Monday, 1 November 2010

चला उजळून निघुयात!


ह्यावेळी दिवाळी साजरी करताना एक पणती घरात आणि मनात आपल्या अशा बांधवांसाठी लावूयात की जे काही ना काही कारणाने कोणत्याच सणाचा आनंद उपभोगू शकत नाहीत. एक पणती विश्वशांतीसाठी, एक पणती आपल्या आदिवासी भागातील बांधवांसाठी, एक पणती आपल्या देशातील रस्त्यांवर राहणार्‍या जनतेसाठी, एक पणती वृद्धाश्रमात राहणार्‍या आजी-आजोबांसाठी, एक पणती देशातील लाखो अनाथ मुलांसाठी. आपल्याला फक्त एकच पणती लावायचीय या सगळ्यांच्यासाठी.......असे एक लाख लोक जरी निघाले तरी अशा लक्ष पणत्यांनी आपलं मन उजळून निघेल. खर्‍या दिवाळीचा आनंद मिळेल! फटाके लावून पर्यावरण आणि ध्वनीप्रदूषणाबरोबरच आपण पैशांचाही अपव्यय करतो आहोत. त्यामुळे ह्यावेळी ते न करून आपण पैशाचा अपव्यय टाळू शकतो. आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांना दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेऊयात. चला उजळून निघुयात!

उत्सव हा दिपावलीचा।
पावित्र्य अन मांगल्याच॥
स्मरून नाते मैत्रीचे।
मनी प्रेमभाव जपण्याच॥

उत्सवात दिपावलीच्या।
सारं काही आठवत॥
ज्योतीत पणतीच्या पाहताना।
नजरेत बालपण उभं राहत॥

त्या सार्‍या आठवणी।
दाटून आल्या या क्षणी॥
शब्दांतून अवतरल्या।
कवितेच्या रूपानी॥

समस्त वाचक आणि ब्लॉगर्सना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
ही दिपावली आपल्या सगळ्यांना सुख, आरोग्य आणि समृद्धी देवो!

(या कवितेची पहिली दोन कडवी कुठेतरी वाचली होती. त्याला शेवटचं कडवं मी जोडलंय.)

2 comments:

 1. फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,
  चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,
  नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!

  दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

  ReplyDelete
 2. वायूप्रदुषण मुक्त नसली तरी ध्वनी प्रदुषण मुक्त दिवाळी यावेळी साजरी केली आम्ही केवळ रोषणाई वाली आतिषबाजी केली.. आवाज रहीत...

  दिवाळीच्या उशीराने शुभेच्छा!

  ReplyDelete