Saturday 19 June 2010

माझे शाकाहार पुराण - भाग २


आमच्या केंब्रीजच्या शेअर्ड किचन मध्ये एक पाकीस्तानी मुलगी आली. कालांतराने तिची आणि माझी ओळख झाली. सतत तीन महिने मला रोज रात्री भात-आमटी-लोणचं-पापड खाताना बघुन एक दिवशी तिने मला विचारलंच. हे काय तुला तेच इअतके महीने खाऊन कंटाळा कसा नाही येत? मी म्हणाले माझं रीसर्चचं काम चालू असल्याने भाज्या विकत आणायला आणि चिरून शिजवायला वेळ नाहीये. मग तिला लक्षात आलं की मी पूर्ण शाकाहारी असल्याने बाहेर तयार मिळत असलेल्य गोष्टी चालत नाहीत आणि आवडत नाहीत. मग ती म्हणाली की तिला केंब्रीजला आल्यापासून शाकाहारी रहावं लागतंय. मला समजलंच नाही की ती असं का म्हणत होती ते. मग तिनेच खुलासा केला. की इंग्लंड मध्ये मिळणारं मांस हे हलालचं नसतं. आता ही सगळी माझ्या सामान्यज्ञानात भरच होती. मी लगेच तिला विचारलं हलाल म्हणजे काय? मुस्लीम लोकांमध्ये प्राण्यांना हळूहळू मारतात. म्हणजे फक्त गळा चिरून त्याचं पूर्ण रक्त वाहून गेलं की मगच ते मांस वापरतात. त्यालाच हलाल म्हणतात. पाश्चिमात्य देशांत प्राण्यांना इलेक्ट्रीसीटीचा शॉक देवून मारतात आणि त्यांचं रक्तं तसंच गोठवतात. हे इस्लाम मध्ये चालत नाही. म्हणून तिला शाकाहारी रहावं लागतंय. मग या प्रवचना पाठोपाठ तिने मला माणसाने मांसाहारी असण्यासाठी निसर्गानेच त्याला कसे सुळे दिलेत इत्यादी इत्यादी टीपीकल मांसाहार समर्थकांचे युक्तीवाद सांगायला सुरूवात केली. त्यातीलच एक म्हणजे, "शाकाहारातील भाज्या, पानं, वनस्पती ह्यांच्यात पण जीव असतो. मग तुम्ही शाकाहारी त्यांना मारून खाताच की. म्हणजे तुम्ही शाकाहारी नाही". आता पर्यंत मला व्हेजीटेरीयन बाय रीलीजन आणि व्हेजीटेरीयन बाय एथिक्स याविषयी पूर्ण माहीती झाली होती. ही पाकीस्तानी बया माझ्याशी हिंदूं मधील शाकाहार ही संकल्पना कशी फुटकळ आहे आणि कुराण मध्ये त्याचं कसं समर्थन केलं आहे यावर प्रवचनच देत होती. तिचं बोलणं पूर्णपणे ऐकून घेतल्यावर मी सुध्दा तिला तिच्या  हिंदू धर्मा विषयी असलेल्या कल्पना किती चुकीच्या आहेत आणि सगळेच हिंदू शाकाहारी नसतात आणि त्याचा हिंदू धर्माशी असा काहीही संबंध नाहीये ह्या विषयी लेक्चर दिलं. अगदी जीवोजीवस्य जीवनम पासून ते आपल्या कडील यज्ञां मधील प्राण्यांच्या आहूती, देवीला बळी देण्याची संकल्पना हे सर्व सांगीतलं. माझा बराच वेळ गेला पण मला एका तरी पाकीस्तानी व्यक्तीशी यशस्वी सामना केल्याचं समाधान लाभलं.

पर्वाच पावसाळी विशेषांकात एक शाकाहारा विषयी भाज्या सजीव आहेत हाच युक्तीवाद स्विकारून आपण कसा मांसाहार स्विकारला अश्या आशयाचा एक लेख वाचनात आला आणि ह्या सगळ्या आठवणी जागृत झाल्या. मला शाकाहारा विषयी लोक हा जो मुद्दा उभा करतात तो पटतच नाही. आपण जरी असं मानलं की झाडं, फुलं, पानं यात जीव असतो तरी प्रत्येक सजीवाची आत्मभानाची जाणीव (कॉन्शसनेस लेव्हल) असण्याचा स्तर हा वेगळा असतो. डास, मुंगी, माशी यांसारखे कीटक सुध्दा जीव असलेलेच असतात पण त्यांची कॉन्शसनेस लेव्हल ही गाय, बकरी, माणूस यांपेक्षा नक्कीच कमी आहे. अगदी प्राण्यां मध्ये सुध्दा ही पातळी वेगवेगळी असते. जर एखादी कुत्र्यांची जोडी असेल आणि काही पिल्लं असतील. काहीतरी होवून जर त्यांतील एखादा मरून पडला तर बाकीचे फक्त हुंगतात आणि काहीच न झाल्यासारखे पुढे जातात. पण हेच जर हत्तींच्या कळपातील एखादा हत्ती मरण पावला तर सर्व कळपा मध्ये माणसां सारखं वर्तन दिसून येतं. अगदी त्या मेलेल्या हत्तीच्या शवावर फुलांच्या फांद्या ठेवण्या पासून ते शोक करत तिथेच बसून राहण्यापर्यत सगळे प्रकार होतात. एखादा डास किंवा, मुंगी यांना मारलं तर त्यांच्या भावना किंवा त्यांचा शेवटचा आवाज, किंचाळणे, ओरडणे कधी ऐकल्याचे माझ्यातरी ऐकीवात नाही. हेच एखादी भाजी, फळ खाताना कोणी ऐकलंय हे सुध्दा ऐकीवात नाही. डॉ जगदीशचंद्र बोस यांनी जरी प्रयोगाअंती हे सिध्द केलं की झाडां मध्ये पण कॉन्शसनेस असतो तरी त्यांच्या कॉन्शसनेस ची पातळी आणि तीव्रता नक्कीच वेगळी असते. पण हेच कोंबडी, बकरी कापताना त्यांच्या गळ्यातून येणारा आर्त आवाज मन हेलावून टाकतो. पाश्चात्य देशां मध्ये तर डुकरं, गायी यांची पैदास केवळ तेव्हढ्याच साठी केली जाते. एखाद्या डुकराला, बकर्‍याला पकडुन नेतानाचा आर्त आवाज खूप काही सांगत असतो...कत्तल खान्यात देण्यासाठी गायींना जेव्हा नेतात तेव्हाचे त्यांच्या डोळ्यातले भाव खूप काही सांगत असतात.... या सगळ्यांचे दु:ख समजण्यासाठी आपला कॉन्शसनेस जागृत असावा लागतो.
जंगली प्राण्यांमध्ये आणि माणसा मध्ये खूप मूलभूत फरक आहेत. जंगलातील जीवोजीवस्य जीवनम हा नियम माणसांसाठी खरंच लागू होतो का? माणसाला निसर्गाने दिलेल्या विचार करण्याच्या आणि अधिक बुध्दीच्या जोरावर त्याने पुषकळच प्रगती केली आहे. पण प्राण्यांना दुसर्‍या प्राण्याची शिकार भूक लागली की करावीच लागते. जर भूक नसेल तर ते त्या प्राण्यावर हल्ला सुध्दा करत नाहीत. ह्य उलट माणूस गरज नसताना प्राणी तसेच इतर माणसं यांना मारणे, कारण नसताना केवळ स्वत:च्या मनोरंजनासाठी प्राण्यांची शिकार करणे, त्यांना मारून त्यांची नखं-कातडी विकणे हे प्रकार करतो. पृथ्वीतलावर जिथे डाळी तयार होणं अवघड आहे, भाज्या १२ पैकी २-३ महीनेच मिळतात अश्या ठिकाणी जर लोक मांसाहारी असतील तर ते गरज म्हणून आहे. शास्त्रीय दृष्ट्या मांसल भाग की ज्यामुळे आपल्याला प्रथिनं आणि मेद मिळतो तो सजीव प्राण्याचा भाग म्हणजे मांस. आता या व्याख्येत सगळे सजीव येत नाहीत. झाडाच्या मांसल भागाला मांस म्हणत नाहीत. भाज्या, फळे यांच्या मधुन आपल्याला जीवनस्त्त्व आणि कार्बोदके मिळतात ना की प्रथिनं. त्यामुळे भाज्यां मध्ये जीव आहे आणि त्यांचा आवाज ऐकू येत नाही म्हणून आपण भाज्या शाकाहारी म्हणून खातो हा युक्तीवादच पोकळ आहे.
पण एका टप्प्यापर्यंत ज्यांना सापा पासून सगळ्यांच्या आकृत्या त्यांना खाण्याच्या केवळ कल्पनेने मागेपुढे करतात त्यांनी केवळ भाज्या खातेसच नं त्यांचं ओरडणं एकू येत नाही मग दृष्टीआड सृष्टी या नियमाप्रमाणे प्राणी जोपर्यंत तुमच्या समोर मारले जात नाहीत तो पर्यंत ते खायला काय हरकत आहे? असा प्रचंड फसवा आणि टीपीकल युक्तीवाद केल्यावर ताबडतोब सगळं विसरून मांसाहारी बनावं.........हे पचायला जड जातं.  ह्या युक्तीवादाला शरण जाणं म्हणजे असं म्हणण्यासारखं आहे की आपल्या डोळ्यांसमोर जर वाईट गोष्टी घडत नसतील (मी वाईट अश्यासाठी म्हणते आहे की जेव्हा प्राणी समोर कापताना त्यांचं ओरडणं आपल्याला ऐकवत नसेल म्हणजे ते वाईट आहे असे आपण मानता) तर इतत्र वाईट गोष्टी घडल्या तरी आपल्या डोळ्यांसमोर न दिसल्याने आणि कानांना ऐकू न आल्याने आपण त्याबध्दल फारसा विचार का करावा? म्हणजेच जर काश्मिरात अतिरेकी घरं जाळत हिंडत आहेत पण आमच्या डोळ्यांसमोर काही दिसत नाहीये, आम्हाला त्यांच्या किंकाळ्या ऐकू येत नाहीयेत (थोडक्यात अतिरेकी जोपर्यंत मुंबईत घुसून तेच तांडव करत नाहीत) तोपर्यंत आम्ही कशाला विचार करा? ही प्रवृत्ती झाली. कारण आपल्या समोर अतिरेक्यांनी मृत्युचा नंगा नाच घातला तेव्हा आपल्याला त्याची तीव्रता आणि भयानकता लक्षात आली. आता जर कोणी असं म्हणत असेल की काश्मीर मध्ये अतिरेकी हल्ले झाले तरी आम्हाला तेव्ह्ढंच वाईट वाटतं. मग प्राणी आपल्या डोळ्यांसमोर मारले गेले काय किंवा दृष्टीआड, आपल्याला त्यांच्या आर्त किंकाळ्या ऐकू आल्या किंवा नाहीत काय.....आपल्याला वाईट वाटून आपण मांसाहार केला नाही पाहीजे. प्राणी आणि माणूस यांच्या बाबतीत आपला दुजा भाव का? मग तसं असेल तर आम्ही (शाकाहारी वाल्यांनी) प्राणी आणि भाजी यात दुजा भाव ठेवला तर बिघडलं कुठे?
याच्प्रमाणे अजुन एक पोकळ युक्तीवाद म्हणजे गाईचं दूध म्हणजे तिचं रक्तं. मग आईचं दूध म्हणजे आईचं रक्त पिऊनच लहान मूल वाढतं. मग या न्यायाने सगळेच रक्तपिपासू का? कोंबड्यांना अंड्यात जीव न राहण्यासाठी म्हणून विशिष्ट प्रकारचं इंजक्शन दिलेलं असतं. म्हणून त्या अंड्यात पिल्लं नसतात. पण हेच जर इंजक्शन दिलेलं नसेल आणि अंडं विशिष्ट तापमाना वर उबवलं तर त्यात नक्कीच पिल्लू तयार होतं. त्यामुळे सगळ्याच अंड्यांमध्ये पिल्लं नसतात हा युक्तीवाद सुध्दा पोकळ आहे. अंड्यातील पिवळा बलक हा त्या कोंबडीच्या कोणत्या शारीरिक द्रवापासून तयार झालेला असतो हे तर जगजाहीर आहे.
माझे मुद्दे हे कोणी मांसाहारी असावं की शाकाहारी यापैकी एकाचं समर्थन करण्यासाठी नसून दृष्टी आड सृष्टी या युक्तीवादावर आहेत. कोणाला जर मांसाहार आवडत असेल तर स्पष्ट तसे लिहून आणि म्हणून मी मांसाहारी आहे असे म्हंटले तर माझी काहीही हरकत नाही. म्हणजे कोणीही कोणताही आहार करावा तो प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे. माझा आक्षेप फक्त वरील मांसाहार समर्थकांच्या भाजी विषयी आणि दृष्टीआड सृष्टी या प्रवृत्तीच्या समर्थनाच्या युक्तीवादाला आहे. तसं असेल तर जे मांसाहार समर्थक असं मानतात की भाज्या खाणे हे सुध्दा एक मांसाहारच आहे तर मी केलेल्या वरील विधानांच्या विरोधात स्पष्टीकरण लिहावे. हा कुठेही व्यक्तीगत वादाकडे नेण्यासाठी लिहीलेला लेख नाही हे वाचकांनी लक्षात घ्यावे.

20 comments:

  1. एकदम पटलं. ज्यांनी त्यांनी आपल्या लायनीप्रमाणे जावं हेच खरं.
    मांसाहारातही तू सांगितलेस तशा काही धार्मिक मोजपट्ट्या आहेत...हिंदू लोक गाईचे मांस खात नाहीत...ख्रिश्चन,मुसलमान सर्रास खातात.
    हिंदू-ख्रिश्चन डुकराचे मांस खातात...मुसलमान खात नाहीत.
    हे जर चालतं...तर कुणी काय खावं,खातंय ह्यावरून टिंगल-टवाळी करणं किंवा त्याचं बौद्धिक घेणं हे बरोबर नाही.
    असो...तसाही ’तो’ लेख केवळ गंमतीशीर ह्या सदरातच वाचावा असं मला वाटतंय...इतकं गंभीरपणे घेऊ नये.

    ReplyDelete
  2. जरी लेख गमतीशीर या सदरात मोडत असला तरी त्या लेखातील युक्तीवाद हे मांसाहार समर्थकांचे नेहमीचे युक्तीवाद आहेत. ३-४ दिवस माझ्या मनात उत्तर घोळत होते पण लिहायला वेळ मिळत नव्हता. लिहील्यावर एक लेखच तयार झाला. :-)
    माझी मतं ही त्या युक्तीवादांवर आहेत.

    ReplyDelete
  3. मनुष्याच्या कार्य पध्दतीशी संबंधीत आहार असावा असे पूर्वजांनी अनुभवाने मान्य केले. तसे नियम त्या त्या कार्य शाखे करता उपयुक्त की हनी कारक हे ठरवले गेले. जो आहार पोटात जातो त्या आहाराने तयार होणार्‍या रक्ताच्या व्हिस्कॉसिटीने शरीरातील बर्‍याच अवयवांची एफिशियन्सी अवलंबून असते म्हणून हे आहारातील फरक ठरवले गेले. हेच आधूनिक तंत्रज्ञानाने सिध्द झाले आहे. दुचाकीतील, ट्रक/जहाजाच्या एंजीनातील, विमानातील व उपग्रहाला अवकाशात नेणार्‍या साधानांचे इंधन का वेगळे असते? वीज प्रवाह एकच आहे पण त्यावर चालणार्‍या साधनांना वेगवेगळ्या क्षमतेची वीज प्रत्येक साधनाच्या कार्य पध्दती प्रमाणे नियंत्रीत करावी लागते. पण हे समजून घेण्याची क्षमता असणार्‍यांनाच हे उमजू शकेल. ह्या ब्रंम्हांडाला समजण्या करता ज्या क्षमतेची आवश्यकता आहे ती ठरावीक आहार, वीचारानेच शक्य आहे. माफ करा, मला तुमचे डोके खाण्याचा मांसाहार ह्या क्षणाला करायचा नाही.

    ReplyDelete
  4. भाज्यांना नर्व्हस सिस्टीम नसते, म्हणून भाज्या या शाकाहारात मोडतात. बाकी सगळे मुद्दे मान्य.

    ReplyDelete
  5. अभिजीत, मी सुध्दा ते जीभेने लपलप करून पाणी पिणारे प्राणी मांसाहारी असतात .....चा युक्तीवाद/नीरीक्षण ऐकलं आहे. शेवटी प्रत्येकाने ठरवावं आपण काय खायचं आणि आपल्या तब्येतीला काय चांगलं आहे ते. उगाच कोणाची विचारप्रक्रीया बदलण्याचा प्रयत्न बीनबुडाच्या युक्तीवादांनी करायचा प्रयत्न कशाला करायचा?

    ReplyDelete
  6. रानडे काका, आहाराचा संबंध मुख्यत: आपण काय व्यवसाय करतोय त्याच्याशी खूप निगडीत असतो...सत्य आहे. मांसाहारी प्राणी सुध्दा खरं तर आधीचा मरून पडलेला प्राणी खात नाहीत. वाघ-सिंह जीवंत प्राण्याची शिकार करूनच खातात. त्यांना पण ताजे मांस लागते. फक्त माणूस आणि गिधाडे हेच आधीच मारलेल्या प्राण्याचं मांस खातात की जे मानवाच्या बौध्दीक क्षमतेवर नक्कीच परिणाम करते. माझं डोकं खाल्लंत तरी चालेल......मला विचारांती चर्चा आवडते.

    ReplyDelete
  7. खरंतर हिंदू धर्माच्या वैदिक आणि पौराणीक काळातील कथा/प्रथा बघता गाईचा सुध्दा यज्ञात आहूती म्हणून उपयोग केला जात असे. त्याच्प्रमाणे राजेलोक प्राण्यांच्या शिकारी करत. म्हणजे मांसाहार हा हिंदूधर्मात पूर्वीपासून होता. मग मधल्या काळात अशी कोणती गोष्ट घडली असेल की गाय ही हिंदूं साठी देवेते समान आणि शाकाहार हा प्रामुख्याने सामान्य आहार बनला? हे जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. कदाचित श्री नेमाडे यांच्या "हिंदू" या पुस्तकात ह्याचे उत्तर सापडेल.

    ReplyDelete
  8. मूळात हिंदू नावाचा धर्म अस्तीत्वातच नाही. हा आमच्यावर राज्य करण्या करता इंग्रजांनी रचलेला एक कट आहे. आमच्यातलेच माथेफिरू, परकीयांचा आदर करणारे सुशिक्षीत ठरवले गेले, आमच्याच विरूध्द घरभेदी तयार करून हा प्रकार घडवून आणला गेला व अजून त्याला खतपाणी घातले जाते. असे करण्याने ३०० वर्ष राज्य करणे सोपे झाले. मनसोक्त लूटालूट करता आली. आजचे राज्यकर्ते तेच करण्याच्या प्रयत्नात सफल होत आहेत.

    जी गाय सर्वार्थाने ह्या शेती प्रधान देशवासियांना उपयोगी होती तीला आई समजून आदर करणे शिकवले गेले. तोच प्रकार ह्या भूमीला माता समजणे शिकवले गेले. जे इतर कोणत्याही संस्कृतीत आजपर्यंत घडले नाही.

    मॅड काऊ सारखा रोग एक चांगले उदाहरण आहे. ज्या देशांनी गाईचे मास कमी खर्चात तयार करून खूप फायदा मिळवण्याचा एकमेव व्यावसाय मानला होता त्याच देशातून गायीचे मास खाणे कायद्याने बंद केले होते. आमच्या कडे असेच काहीसे घडले असावे की गो मास वर्ज्य केले गेले. मुसलमानांनी डुकराचे मास का वर्ज्य केले असावे.

    भौगोलीक वातावरणाशी ह्याचा संबंध असावा. समाजाचे रोगराई पासून संरक्षण व्हावे हा पण उद्देश असावा. तोच प्रकार सगोत्र वीवाह, अंतर जातीय वीवाहाला बंदी घालण्यातला आहे. हे तथाकथीत समाज सुधारकांना समजून घेणे फारसे कठीण नाही. पण ह्या हजारो वर्ष सुरळीत चालेल्या समाज व्यवस्थेला तोडणे हा एकमेव जन्मसीध्द हक्क मानणारे डोकं खाजवून असले विषय शोधून काढतात व त्यांना प्रोत्साहन देणारे परकीय व स्वकीय प्रयत्नशील असतात.

    ReplyDelete
  9. हिंदू धर्माच्या वैदिक आणि पौराणीक काळात गाईचा नुसता यज्ञात आहूती म्हणून नव्हे तर मांसाहार म्हणून सुद्धा वापर होत असे असे कुठेशी वाचले आहे. मांसाहा र की शाकाहार ह्याबाबत मतभेद का असावे?? ज्यांना जे आवडते त्यांनी ते खावे. नको ती करणे उगाच देऊ नये... आणि मुळात कोण आहे हा झाडे आणि भाज्यांना शाकाहारी नाहीत असे म्हणणारा... कळू तरी द्या...


    अवांतर : @ रानडे काका... मूळात हिंदू नावाचा धर्म अस्तीत्वातच नाही. हा आमच्यावर राज्य करण्याकरता इंग्रजांनी रचलेला एक कट आहे...

    ह्या वाक्याबाबत अधिक स्पष्टीकरण आवश्यक आहे... हे काही पटले नाही बुवा...
    सोपे उदाहरण घेऊ.. इंग्रज आले १६०० साली आणि 'हिंदू धर्म रक्षिणे' आणि 'मराठा तितुका मेळवावा' असे म्हणणारी महिकावती बखर आहे १३ व्या शतकामधली...

    ReplyDelete
  10. रोहन, झाडं आणि भाज्या या सजीवां मध्ये मोडतात. म्हणजे जे लोक भाज्या खातात ते एकप्रकारे मांसाहारीच आहेत असे बर्‍याच मांसाहार समर्थक लोकांचे म्हणणे असते. अगदी ती माझ्या लेखात ज्या पाकीस्तानी मुलीचा उल्लेख आहे तिच्या कडून मी हा युक्तीवाद प्रथम ऐकला होता. हा युक्तीवाद खरंतर प्रामुख्याने जे मांसाहारी लोक शाकाहारी लोकांना मांसाहारी लोकां मध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करतात त्यांचा आहे. केवळ एक असा कोणी नाही.

    ReplyDelete
  11. http://www.stephen-knapp.com/about_the_name_Hindu.htm
    http://www.hinduwebsite.com/hinduism/h_define.asp
    कृपया हे दुवा वाचा . . .
    मुद्दा बेरीज वजाबाकीचा, कोण खरे - खोटे, हा नसून, चुकीचे तर्क चालवून ह्या सनातन धर्माच्या नसलेल्या चूका दाखवणे व आपली पोळी भाजून उदरभरण करणार्‍यांची संख्या ह्या हिंदूस्थानात (हे शब्दच रूढ आहेत, दुदैव) जास्त आहे. परदेशी लेखकाचा पुरावा देण्याचे दुर्भाग्य आले आहे. कारण आमची तथाकथीत विद्वान मंडळी हिंदू ह्या शब्दापासून ते संस्कारा पर्यंत सगळे चुक घाणेरडे असे काहिंसे सिध्द करण्यात त्या काळचा व आजचा राजाश्रय मिळवीत आहेत. काही मंडळी हिंदू हाच धर्म मानून त्याच्या संरक्षणाची भाषा बोलतात. माझ्या मते घसणार्‍या वाळूवर उभारलेला डोलारा नेहमीच डळमळीत असतो.

    म्हणून मजबूत पायावर उभ्या असलेल्या सनातन धर्माला माझा त्रिवार नमस्कार. सगळ्यात महत्त्वाचे असे की ज्या शिवरायाने ह्या गर्भ गळीत झालेल्या समाजाला जागे केले, अभिमानाने जगणे शिकवले, ज्याच्या मंत्री मंडळाने इथे सुराज्य चालवण्याचे नियम केले त्याचा अभ्यास, त्या नियमांना आज लागू करणे हे सगळे सोडून, तो ब्राम्हण होता की १० बायकांचा नवरा होता असले फडतूस वाद निर्माण करणारे, ब्राम्हण मांसाहारी होते वगैरे छाती ठोकून सांगणारे ह्याच माय भूमीत राहणारे नमकहराम आहेत असे माझे स्पष्ट मत आहे.

    माझ्या आईबापाने मला जन्म दिला, त्यांचे चांगले गूण मी शोधायचे कि सतत मी बेवारशी असल्या सारखे त्यांनी मला जन्माला घातले ही त्यांची चूक होती हे कोण्या माहाभागाचे ऐकून मी मान्य करायचे हे कितपत योग्य आहे?

    ReplyDelete
  12. मुसलमानांनी हे गोंधळ सुरु केले. परंतु इंग्रजांनी हे सगळे गोंधळ राज्य करण्या करता जास्त वापरले, आमची शिक्षण पध्दती नासून टाकली. इतके की आजही ते दुरुस्त करण्या करता शत जन्म कमी असतील. हे गोंधळ माजवण्याला हात भार लावणारे आमचेच संस्कृत - फारसी - इंग्रजी भाषांतरकार आमचेच करंटे इतिहास कार होते व आजही आहेत.

    ReplyDelete
  13. आज दोन्ही भाग वाचले. आवडले आणि पटलेही. पण देव काका म्हणतात त्याप्रमाणेच "तसाही ’तो’ लेख केवळ गंमतीशीर ह्या सदरातच वाचावा असं मला वाटतंय... इतकं गंभीरपणे घेऊ नये."

    ReplyDelete
  14. धन्यवाद हेरंब!
    तो लेख जरी गमतीशीर सदरात मोडत असला तरी आलेल्या प्रतिक्रीया (लेखका कडून इतरांना) आजीबात गमतीशीर सदरात मोडत नहीत. आणि गमतीशीर लेखातील मांडलेले मुद्दे हे नेहमी मांसाहारी लोकांकडून मांअले जाणारे पोकळ मुद्दे आहेत. त्यमुळे मी त्या मुद्द्यांचा पोकळ पणा दाखवण्यासाठी लेख लिहूच नये असं नव्हे.

    ReplyDelete
  15. हिंदू हा धर्म नसून संस्कॄती आहे...आपला मूळ भारतीय धर्म हा वैदिक धर्म ह्या नावाने आहे. बाकी आपण तो कितपत पाळतो हा संशोधनाचा विषय आहे. कारण हिंदू हा शब्दच मुळी फारसी आहे.
    आणि शाकाहार हा बाय रिलीजन वगैरे बोलायच्या गोष्टी, शेवटी बाय रिलीजन म्हटलं तरी ते बाय चॉईसच झालं ना..फक्त युअर चॉईस इस बेस्ड ऑन रिलिजन...खाणारे खातातच..
    असो..अल्टिमेटली..ज्याला जे योग्य वाटते ते त्याने करावे...
    अलताई, तुझं स्पष्टीकरण अगदी पटलं...

    ReplyDelete
  16. मी सौदी मध्ये राहणारा शाकाहारी आहे. ह्या डिस्कशन चा म ला चांगला फायदा होत आहे

    मला पण मांसाहारी लोक हेच प्रश्न विचारतात की भ्याज्या शाकाहारी कश्या?

    ReplyDelete
  17. मांसाहार की शाकाहार ह्याबाबत मतभेद का असावे?? ज्यांना जे आवडते त्यांनी ते खावे. नको ती करणे उगाच देऊ नये...हे पटले . तुमच्या विचारांशी पूर्णतः सहमत. मी स्वतः पूर्ण शाकाहारी आहे. एखाद्यावर आपली मते लादणे, पटत नाही. तुम्हाला आवडतो तर तुम्ही करा मासांहार पण शाकाहारी ना का जबरदस्ती तुमच्या मध्ये ओढता?

    ReplyDelete
  18. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  19. khup changla tarkshuddha lekh ahe, mihi anek lokanshi vegeterian by ethics hyavar charcha kelie , ani bharatiyanpeksha pardeshi loka apla mhanann jast logically samjun ghetat asa majha anubhav ahe.
    fakt mala eka goshticha biological khulasa karavasa vatato,
    ki anda nusatach ubavla tar tyatun pillu yenar naahi, karan jar ekhadya kombdicha milan jhala nasel tar tichya potatil anddyachh falan (fertilisation) hot nahi, ani unfertilised egg madhun kadhich navin jivacha janm hou shakat nahi,
    tyamule joparyant Egg unfertilised ahe, te 'jeev' nahie.
    shastriya sanjnenusar te manushyatlya stree-beeja samaan ahe.

    ReplyDelete
  20. Rhucha, aga biologically jari te anda falit zalela nasel tari tyamadhe asalela drav ha punarutpati sathi aavashyak asa drav aahe. aata pratyekane kaay khave aani kaay khaavu naye ha jyacha tyacha prashna aahe. pan mala kalpanenech kasatari hota. :-)

    ReplyDelete