Tuesday, 4 September 2012

दोडक्याच्या शिरांची किंवा दुधी भोपळ्याच्या सालींची चटणी!

साहित्य: ३ दोडके किंवा १ दुधी भोपळा, पांढरे तीळ (दोडक्याच्या शिरांच्या किंवा दुधी भोपळ्याच्या सालींच्या प्रमाणात तीळ घ्यावेत), फोडणीचे साहित्य, मीठ, हिरव्या मिरच्या
दोडक्याच्या शिरा काढताना

कृती: दोडक्यांच्या शिरा साली काढण्याच्या साधनाने काढून घ्याव्यात किंवा दुधी भोपळ्याच्या साली हलक्या हाताने किसणीच्या सहाय्याने काढून घ्याव्यात.
दोडक्याच्या शिर
साली जर भरपूर असतील तर कडकडीत उन्हात त्या वाळवून घ्याव्यात. जर उन्हात वाळवणं शक्य नसेल तर तशाच घ्याव्यात. नेहमीप्रमाणे असलेल्या साहित्याच्या प्रमाणात हळद-मोहरी-हिंग यांची फोडणी करून घ्यावी. 
फोडणीतील मिश्रण
 त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या चवी प्रमाणे घालाव्यात.  मिरच्या खायची आवड असल्यास तसेच चटणी तिखट चमचमीत हवी असल्यास थोड्या जास्त मिरच्या घातल्या तरी चालतील. बा्रीक आचेवर सगळे व्यवस्थीत परतून घ्यावे. त्यात पांढरे तीळ घालावेत आणि मिश्रण पुन्हा मंद आचेखाली थोडे परतून घ्यावे. मग त्यात दोडक्याच्या शिरा किंवा दुध्याच्या साली टाकाव्यात. 
दोडक्याच्या शिरांची तया
चवी प्रमाणे मीठ टाकावे. शिरा किंवा साली वाळवलेल्या असतील तर चटणी फार परतण्याची गरज लागणार नाही. शिरा किंवा साली ओलसर असतील तर मिश्रण शिरा किंवा साली कुरकु्रीत होई पर्यंत मंद आचेवर परतावे. ही चटणी किमान आठ दिवस चांगली रहाते. चवी मुळे लवकर संपते देखिल. थंडीच्या दिवसात खायला अधिक चांगली. एरवी भाताबरोबर तोंडी लावायला पण खाऊ शकतो किंवा पानाची डावी बाजू सजवण्यासाठी देखिल याचा उपयोग होतो.2 comments:

  1. Dodkyachya shiranchi chatani! mazi avadati:-).

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete