Wednesday 10 March 2010

धान्यापासून दारू गाळण्यास उच्च न्यायालयाची संमती!!

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5668443.cms

ज्वारी हे महाराष्ट्रातील मुख्य धान्य नाही (??) त्यामुळे ज्वारीपासून दारू गाळली तर शेतकऱ्यांनाच फायदा (???). असे उच्च न्यायालयाच म्हणत असेल तर आनंदी आनंद आहे!! आजही महाराष्ट्रामध्ये (मुंबई सोडून) सगळीकडे ज्वारीच्या भाकरीच वर्षभर खातात आणि गव्हाच्या पिठाचा उपयोग फक्त सणासुदीच्या दिवशी करतात. विशेषतः मराठवाड्यात म्हणजे लातूर, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, बीड या भागांत सगळीकडे ज्वारीच अधिक वापरतात. कारण ती तिकडे अधिक पिकते त्यामुळे सामान्य लोकांना गव्हा पेक्षा ज्वारी परवडते. ज्वारी पासून दारू गाळण्याचा कारखाना लातूर मध्ये मा. (माजलेले) माजी मुख्यमंत्र्यांनी आपल्या दोन नंबरच्या मुलाचं नावावर टाकला आहे. गेली ४-५ वर्षे त्यातून त्यांनी कोट्यावधी रुपये सुद्धा कमावले आहेत. म्हणजे दोन नंबरच्या मुलाच्या नावावर दोन नंबरचा धंदा टाकून दोन नंबरचा माल पण खूप कमावला आहे केंद्रीय अवजड उद्योग मंत्र्यांनी. म्हणजे याचा फायदा नक्की कोणाला ते सुज्ञास सांगायला नको. नांदेड मध्ये पण निघतोय वाटतं तसाच कारखाना........आता तर उच्च न्यायालयाने पण परवानगी दिली. म्हणजे उजळ माथ्याने लोकांच्या तोंडाचा घास पळवून दोन नंबरचा धंदा टाकून हे लोक कायदेशीर रित्या दारू गळणार. शेतकऱ्याकडून धान्य (ज्वारी) अत्यंत कमी भावात घेणार, निर्यातीस योग्य अशी दारू तयार करणार आणि जास्त भावाने ती परदेशात विकणार. निकृष्ट दर्जाची दारू आहेच शेतकरी आणि सामान्य लोकांसाठी कारण त्यांना धान्य खाण्या ऐवजी दारूच प्यायला लागेल. शेतकरी आत्महत्या पण करणार नाही कारण हळू हळू रोग ग्रस्तहोऊन ते आपोआपच मरतील. उच्च न्यायालयाचा तरी केवढा दूरदृष्टीपणा!!

No comments:

Post a Comment