Thursday, 24 February 2011

एक वर्षाची शतपावली!!

आज माझ्या **शतपावली** या मराठी ब्लॉगला एक वर्षं पूर्ण होत आहे. तशी २००४ पासूनच ब्लॉगलेखनाला सुरूवात केली होती. इंग्रजी ब्लॉगचं नाव "सायलेंट वॉक" असं होतं. ब्लॉग लेखन हे स्वान्त:सुखाय आणि मनातील विचाराची खदखद शक्य असेल तेव्हा इतरांपर्यंत पोहोचवणं यासाठी म्हणूनच सुरूवात केली. बरहा फॉन्ट मुळे देवनागरी सहजपणे टंकण्याचे कसब हाती लागल्याने मराठीत आपले विचार व्यक्त करणे हे अधिक महत्त्वाचे वाटायला लागले. सुरूवातीला २००४ साली मराठी ब्लॉगर्सची इतकी संख्या आणि एकजुटही नव्हती. त्यामुळे आपलं लेखन वाचायला फारसं कुणी नाही याचं वैषम्य वाटत असे. पण मराठी ब्लॉग विश्व आणि इतर मराठी सोशल नेटवर्कींग साईट्स मुळे आपल्या मराठी ब्लॉगला वाचक वर्ग मिळतो आहे आणि वाचणारे त्यावर प्रतिक्रीया सुद्धा व्यक्त करताहेत हेच खूप उत्साहवर्धक होतं. तरी सुद्धा ब्लॉग लेखनासाठी वेळ पाहीजे हा मुख्य मुद्दा मला सुरूवातीपासूनच जाणवला. म्हणूनच आज एक वर्षांनंतरही फक्त ४८ लेख प्रकाशीत करू शकले. सध्यातरी मे २०१० पासून ब्लॉगची वाचक संख्या ११,००० च्या वर झाली आहे.  पण या वर्षभरात भरपूर मित्र-मैत्रिणी मिळाले ते या ब्लॉगच्या मध्यमातूनच. तशी माझ्या ब्लॉगची मी इतरांच्या ब्लॉगशी कधीच तुलना करत नाही. त्यामुळे त्यांच्या पोस्ट्सची संख्या अगदी ३०० च्या घरात किंवा १०० च्या घरात आणि वाचकसंख्या अनेक लाखांच्या घरात असली तरी मला माझ्या शतपावलीचं कौतुक आहेच. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्या त्यावेळी शतपावलीवर विविध विषयांवर लेखन घेऊन नक्कीच भेटेन. मी नियमीत लेखन न करता सुद्धा आवर्जुन आधीचे लेख वाचण्यासाठी पुन्हा पुन्हा शतपावलीला भेट देणार्‍या वाचकांचे आभार. या दिवशी खरंतर एका व्यक्तीचे आभार नाही मानले तर ते चुकीचं ठरेल. मला देवकाका म्हणजे समस्त बझ्झकरांना माहीत असलेले देका, किंवा बाबा अत्यानंद आणि समस्त मराठी सोशल नेटवर्क करांना माहीते असलेले श्री प्रमोद देव यांचे. त्यांनीच मला मराठीतून ब्लॉग लिहीण्याची प्रेरणा दिली आणि त्यासाठी आवश्यक असलेलं बरहाचं ज्ञान सुद्धा वाटून घेतलं. 

19 comments:

  1. हार्दिक शुभेच्छा.. अभिनंदन

    ReplyDelete
  2. अरे वा... अभिनंदन :)
    अशीच लिहीत राहा अलताई. शुभेच्छा

    ReplyDelete
  3. धन्यवाद आप आणि सुझे. सध्या नेमकं घरी पण इंटरनेट नसल्याने आणि ऑफीसात लिहीणं मनाला पटत नसल्याने लिहीत नाहीये. :-)

    ReplyDelete
  4. अभिनंदन अपर्णा!
    अशीच लिहिती राहा!

    ReplyDelete
  5. धन्यवाद सचिन आणि देका.
    देका, तुमच्यामुळेच मी खरंतर मराठी ब्लॉग लिहायला सुरूवात केली.

    ReplyDelete
  6. हार्दिक शुभेच्छा.. अभिनंदन

    ReplyDelete
  7. शुभेच्छा आणि धन्यवाद.
    तुमचे विचार शेअर केल्याबद्दल.
    मजा आली.
    - जयंत.

    ReplyDelete
  8. अभिनंदन :-)
    लिहित राहणे महत्वाचे आहे.
    तुमच्या पुढील प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा!!
    माझ्या ब्लॉगचा पत्ता:http://prashantredkarsobat.blogspot.com

    ReplyDelete
  9. अल ताइ...अभिनंदन...अन पुढील लिखाणासाठी खुप खुप शुभेच्छा.... :) :)

    ReplyDelete
  10. अलताई,
    अभिनंदन!! पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!! :)

    ReplyDelete
  11. अपर्णा, अभिनंदन!व अनेक अनेक शुभेच्छा!!!

    ReplyDelete
  12. अभिनंदन आणि खूप शुभेच्छा. पुलेशु..

    ReplyDelete
  13. अपर्णा, अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा ! अशीच लिहीत रहा..

    ReplyDelete
  14. राजै, जयंतराव, रेडकर, योमुं, विभि, भानस, मुक्तकलंदर आणि हेओ...........सगळ्यांना धन्यवाद............ तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि प्रोत्साहनाबद्धल.

    ReplyDelete
  15. खूप खूप अभिनंदन!आणि भावी वाटचाली बद्दल मनापासून शुभेच्छा!

    ReplyDelete
  16. खूप खूप अभिनंदन

    ReplyDelete
  17. KHUP SUNDER LIHILE AHAHES ASHICH LIHIT JA

    ReplyDelete