लॅरी डेली, की जो दोन वर्षांपूर्वीपर्यंत अमेरिकन नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी मध्ये सिक्युरिटी गार्ड असतो, आज डेली सर्विसेस या डायरेक्ट रिस्पॉन्स टेलिव्हिजन कंपनीचा सर्वेसर्वा झालेला असतो. या कंपनी मार्फत लॅरी त्याच्या सिक्युरीटी गार्ड असतानाच्या अनुभवांवर आधारित नाविन्यपूर्ण अशा गोष्टी बनवून विकत असे. दोन वर्षांत एक यशस्वी उद्योजक म्हणून नाव कमावण्यात आणि भरपूर पैसे कमावण्याच्या नादात, लॅरीला म्युझियम मध्ये जायला वेळच मिळालेला नसतो. एका लाईव्ह शोमध्ये त्याच्या म्युझियममधील सिक्युरिटी गार्डच्या नोकरीचा उल्लेख होतो आणि म्युझियमची तीव्रतेने आठवण झाल्याने तो तातडीने म्युझियमला भेट द्यायला जातो. म्युझियममध्ये सिक्युरीटी गार्ड म्हणून काम करत असताना लॅरीची तिथल्या सगळ्या एक्झीबीट्सशी दोस्ती झालेली असते. तिथे गेल्यावर त्याला समजतं की म्युझियम डागडुजी आणि नाविन्यपूर्ण बदलांसाठी बंद होतं आहे आणि तिथल्या प्रदर्शनात मांडलेले लहान मोठे तसेच पूर्वीच्या विविध जातीजमातींचे पुतळे, प्राणी यांना वॉशिंग्टन येथील स्मिथोनियन इन्स्टीट्युट मध्ये हलवणार आहेत. संग्रहालयात नाविन्य आणण्यासाठी यातील बर्याच पुतळ्यांची जागा इंटरअॅक्टीव्ह हॉलोग्राम घेणार असल्याने अशा पुतळ्यांचं अस्तित्त्वच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे हेसुद्धा त्याला समजतं. यासगळ्यांत इजीप्शीअन राज्यांतील फाराओह अखमेनरहाची एक सोन्याची टॅबलेट असते की जिच्यामधील जादूई शक्तीमुळे सूर्यास्तानंतर सर्व पुतळे जिवंत होऊन सकाळी सूर्योदयापर्यंत म्युझियम मध्येच जीवंतपणे वावरत असत. ती टॅबलेट आधीच्याच म्युझियममध्ये राहणार असल्याने जे पुतळे वॉशिंग्टनमधील संस्थेत हलवले जाणार ते कधीच पुन्हा जीवंत होऊ शकणार नाहीत याची त्यासगळ्यांना मोठी खंत असते. दुसर्या दिवशी जेव्हा हे सगळे पुतळे वॉशिंग्टनच्या स्मिथसोनिअन संस्थेत हलवले गेल्यावर लॅरीला त्यातील जेडेडीहचा फोन येतो की डेक्स्टरने अखमेनरहाची टॅबलेट चोरून आणली आणि अतिशय क्रूर म्हणून कुप्रसिद्ध असलेला फाराओह कहमुनराह (अखमेनरहाचा मोठा भाऊ) पुतळ्यांवर चाल करून आला आहे. काळजीपोटी लॅरी वॉशिंगटनला जातो आणि त्यासगळ्या पुतळ्यांना ज्या तळघरात ठेवलेलं असतं तिथे पोहोचतो. लॅरीच्या हातात टॅबलेट आल्यावर नेमका सूर्यास्त होतो आणि टॅबलेटच्या पॉवर मुळे त्याठीकाणी असलेले सगळे पुतळे जिवंत होतात. त्यातच नेपोलिअन, इव्हान टेरीबल आणि इतर दुष्टप्रवृत्तीच्या नेत्यांना सोन्याच्या टॅबलेट्च्या मदतीने जग जिंकण्याचं अमिष दाखवून फाराओह कहमुनराह लॅरीवर हल्ला करतो आणि टॅबलेट हस्तगत करतो. टॅबलेटचा आधीचा कोड वर्ड बदलेला असल्याने कहमुनराहला टॅबलेटचा उपयोग त्याची अंडवर्ल्डची सेना बाहेर काढंयासाठी होत नाही. त्यामुळे जेडेडीहला ओलीस ठेऊन लॅरीला त्याचा नवा कोडवर्ड शोधून काढण्यास सांगतो. हा कोड शोधत असताना लॅरीला एमिली एअरहार्ट, अब्राहम लिंकन, आईनस्टाईन्स, नील आर्मस्ट्रॉंग यांसारखे अनेक प्रसिद्ध व्यक्तीमत्त्व भेटतात आणि त्याला नवा कोड वर्ड शोधायला मदत करतात. एमिली एअरहार्ट लॅरीच्या मनातील मूलभूत गोंधळ नेमका पकडते आणि आपल्याला जे आवडतं, आपल्याला जे पॅशनेटली करावंसं वाटतं तेच करावं हा मंत्र नकळत देऊन जाते. नवा कोडवर्ड म्हणजे पाय या ग्रीक अक्षराची गणिती किंमत असते. जेडेडीहला वाचवण्यासाठी लॅरी ती सोन्याची टॅबलेट नव्या कोड वर्ड सकट फाराओह कहमुनराहकडे सूपूर्द करतो. फाराओह कहमुनराह आधी कबूल केल्याप्रमाणे जेडेडीहला न सोडता लॅरीलाच पकडतो. अंडरवर्ल्डची आर्मी आल्यावर नक्की काय होतं? लॅरी त्याच्या पुतळ्यांना वाचवण्यात यशस्वी होतो का? लॅरी त्याच्या पॅशनचं काम करण्यात यशस्वि होतो का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी नाईट इन द म्युझियम (भाग २) हा चित्रपट जरूर पहा. चित्रपटाच्या सुरूवातीपासून असं कुठेही जाणवत नाही की ह्या चित्रपट कथानकाचा पहिला भाग आधीच प्रदर्शित झाला आहे. फक्त या भागात मला एक दोन प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत की जी पहिल्या भागात असतील. पहिला म्हणजे त्या टॅबलेटचा जुना कोड वर्ड कसा बदलला? आणि अखमेनरहाची कथा की जी त्या टॅबलेटची पार्श्वभूमीपण सांगत असणार. त्यामुळे पूर्ण चित्रपट पाहील्यावर पहिला भागही किती मजेशीर असेल आणि त्या दोन प्रश्नांची उत्तरं काय असतील याची उत्सुकता लागून रहाते. नाईट इन द म्युझियम या चित्रपटाचे दोनही भाग अमेरिकन चित्रपट क्षेत्रातील साहसी विनोदी (अॅडव्हेन्चर कॉमेडी) यासदरात मोडतात. आपल्याला जे मनापासून करायला आवडतं तेच करावं म्हणजेच इंग्रजीत फॉलो युवर हार्ट) त्याचप्रमाणे गोष्टी जुन्या झाल्या तरी त्यांचा योग्यअसा उपयोग आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कसा करता येऊ शकतो हे दोन संदेश देणारा हलका फुलका चित्रपट पाहताना जाम मजा येते.
रात्रीचे जेवण झाल्यावर विचार करत शतपावली घालायला मला नेहमीच आवडते. त्याच शतपावलीला स्मरून ही **शतपावली**
Showing posts with label विनोदी. Show all posts
Showing posts with label विनोदी. Show all posts
Saturday, 11 December 2010
Monday, 3 May 2010
लॅरी पेज येती अत्यानंदबाबा मठा..........
[गुगलने बझ्झ सेवा चालू केल्या पासून आपल्या अत्यानंदबाबांनी त्यांचा बझ्झ आपला मठ उघडला. त्या मठात सगळ्यांना प्रवेश. त्यामुळे हळूहळू भक्त गण जमत गेले. त्याच मठात मी पण जायला सुरूवात केली. रोज काकडारती आणि शेजारती चुकवतच नाही. त्यामुळे काकडारती नंतर बुवांना (आणि उपस्थित भक्त गणांना) स्पेशल फिल्टर कॉफी पण मी द्यायला सुरूवात केली. तर काल माझ्या स्वप्नात अत्यानंदबाबा बझ्झ आपलं मठात गुगलचे खुद्द लॅरी पेज आले आणि मठात ..........लॅरी पेज ने येतानाच बहुधा डायरेक्ट ट्रान्स्लेशन इंग्रजी ते मराठी असं सॉफ्ट्वेअर मॅनेज केलेलं होतं त्यामुळे संभाषण मराठीच आहे. कदाचित त्यांना भाषांतर सोपं असेल पण संस्कृती ट्रान्सफॉरमेशन काही जमलेलं दिसत नाहीये म्हणून बरेच प्रश्न त्यांना पडलेत.]
{ताजा कलम: हे पोस्ट पूर्ण वाचल्यावर आपल्याला काहीही समजलं नाही आणि जर डोक्यात खूप गोंधळ निर्माण झाला तर त्याला लेखिका जबाबदार नाही. }
देका: नमस्कार मंडळी या गप्पा मारायला.
अल: नमस्कार बुवा ही घ्या फिल्टर कॉफी (_)० (_)०
लॅरी: हाय फोक्स, मी लॅरी पेज. धन्स फॉर कॉफी. अगदी गरज होती मला.
अल: ओह लॅरी, आज इकडे कसे काय तुम्ही?
लॅरी: काय आहे की आम्ही बझ्झ चालू केल्यावर आमच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे बझ्झ ची प्रसिध्दी चेक करण्यासाठी आमच्या मेन ऑफीसच्या (अमेरीकेत) एका रूम मध्ये आम्ही सर्व भिंतींवर मोठा वर्ल्ड मॅप लावला आहे. त्या मॅपला दिवे जोडले आहेत. जस जसा बझ्झ वापरला जाईल तसतसे दिवे लागत जातात. आणि आम्हाला ऑन द फ्लाय कोण कोठून बझ्झ वापरतंय हे समजतं.
कांक, आप, हेओ: पण मग आज तुम्ही इथे कसे काय?
लॉरी: तर त्या मॅप वर गेले बरेच दिवस आम्हाला सारखे दिवे लुकलुकताना दि्सायला लागले. कुठुन कुठुन दिवे लागायचे. पहिला दिवा मुंबईच्या पश्चिमेला लागायचा. मग एकदम दोन साऊथ मध्ये. त्यानंतर अमेरिकेत, पुन्हा मधुनच मुंबई, पुणे आणि जास्तीत जास्त महाराष्ट्र, कर्नाटक, हैद्राबाद, अमेरिका, नॉर्वे, इटली असे वेगवेगळ्या ठिकाणांहून दिवे लुकलुकायला लागले. सुरूवातीला आम्ही दुर्लक्ष केलं. पण नंतर आम्हाला अल-कायदा च्या दहशतवादी कट शिजण्याची शंका यायला लागली.
आप: एकदम अल-कायदा?
लॅरी: हो, कारण तुमच्या बझ्झ मध्ये बर्याच वेळा अल, अल असं दिसायला लागलं. मग आम्ही आमचे अननोन आयडेंटीटी वाले काही कर्मचारी तुमच्यातील बर्याच जणांच्या बझ्झ वर सोडले.
कांक: ओह म्हणजे ते करमचंद तुमचे आहेत तर.
अल: हो ना, मी तर रोज सकाळी त्यांना घालवून द्यायची पण ते आपले पुन्हा दुसर्या दिवशी हजर असायचे.
लॅरी: आम्ही त्यांना तशी सक्त ताकीदच दिली होती. अल-कायदा चा प्रश्न होता ना.
आप, आका, सपा, विपि, कांक, देका: हंम, आमच्या अल-चा प्रश्न आला का!
देका: पण नंतर नंतर तर त्यांना कितीही घालवून देण्याचा प्रयत्न केला तरी ते जात नव्ह्ते की नाही अल?
अल: हो ना.
आप, विपि: मग आम्हीच अल ला सांगीतलं की दुर्लक्ष कर म्हणून आणि काही पर्सनल लिहू नको.
लॅरी: बरोबरे कसे जातील? आम्ही त्यांना तुमच्या बझ्झ मध्ये डीफॉल्ट सेटींग करून दिले ना. मग त्यांनी तुमच्या बझ्झ चा माग काढायला सुरूवात केली.
श्रेर: इथे सुध्दा आपला मूळ स्वभाव सोडू नका.
लॅरी: आपण काही म्हणालात? तर आमच्या अननोन आयडेंटीटींना काही समजेचना काय चाललेले असायचे. कधीपण कोणी येउन "मी दात घासायला चाललोय, थोड्यावेळाने येइन." "मी आत्ताच आलोय ऑफीस मधून आता सितारात खादाडी करायला जातोय". मधुनच शॉर्ट फॉर्म्स सुसं, सुप्र, शुरा, शुत्री, सुरा. आमचं ग्रामरचं सॉफ्टवेअर पूर्णपणे फाफललं. हा शब्द सुध्दा आम्ही इथेच शिकलोय.
सोबा: लॉरीबाबा आपलं साहेब मी तुम्हाला याचा एक मन तयार करून देवू का म्हणजे तुमचा घोळ होणार नाही.
लॅरी: आता हे मन काय? तुमच्या कडे काही ग्रामरचे नियम वगैरे पाळतच नाहीत. किती ती होमोनिम्स?
देका: होमोनिम्स म्हणजे काय?
लॅरी: आहो म्हणजे एकच उच्चार असलेले पण वेगवेगळे अर्थ असलेले शब्द. उदा: सुरा हा शब्द. आमच्या सॉफ्टवेअर मध्ये सुरा चे तीन अर्थ आहेत. पण ते कुठलेच तुमच्या बझ्झ मधील सुरा ला जुळत नाहीत. आता आम्हाला एकच मन माहीत आहे आणि ते तयार करता येत नाही. पण हे काय मन तयार करून देतो?
रको: अरे व्वा, इथे रोज काही तरी नविन शिकायला मिळतं. म्हणजे आलंच पाहेजे रोज.
लॅरी: काय हे दिलीपजी तुम्ही तरी काही कंट्रोल करा. तुम्ही मराठीचे प्राध्यापक आहात ना.
दिबी: काय आहे लॉरी साहेब, आमच्या कॉलेज मधल्या मुलांना मराठीचं ग्रामर शिकवुन मी थकलोय. काहीच उपयोग नाही हो. सगळेच बिर्याणी आणि भेळ भाषा वापरतात. इथे सगळे नविन नियम तयार करायला मुभा दिली आहे.
रोचौ, तंबोरबुवा: काय बिर्याणी आणि भेळ कोण देतंय? चला पटापटा पोस्टा.
विपि: मी पण आहे इथं.
देका: हा लॅर्या सगळ्यांना ओळखतोय की.
लॅरी: बस का आता, उगाच का आम्ही करमचंद गीरी केली इतके दिवस. आम्हाला माहीती आहे तुमचं इतिहास प्रेम रोचौ आणि विपि.
रोचौ: माझ्या त्या दिवशीच्या पोस्ट ची कॉफीत पटापट पेस्ट टाकायची का?
लॅरी: आता हेच बघाना हे लोक काय बोलतील याचा नेम नाही. खादाडी हा शब्द तर इथे जादूच करतो. खादाडी काढायचा अवकाश की इथलं वातावरणच बदलतं. आता चार दिवसा पूर्वीची गोष्ट. काय खाल्लं कोण जाणे सगळेच सुटले होते. आणि कोण नविन लोक त्यांना प्रत्येक वेळी नविन पदार्थ घेऊन जॉईन होत होते समजतच नव्हतं. म्हणे "नावात काय असतं हे महाभारतात अत्यानंदबाबांनी म्हंटलंय". तुम्हाला सांगतो दिलीपजी, या लोकांनी आमच्या शेक्सपीअरने ते वाक्य काय संदर्भात म्हंटलंय ते काहीच लक्षात न घेता त्याची पार वाट लावली.
श्रेर: आता आम्ही तुला वाटेला लावू का?
लॅरी: तुम्ही मघाशी सुध्दा काहीतरी पुटपुटत होतात. जाऊ देत. तर आम्ही आमच्या अननोन आयडेंटीटींना सांगेतलं होतं की तुमचा बझ्झ ४०० च्या वर जाऊ द्यायचा नाही. तसं त्यांनी इमाने इतबारे २-३ आठवडे केलं पण नंतर ते पण रमले हो इतके की त्यांना डायरेक्ट ४९२-४९३ लाच जाग यायची. मग मीच सगळं हातात घ्यायचं ठरवलं.
तंबोरबुवा: मग काही फरक पडला का? आमचा खरड फलक हालताच राहीला ना.
लॅरी: तेच तर सांगतोय ना मी. आहो तुम्ही तो २०१२ पाहीलाय का जगबुडीचा सिनेमा. त्यात तो मुख्य लामा त्याच्या शिष्याला सांगतो नं की आधीच एखादं भांडं भरलेलं असेल तर ते रिकामं झाल्या शिवाय त्यात नविन कसं जाईल?
हेओ: काय बोअर आणि फाल्तू सिनेमा
आप: हो ना. सगळंच अॅनिमेशन आणि किती बॉलीवुड चा फिल्मीपणा? ह्या लॅर्याने तरी काय बोअर लावलंय.
अल: पण मला त्याने विचार करायला लावला.
आप: त्या हाउस फुल्ल ने मला सुध्दा विचार करायला लावला की हा सिनेमा मी का पाहीला? :-)
लॅरी: तर मी इकडे तातडीने येण्याचं कारण थोडं वेगळं आहे.
हेओ, आहो मग सांगा की ते पटापट. कशाला उगीच पाल्हाळ लावलंय. इथे ऑफीस मध्ये आम्हाला काम असतं. नाहीतर इथे उद्या पासून साहेब माझ्या मागे करमचंद लावतील.
लॅरी: तर ते बझ्झ मीच हातात घेतलं तर मी सुध्दा हारलो. काय एकेक चविष्ट पदार्थांचे फोटो आणि काय त्या कधीही न ऐकलेल्या न पाहीलेल्या रेसीपीज.
आणि आता परवा पासून तर दिवसातून दोन दोन बझ्झ काढायची वेळ येते आहे. गप्पांना काही तोटा नाही.
मग आपण मानलं बुवा आपल्या या बझ्झ ला.
आप: (म्हणजे आता हा खलनायकाचा चरित्र नायक होतोय तर काही हरकत नाही)
लॅरी: म्हणून तर आपण स्वत: प्रत्यक्षच तुमचं अभिनंदन करायला आलो.
देका, रको: टाळ्या
श्रेर: आता अभिनंदन कशाचं?
तंबोरबुवा: आगं आज्जे जरा थांब की लॅरीबाबा आपलं साहेब काय सांगतायत ते ऐक ना.
लॅरी: तर मि देव, तुमच्या अत्यानंदबाबा बझ्झ चं आपलं कट्टयाचं आपलं मठाचं नाव आम्ही गिनीज बुकात नोंदवायचं ठरवलंय.
सोबा: मंडळी एका ट्रेनिंगला जायचय .. रात्रौ भेटू !!
शुत्री !!
लॉरी: आत्ता रात्रच आहे नं?आहो सोबा जरा क्लायमॅक्स तर ऐकून जा.
सोबा: नाही ओ साहेब, मी क्लायमॅक्स प्लेबॅक करून ऐकेल.
लॉरी: हो गिनीज बुकात कारण तुमच्या एवढा अवघ्या भूमंडळात या बझ्झ चा वापर कोणी केला नाही आणि भविष्यात एक आव्हान लोकांना असू द्यावे म्हणून आम्ही हा निर्णय एक मताने घेतला आहे.
देका: अरे वा...वाजवा रे वाजवा!
सगळेच: अरे वा...वाजवा रे वाजवा!
लॅरी: तसेच तुम्हाला अजुन ५०० खरडी एक्स्ट्रा मिळतील जेव्हा तुम्ही एका बझ्झ च्या ५०० खरडी पूर्ण कराल तेव्हाच.
देका: अरे वा..बोनस? की सानुग्रह अनुदान...काय म्हणायचं हे.
अल: देका, बहुधा ते सअट अनुदान आहे.
लॅरी: हो आणि अजुन एक. देका स्पेशल. मि देव तुम्हाला आम्ही एक खास सर्व्हर स्पेस देतो आहोत बझ्झ वर तुमच्या आवाजातील गाणी अप्लोड करायला. तसेच केवळ तुमच्या बझ्झ ला स्मायली टाकायची फॅसीलीटी पण देत आहोत.
अत्यानंदबाबा आणि भक्तमंडळी: झकाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ ऽऽस.
बोले तो एकदम झऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽकाऽऽऽ ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽस.

अत्यानंदबाबा आणि भक्तमंडळी: झकाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ
बोले तो एकदम झऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽकाऽऽऽ
Monday, 19 April 2010
कालापव्यय - एक साक्षात्कार!!
मला काहीच सुचत नव्हतं. तेव्हड्यात शेजारच्या रूमचा दरवाजा उघडल्याचा आवाज झाला, ममता (माझी शेजारीण की जी फिजीक्स च्या कॅव्हेंडीश लॅब मध्ये पी एच डी करत होती) रूम वर आल्याचं लक्षात आलं. सध्या हिवाळ्यात सगळं लवकर बंद होत असल्याने ती सुध्दा संध्याकाळी चारच्या सुमारास परत येत असे. माझ्या जीवाची अजुनच घालमेल चालू झाली. अस्वस्थता दूर करण्यासाठी कोणाशी तरी बोलणं आवश्यक होतं. मैत्रिणींना फोन करायचा तर श्रीलक्ष्मी आणि मानसी दोघीही डिपार्ट्मेंट्मध्ये जाणार होत्या आणि उशीरा येणार होत्या त्यामुळे त्या कॉलेज मध्ये असण्याची शक्यता नव्हती. भारतातून कोणी चुकून ऑनलाईन असेल तर त्यांच्याशी बोलता येईल म्हणून मी चटकन लॅपटॉप चालू केला. सुदैवाने प्रिया ऑनलाईन दिसली. शक्यतो ती ऑफीस मध्ये असताना ऑनलाईनच असते म्हणजे साधारण पणे दुपारच्या वेळी. पण आज ही येवढ्या रात्री ऑनलाईन कशी हाच पहिला प्रश्न मी तिला विचारला. तर ती म्हणाली अगं मी ऑफीस मध्येच आहे आणि रात्र नाही तर दुपारचे पावणे दोन झालेत. मी लॅपटॉपच्या घड्याळात बघीतलं तर खरंच तो दुपारचे पावणे दोन दाखवत होता. (रूमच्या समोरच मोठ्ठं वॉल क्लॉक असल्याने मी लॅपटॉप मध्ये मी जाणूनबुजून भारतीय वेळ ठेवलेली होती) मी लगेचच खिडकीतून बाहेर पुन्हा घड्याळात पाहिलं तर सव्वा आठ वाजलेले दिसले आणि माझा जीव भांड्यात पडला. मग पाच मिनीटं प्रियाशी गप्पा मारून लॅपटॉप बंद केला आणि उत्साहाने आवरायला सुरूवात केली. मला दुप्पट उत्साह आला होता कारण माझ्या आयुष्यातील एक दिवस मला परत मिळाला होता. अत्यंत महत्वाचा दिवस!
तर झालं असं की युके, तसेच युरोपात हिवाळा चालू झाला की (तिथल्या हवामान आणि वातावरणामुळे) ऑक्टोबर पासूनच सगळी घड्याळे एक तास अलिकडे घेतात. हिवाळा असल्याने सूर्यप्रकाश अत्यंत कमी आणि खूप थंडी यामुळे बाहेरचं वातावरण सकाळी ७.०० वाजता सुध्दा संध्याकाळ सारखं, तसेच अतिशय डिप्रेस्ड वातावरण. सकाळचा फ्रेशनेस त्या वातावरणात नसे. मी जेव्हा अर्धवट झोपेतून उठताना चार टोले ऐकले होते ते शेवटचे चार होते. घड्याळात आठ वाजले होते पण अर्धवट झोपेत असल्याने तसेच ढगाळ, अंधारलेले वातावरण असल्याने मला ते काटे उलटया दिशेने दिसले म्हणजेच चार वाजलेले दिसले. आणि माझा गैरसमज झाला.
मला माझ्या आयुष्यातील एक मोठ्ठा साक्षात्कार झाला होता.........होय साक्षात्कारच! कारण आज पर्यंत मी खूप वेळा "टाईम इज मनी", "वेळेला खूप महत्व" "वेळेचा अपव्यय करू नये, गेलेला क्षण परत येत नसतो" इत्यादी वाचले --- ऐकले होते. पण मला आज प्रत्यक्षात त्याचे रिअलायझेशन झाले. मी वेळेची आपल्या आयुष्यातली किंमत प्रत्यक्ष अनुभवली होती. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आपल्याचसाठी कसा महत्वाचा असतो त्याची प्रचितीच घेतली. हे आपल्याला जो पर्यंत आपण त्या लॉस मधून जात नाही तो पर्यंत कळत नाही.हातात एखादी गोष्ट असे पर्यंत आपल्याला त्याची किंमत नसते ती हातातून निसटल्यावर कळते. परमेश्वराचे आभारच की मला फक्त डेमोच पहायला मिळाला.
Subscribe to:
Posts (Atom)