्हणजे पप्पु कलानीचं साम्राज्यच आहे. यामुळेच तो तुरूंगात असूनही आमदार म्हणून निवडुन जातो. याचं सुद्धा तुम्ही समर्थन करणार काय?
ReplyDeleteमी काही सत्य साई बाबांना शिव्या घातलेल्या नाहीत. फक्त काही लॉजीकल प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या समाज कार्याचा चांगला उल्लेखही केलेला आहे. एखाद्या भोंदूबाबाने भोंदूगिरी करून जर लोकांना फसवलं आणि मग समाज कार्याचं मोठं साम्राज्य उभं केलं त्याचं समर्थन होउच शकत नाही. आपल्याला जर समाजात अंधश्रद्धाच पसरवायची असेल तर मग शाळेत मुलांना विज्ञान शिकवायचं कशाला? यातून वैज्ञानिक दृष्टीकोन कसा तयार होणार? सामाजिक कार्य करण्यासाठी उद्युक्त व्हायला अनेक आदर्श आहेत. त्यासाठी भोंदूगिरी करून मग समाज कार्य करा असला आदर्श नको आहे. म्हणूनच स्पष्टपणे मनातले विचार मांडणे गरजेचे वाटले.
Please read the two blog articles pasted below: they are based on Satya Sai Baba's scams.
ReplyDeletehttp://jayantpune.wordpress.com/2010/05/13/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80/
http://jayantpune.wordpress.com/2010/05/13/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80-2/
सहमत !
ReplyDeleteअज्ञानी जीवातील अज्ञान लक्षणे सांगताना संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात
ReplyDelete" तया गुरुमार्गा टेके । जयाचा सुगरवा देखे । तरी त्याचा मंत्र शिके । येरु नेघे ।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ / ओवी ८१२ ।।
ज्या गुरुचा जास्त थाटमाट पाहतो, त्या गुरूच्या संप्रदायावर विश्वास ठेवतो आणि त्याचा मंत्र घेतो, दुसर्याचा (मंत्र) घेत नाही