आजच अमेरिकन आणि नाटो फौजांनी लिबीयावर "मानवी हक्क संरक्षणाचे" कारण दाखवून हल्ले चालू केलेत. पण Prof Michel Chossudovsky प्रमाणे मलाही असंच वाटतंय की हे "ऑपरेशन लिबीया" नसून "ऑपरेशन ऑईल" आहे. असं वाटण्यासाठी भरपूर पुरावे उपल्ब्ध आहेत. अमेरिकादी पाश्चिमात्य देशांनी नेहमीप्रमाणेच (जसं ९० च्या दशकात युगोस्लाव्हियात केलं तसं) जगाच्या डोळ्यात धूळफेक करून लिबीयात गडाफी विरोधकांना सर्व प्रकारची मदत देऊ केली आणि त्याला आंतर्गत बंडखोरीचे स्वरूप देऊन, आता "मानवी हक्क संरक्षणाच्या" नावाखाली लिबियाचा (परिणामी लिबीयामधील तेल स्त्रोतांचा) घास घ्यायला सुरूवात केली आहे.
लिबीयाच्या सध्याच्या आक्रमणाचं विश्लेषण बघण्याआधी थोडी पार्श्चभूमी बघूयात. खालील पाय चार्ट मध्ये सर्व जगातील तेल साठ्यांचे टक्केवारीत प्रमाण दिलेले आहे.
मध्य पूर्वेतील तेलसाठ्यांचं प्रमाण सर्वात अधिक म्हणजे ५६% आहे. त्या खालोखाल अफ्रिकन देशांमध्ये आहेत. एकूणच मुस्लीम देशांमध्ये (साउदी अरेबिया, इराक, इराण, कुवेत, युएई, कतार,
येमेन, लिबीया, इजिप्त, नायजेरिया, अल्जेरिया, कझाकस्तान, अझरबाइजान,
मलेशिया, इंडोनेशिया, ब्रुनेई इ.) जागतिक साठ्यांच्या तुलनेत सगळ्यात जास्त
म्हणजे ६६.२ ते ७५.९% तेलाचे साठे आहेत. याआधी वेगवेगळ्या कारणांनी
अमेरिकादी राष्ट्रांनी ७०% मुस्लीम देशांतील तेलसाठ्यांवर नियंत्रण ठेवलं
आहे. आता उरलेत अफ्रिकेतील देश. या देशांमध्ये तेल साठ्यांबरोबरच नैसर्गिक वायू आणि युरेनिअम यांचे साठे सुद्धा प्रचंड प्रमाणात आहेत. खालील तक्ता अफ्रिकेतील तेल साठ्यांच्या प्रमाणाची माहीती देतो.
आता लिबीयाला टार्गेट करण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे तिथले तेल साठे आणि लिबीयाचं अफ्रिका खंडातील स्थान. शेजारील ट्युनिशीया आणि इजिप्त मध्ये झालेली क्रांती आणि लिबीयात घडवुन आणलेली बंडखोरी यात जमीन अस्मानाचा फरक आहे. लिबीया या देशाचा मुख्य आर्थिक स्त्रोत म्हणजे तिथले तेलसाठे की जे एकट्या अमेरिकेतील तेल साठ्यांच्या तुलनेत दुप्पट आहेत. लिबीया अफ्रिका खंडात एक महत्त्वाच्या स्थानावर आहे. शेजारील ट्युनिशीया आणि इजिप्त मध्ये नुकत्याच झालेल्या क्रांतीमुळे तिथून अमेरिकेला सढळ हाताने सहकार्य मिळू शकतं.एकदा का लिबीया हातात आला की अमेरिकादी देशांचा अफ्रिकेतील मुक्त वावर प्रशस्त होईल.
खाली अफ्रिकेचा नकाशा दिला आहे. त्यातील देशांची नावं पाहता एक लक्षात येतं की हे सगळे देश विकसनशील किंवा अविकसित या दोनच प्रकारात मोडतात. याचाच परिणाम असा की अफ्रिकेत एकूणच नैसर्गिक साधन संपत्ती विपुल प्रमाणात आहे. म्हणजेच विकासाच्या नावाखाली तिथल्या नैसर्गिक साधन सामुग्रीचं शोषण झालेलं नाही. अफ्रिकेतील जे देश विविध युरोपिय देशांच्या अधिपत्याखाली होते त्या देशांमध्ये (ज्या ठीकाणी नैसर्गिक साधन संपत्ती खूप आढळलेली नाही) आधीच विविध प्रकारचा अजैविक कचरा डंप केलेला आहे की ज्यावर प्रक्रिया करता येणार नाही आणि ज्याच्या अस्तित्त्वामुळे केवळ पर्यावरणच नाही तर मनुष्य़ जीवनाला सुद्धा हानी पोहोचू शकते. लिबीयाचे शेजारी देश चाड आणि सुदान हे अजुनही तेल साठे आणि नैसर्गिक वायू, युरेनिअम यांच्या दृष्टीने अतिशय योग्य असे आहेत. म्हणजे फारसा कुणी तिथे अजुन हात मारलेला नाही. आपण जर लिबीया, इजिप्त, ट्युनीशिया, चाड, सुदान यांचं अफ्रिकेतील स्थान बघितलं तर युरोपातील देशांशी जोडणार्या तेल आणि नैसर्गिक वायूच्या वाहिन्या या देशांतून भूमध्यसमुद्रामार्गे टाकता येतील की जे सगळ्या युरोपिय राष्ट्रांना सोयीचं आहे. जर अमेरिकन कंपन्यांनी तिथले तेल आणि नैसर्गिक वायूसाठे ताब्यात घेतले तर अमेरिकेला युरोपिय राष्ट्रांवर देखिल नियंत्रण ठेवायला मदत होईल. अफगाणीस्तानात तेल साठे नसतानाही अमेरिकेने जो खेळ खेळला तो केवळ कझाकस्तान वगैरे स्लाव्हिक पण इस्लामिक देशांमधुन भूमध्यसमुद्रापर्यंत तेलवाहिन्या टाकण्यासाठीच. तसेच अफगाणीस्तान आणि पाकीस्तानचं स्थान हे राजकीय दृष्ट्या खूपच स्ट्रॅटेजीक आहे. त्यामुळे साम्यवादी शक्ती चीन आणि रशिया यांना शह देता आला. आता याचे दुष्परीणाम इस्लामिक दहशतवाद वाढण्यात झाला....पण त्याची फिकीर अमेरिकेनं कधीच केलेली नाही. कारण स्वत:चं वर्च्यस्व टिकवण्यासाठी हे देश कोणत्याही थराला जाऊन राजकारण करतात. त्यात विकसित आणि विकसनशील देश भरडले गेले तरी यांना काही सोयरसूतक नाही.
लिबीयावरील कारवाई ही ठरवुन केलेली आहे. गेले कित्येक महिने अमेरिकन हवाई दल व नौदल लिबीयाच्या आसपास भूमध्य समुद्रात तळ ठोकून आहेत. त्यांनीच लिबीयामधील गडाफी विरोधक बंडखोरांना पैसा आणि हत्त्यारे पुरवली आहेत. ट्युनिशीया आणि इजिप्त मधील क्रांती लिबीयात सुद्धा पोहोचली असं भासवण्यात आलं. प्रत्यक्षात लिबीयातील बंडखोरांनी पूर्वीच्या राजाचा झेंडा दाखवायला सुरूवात केली तेव्हाच लक्षात येत होतं की ही बंडखोरी अमेरिका पुरस्कृत आहे ते. कदाचित ट्युनिशीया आणि इजिप्त मधील क्रांती हे याच "ऑपरेशन लिबीया (ऑपरेशन ऑईल) चाच एक भाग होत्या हे कालांतराने बाहेरही येईल. गडाफी पासून लिबीयातील जनतेच्या सुरक्षेसाठी अमेरिका लिबीयावर बॉम्ब फेक करणार हे काही समजत नाही. यातून लिबीयातील नागरीकांना सुरक्षीतता कशी मिळेल? गडाफीला खाली खेचल्यावर लिबीयाचं नेतृत्त्व कोणाकडे असेल? अमेरिकेने जर लिबीयात इराक आणि अफगाणीस्तान सारखी परिस्थीती निर्माण केली तर अमेरिकेला लिबीया सोडणं अवघड जाईल. मग पुन्हा इराक आणि अफगाणीस्तान मध्ये जशा फौजा ठेवल्या आहेत तशाच लिबीयात पण ठेवणार का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात. आतापर्यंत जेवढी म्हणून युद्ध झाली ती सगळी या तेलामुळेच झाली आहेत. हे तेल अजुन किती देशांचा घास घेणार आहे कोण जाणे?

sahmat
ReplyDeletemajhahi asach view hota
he sarv Telasathich chalu aahe :(
एक बाब लक्षात घ्यायला हवी की अरब आणि आफ्रिकन देश ह्या टोळ्यांच्या संघटना आहेत आणि संधी मिळताच त्या आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सशस्त्र प्रयत्न करीत असतात. तेव्हा या प्रकरणी अमेरिकेला संपूर्ण दोष देणे योग्य ठरेल असे वाटत नाही.
ReplyDeleteसुंदर लेख. छान माहिती. अपर्णा, मस्तच लिहिलं आहेस ..
ReplyDeleteविक्रम आणि शरयु, प्रतिक्रीयेबद्धल धन्यवाद.
ReplyDeleteशरयु, मी अमेरिकेलाच एकट्याला दोष देतेय असं नाहीये. पण पूर्वीचे अनुभव असंच सांगतात की जर अमेरिकेने या इस्लामी कट्टरवाद्यांचा फायदा करून घेण्यासाठी त्यांना नादाला लावलं नसतं तर आज कदाचित चित्रं वेगळं असू शकलं असतं. या अनुषंगाने जे प्रश्न उभे रहात आहेत त्यांचं काय? अजुनही अमेरिका इराक आणि अफगाणीस्तानातून आपल्या फौजा पूर्णपणे काढून घेऊ शकलेली नाही. मान्य की हे अरब देश किंवा अफ्रिकन देश हे मुख्यत: टोळ्यांचे देश आहेत. आणि वेळोवेळी एकमेकांवर हल्ला करतात. पण अमेरिकादी देशांनी त्यांच्या या आंतर्गत प्रश्नात उगाच नाक कशाला खुपसायचं? या टोळीप्रधान देशांना आणि ते फॉलो करत असलेला धर्म म्हणजे इस्लाम यांना हुकुमशाहीच पचते. मग उगाच त्यांना लोकशाही मध्ये खेचण्यात काय अर्थ आहे? या युद्धामुळे पुन्हा तेलाचे भाव प्रचंड वाढतील. की आपल्यासारख्या विकसनशील देशांतील महागाई गगनाला भिडेल. गडाफी हा पहिल्यापासूनच अरब राष्ट्र आणि अमेरिका यांचा शत्रु आहे. कारण गडाफी ने ओपेक या संघटनेत सामील होऊन तेलाच्या किंमतींवरील नियंत्रणास नकार दिलेला होता. गडाफी काही चांगला आहे अशातला भाग नाही. पण अमेरिकेचं एकूण सगळं राजकारण पाहता असं वाटतं की या लोकांना अमेरिकेने एकटं सोडून द्यावं आणि त्यांच्या नादी फार लागू नये.
धन्यवाद.
ReplyDeleteअमेरिका आणि NATO यांच्या लेखी इतर राष्ट्रांमधील मानवी हक्क ही अजिबात महत्वाची गोष्ट नाही.
तेल हे कारण आहे कारण सर्व अर्थव्यवस्था तेलकेंद्रित आहे.
पर्यायी उर्जा साधने-टेक्नोलॉजी अस्तित्वात आहेत पण त्यांचा स्वीकार झाला
तर status quo ढळेल आणि जे बदल घडतील त्यावर मात करण्याची मानसिकता
सध्याच्या सावकारांमध्ये,सत्ताधाऱ्यांमध्ये नाही.
सर्व आर्थिक व्यवहारात जगातल्या मोठ्या बँकांना कमिशन अथवा व्याज मिळते.
प्रगत राष्ट्रांच्या रोजच्या उत्पन्नाचा हा मोठा स्त्रोत आहे.
व्याजाचा लोभ,सावकारीने,त्या वृत्तीने,सर्व मानव जातीचा घात केला आहे.
सहमत नाही. अल्जीरिया, मोरोक्को, येमेन, बाहरीन, सीरिया, लीबिया सगळ्या ठिकाणी अमेरिका फूस देऊ शकत नाही लोकांना. एवढ्या मोठ्या क्षेत्राला अशांत एका वेळी करणं आणि लष्करी मदतीची तयारी ठेवणं निव्वळ अशक्य आहे. फक्त लीबिया जरी धरला तरी एका वेळी इराक, अफगाणिस्तान एवढ्या मोठ्या क्षेत्रात अमेरिकन फौजा गुंतल्या असताना मला नाही वाटत ते लीबिया पण प्लॅन करतील. या पूर्ण भागाचे क्षेत्रफळ भारतापेक्षा जास्त आहे.
ReplyDeleteआणि तिथल्या लोकांनी स्वतः उठाव केला आहे, हे जर कदाचित सत्य असलं तर अमेरिकेने स्वतःच्या फायद्यासाठी जर मदत दिली तर गैर नाही. व्यापार करून सगळ्यांचा फायदा होऊ शकतो, पण मेले तर ते लोक एकटेच मरतील.
America is always right.
ReplyDeleteहेरंब, महेश आणि ओंकार प्रतिक्रीयेबद्धल धन्यवाद.
ReplyDeleteओंकार, तुझी वाचण्यात कुठेतरी गल्लत झालीय. मी असं कुठेच म्हणाले नाहीये की "अल्जीरिया, मोरोक्को, येमेन, बाहरीन, सीरिया, लीबिया" या सगळ्या देशांत अमेरिकेने फूस लावलीय. लिबीयाच्या बंडखोरांना तर अमेरिकेची साथ आहे यात शंकाच नाहीये. तसे पुरावे पण आहेत. ट्युनिशीया आणि इजीप्त मधील क्रांतीसंदर्भात शंकेला वाव आहे येवढंच मी म्हणाले. बाकी अमेरिकेकडे या असल्या गोष्टींसाठी भरपूर पैसे आणि मनुष्यबळ आहे. आता भरीत भर म्हणून सौदी अरेबिया सुद्धा अमेरिकेच्या बाजूनी लिबीयाच्या विरूद्ध उतरला आहे. सौदी ने पैसे देण्याचं काम केलंय. गदाफी ने ओपेकचा सदस्य बनायला नकार दिल्यामुळे सौदी अरेबिया आणि इतर मध्य पूर्वेकडील अमेरिकेचे दोस्त देश लिबीयावर भडकलेले आहेत. कारण गदाफी मुळे त्यांचं तेलाचं उत्त्पन्न कमी झालंय. लिबीयावरील अमेरिकेची कारवाई हे उघड उघड तेलाच्या राजकारणाचा भाग आहे हे दिसतंय. लिबीयातील नागरीकांचं संर्क्षण करायचं असेल तर लिबीयावर हवाई हल्ले करून ते कसं साधलं जाणार? त्यात निरपराध नागरीकच मरतील.
हा दृष्टिकोनही अभ्यासण्यासारखा आहे! इंटरेस्टिंग एकदम.. कारण पश्चिम आफ्रिका आणि सब-सहारन आफ्रिकेमध्येही बरेच दंगे अन खुनाखुन्या चालू आहेत.. पण जागतिक माध्यमं तिथलं कव्हरेज देत नाहीत कारण तिथे तेल नाही, फक्त रक्त आहे! :(
ReplyDeleteवाह..नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख. अमेरिका स्वतःच्या स्वार्थाशिवाय काही करेल यावर माझा विश्वास नाही. बर् झालं भारताने लिबियावर सुरु हल्ल्याला विरोध दर्शवला. पुढे काय होईल काय माहित :(
ReplyDelete