दिनांक सहा मे पासून प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता आमीर खान (आखा) याने (अर्ध)सत्यमेव जयते या कार्यक्रमाच्या माध्यमातून दर रविवारी ११.३० वाजता जाहीरपणे बॉम्बहल्ले चालू केलेत. त्याला दु:खी जनतेचे अश्रू आणि अतिशय मोजूनमापून वेळेत आणल्या जाणार्या टाळ्या यांची साथ आहे. या कार्यक्रमाची तुलना प्रसिद्धी करताना रामायण आणि महाभारत या जनमानसात अतिशय लोकप्रिय मालिकांशी केली. तसे मला आखा चे चित्रपट त्यांच्यातील वेगळेपणासाठी आवडतात. म्हणून त्याच्या बद्धल माझं चांगलं मत होतं. होतं असंच म्हणायचं कारण (अर्ध)सत्यमेव जयते चे भाग बघून आता ते तितकंसं चांगलं राहीलेलं नाही.
सुरूवातीला मी सुद्धा या कार्यक्रमाच्या बाजूने झुकलेली होते आणि आखा व सत्यमेव जयते च्या टीमवर तोंडसूख घेणार्यांची कीव करत होते. पण जसजसे २-३ भाग झाले तसतसं लक्षात आलं की इथे फक्त ठरावीकच बाजू दाखवली जातेय आणि त्यासाठी दुसरी बाजू मुलाखतींदर्म्यान बाहेर आली असली तरी ती जाणीवपूर्वक एडीट केली गेलेली आहे. जाणीवपूर्वक विशिष्ट मुद्द्यांवर टाळ्यांचा कडकडाट आणि विशिष्ट मुद्द्यांवर अश्रूंचा रिमझिम पाऊस दाखवून सहानुभूती मिळवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न चालू आहे.
स्त्रीभ्रूण हत्त्या या विषयात दाखवल्या गेलेल्या गोष्टी सत्य असल्या तरी दाखवलेले अश्रू खूपच कृत्रीम वाटले होते. पण त्यावेळी असं वाटलं की असा कार्यक्रम आपण पहिल्यांदाच पहात आहोत म्हणून असं वाटलं असेल. फेसबुकवर एका व्यक्तीने मला हा कार्यक्रम अगदीच ओरीजीनल नाहीये तर Ask Oprah Winfrey या अमेरिकन कार्यक्रमावर आधारीत संकल्पना आहे असे सांगीतले होते. मला त्यावेळी हा कार्यक्रम नक्की काय आहे हे माहीती नव्हते. थोडी चौकशी केल्यावर समजले की Ask Oprah Winfrey या कार्यक्रमाची होस्ट Oprah Winfrey ही एक अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेली आणि लहानपणीच शारीरिक अत्याचारांना सामोरं जावं लागलेली एक स्त्री होती. Ask Oprah Winfrey या कार्य्क्रमाद्वारे लोकांना बोलतं करून त्यांच्या दु:खाविषयी चर्चा केली जायची. याच कार्यक्रमाद्वारे अतिशय प्रसिद्ध होऊन तिने आपल्या करीअरला बुस्ट दिला होता. आता या कार्यक्रमात आणि सत्यमेव जयते या कार्यक्रमात मूलभूत फरक होस्ट मधेच आहे. आखा हा चांदीचा चमचा तोंडात धरून जन्माला आलेल्यांपैकी आणि ज्या दु:खांची चर्चा करून तो आणि त्याचे सहकारी जो पैसा कमावत आहेत त्यापैकी एकाही दु:खाची झळ न बसलेला आहे. त्यामुळे ऑपराह विन्फ्री ही जशी इतरांच्या दु:खाशी स्वत:चे दु:ख जोडू शकत असे त्याप्रमाणे इथे कुठलाही भाग नाहीये.
जर आखा चे हेतू इतके स्वच्छ असते तर त्याच्या तथाकथीत रिसर्च टीमने दाखवलेल्या केसेसची दुसरी बाजूही दाखवली असती. हा कार्यक्रम फक्त विशिष्ट लोकांच्या, विशिष्ट संस्थांच्या प्रसिद्धीसाठी आखा ची प्रसिद्धी वापरून केलेला कार्यक्रम असे दुसर्या भागानंतर अधिक जाणवायला लागले. तिसर्या भागात तर चक्क त्याचा एकांगीपणा उघडपणे समोर यायला सुरूवात झाली. अशीही सध्या अनेक उदाहरणे आहेत की जी इंडीयन फॅट वेडींग करत असतील पण वधु पक्ष आणि वर पक्ष सगळा खर्च समान वाटून घेतात. अशीही अनेक लग्न होतात की जी अत्यंत कमी खर्चात केली जातात. अनेकवेळा तर विविध समाजातील लोकांचे सामूदायिक विवाह लावले जातात. पण पॉझिटीव्ह बाजू दाखवताना फक्त एका मुस्लीम संघटनेचे उदाहरण दाखवले गेले. मुस्लीम समाजात अशीही अनेक उदाहरणे आहेत की मुलीचं लग्नं करून तिला दुबईत नेऊन विकतात. भारतात येऊन पुन्हा नविन मुलीशी लग्नं करतात.
हेल्थ केअरच्या मुद्द्याआंतर्गत जे दाखवले गेले त्यात तर पक्की खात्रीच पटली की त्या कर्नल की मेजर राय यांची बाजू प्रसिद्धीस आणण्यासाठी केलेला खटाटोप. त्यासाठी आखाला काहीतरी नक्कीच मिळाले असेल. इतकं एकांगी दाखवलंय त्यात. हेल्थकेअरचा मुद्दा नक्कीच महत्त्वाचा आहे पण त्यात आपल्याकडे मेडीकल इन्शुरन्सच्या नावाखाली ज्या कंपन्या पैसा कमावतात त्याविषयी काहीच उल्लेखही नाही. हाच का यांचा परिपूर्ण रिसर्च? ऑनर किलींगच्या भागात खापच्या कार्यपद्धतीवर घणाघाती हल्ला चढवताना खाप भारतात असूनही भारतीय कायदा मानत नाही तर स्वत:चा कायदा मानते. मग इथे आखा सोयीस्कररित्या भारतीय मुस्लीम मानत असलेल्या मुस्लीम पर्सनल लॉ, वक्फ बोर्ड इ. मुस्लीम ऑर्गनायझेशन्सच्या कायद्यांबद्धल, फतव्यांबद्धल काहीच बोलत नाही. असं कसं? खापच्या कार्यप्द्धतीतील चांगल्या बाजू मुद्दामून समोर येऊ दिल्या नाहीत. असं का?
अपंग मुलांचा मुद्दा असलेल्या भागात चक्क हिंदू धर्माच्या कर्म या संकल्पनेचीच खिल्ली उडवली. अपंगत्त्व हे पूर्वकर्माचं फळ असतं अशी अंधश्रद्धा असेल काही लोकांमधे पण मलानाही वाटत की अधिकाधिक जनता असं मानते. एका दृष्टिने पाहीलं तर जन्मजात अपंगत्त्व हे कशामुळे येतं याचा अभ्यास केला तर अधिकाधिक कारणं ही लोकांना गरोदर बाईची काळजी नीट न घेतल्याने, तिला नीट पोषक असा आहार न मिळाल्याने, बाळंत होताना काही चूक होऊन बाळाच्या नाजूक शरीराला दुखापत होणे, किंवा पोलीओचे डोस न देणे अशी मेडीकल कारणंच सापडतात. आता लोकांमधे यासगळ्याची जागरूकता निर्माण करणे अशा अंगाने विचार या कार्यक्रमात यायला हवा होता. पण हे मुद्दे स्पर्शिले सुद्धा गेले नाहीत. एम-आर आणि सीपी च्या केसेस तर दाखवल्याच नाहीत. अशा मुलांसाठी काम करणार्या अनेक संस्था आहेत त्यांचीही माहीती दाखवली असती तर काही पॉझिटीव्ह दाखवलं असं वाटलं असतं.
आता अजुन सात बॉम्ब्स पडायचे आहेत. आधीच्या पाच भागांतील एकूणच एकांगी हाताळणीमुळे पहिल्या भागापेक्षा या कार्यक्रमाचा प्रेक्षकवर्ग कमी झालेला आहे याची खात्रीच आहे. म्हणूनच या कार्यक्रमाचं नाव (अर्ध)सत्यमेव जयते असंच असायला हवं.

your comment are very narrow minded.in each apisode amir showing positive side.dont you think he is far better than his companions?havent u seen some of his films touching sensitive matters.Of couse he is been paid good amount for his anchoring,what he deserves.i insists, he is doing something which i found no bollywood star is doing.amir making people sensitise to unnoticiable but still very grave issues which atleast i appreciate.whiat wrong if amir laugh at hindu phylosophy,its limitation of hindu phylosophy.i m sure he must have same view for muslim laws as khaf.
ReplyDeleteNo I do not think the way you are thinking. My opinion about it being highly biased is based on watching 5 episodes of the program. I do not have any sympathy for any of the Bollywood actors and actresses. They are anywhere only for making money. That is the only truth. I am not against making money I am against the Hippocratic and biased nature of making money.
Deleteआमीर खान
ReplyDeleteमराठी शिकून घेतलेच आहे.
आता समाजसेवेचे पुण्य पदरात पाडून पुढेमागे ह्या मुंबईकराला राजकारणात यायचे डोहाळे लागले आहेत
म्हणून भविष्यकाळाची बेगमी म्हणून
सत्यमेव जयते
निनाद कुलकर्णी शतपावलीवर स्वागत. हम्म, तुम्ही म्हणताय तसं असूही शकतं.
ReplyDeleteमाझ्या मते आमिरने सुरुवात त्याच्या स्व:ताच्या घरापासून (फिल्म इंडस्ट्री) करावयास हवी होती. राजकारणा सारखीच ती सुद्धा किती कळकट्लेली आणि बरबटलेली आहे ते जरा लोकांना दाखव.... नंतर दुनियादारी खुशाल कर म्हणजे तुला 'मान' देवू.....
ReplyDeleteअगदी खरंय आर सी. फिल्म इंडस्ट्रीचा फार मोठा प्रभाव जनतेवर आहे. त्या इंडस्ट्रीमधे तसेच राजकारणी, सरकारी बाबू यांमधेच अधिक भ्रष्टाचार आहे. सुरूवात तिथून कर म्हणाव.
Deleteभाग्या, मला असं आजी्बात वाटत नही की अत्तापर्यंत जे चालू होतं त्याबद्धल कोणीच बोललेलं नाही. तुझं असं स्टेटमेंट म्हणजे जे लोक गेली अनेक वर्षे विविध क्षेत्रात स्त्रीभ्रूण हत्त्या, हुंडाबळी, हेल्थकेअर्यामधे कार्य करत आहेत त्यांचा अपमान करणारे आहे. आमीर खान कोण मोठा लागून गेला आहे सोकॉल्ड रीसर्च करणारा आणि दुसर्यांनी शिकवणारा? सगळं तर एकांगी दाखवतोय.
ReplyDeleteshantisudha I am agree with you.satyamev jayte cha host amir khan ahe mhanun sagalejan to pahatat dusar gosht hya theme var anek serials yeun gelya ahet jashi kiran bedi yanchi "aap ki kacheri" tevha pan aslech issue ghetale gele pan tyachi evadhi characha kahich zali nahi. samjat tar problems khup ahet pan tyana solve karnare khup kamich ahet. tv var asanare asale progrmme keval channel cha TRP vadhava mhanun banvlele astat. ani rajyat ji stribhrun hatyechi mohim chalu ahe ti satyamev jayate yaychya adhipasunah chalu ahe tyacha credit amir khan la dyaychi ajeebat garaj nahi. ani jar satyamev jaytecha evdhach jar impact aahe tar 26/11 madhil pidit lokaasathi ekada show organise karava ani nyay milvun dyava mag tharvuyat, Amir khan kharach zoplelya bhartala jaga karu shakto ka te.....
ReplyDeleteधन्यवाद दीपेश. हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगीतलात की याआधी किरण बेदी च्या "आप की कचहरी" या कार्यक्रमात हे विषय हाताळले गेले आहेत. कारण मी कधीच तो कार्यक्रम पाहीलेला नाही. आणि आमीर खानच्या या कार्यक्रमामुळे ्खरंच फरक पडतोय असं म्हणणं धाडसाचं आणि इतर या विषयांवर वर्षांनुवर्षे कामकरणार्या लोकांचा अपमान ठरेल. पण बॉलीवुडच्या चमकोगिरीपुढे फार कमी लोकांचे डोळे दिपत नाहीत.
Deleteआज च्या सगळी कडून भ्रष्टाचाराच्या युगात हेही नसे थोडके ?????
ReplyDeleteलोक जेव्हा आमीर खानच्या पैशाच्या शेतीला प्रामाणिक प्रयत्न वगैरे म्हणतात तेव्हा मला त्यांची कीव कराविशी वाटते. या आधी अनेक लोक या प्रश्नांवर अनेक वर्षे कार्य करताहेत (पैसे उगवण्याचं नाही). तुमची अशी स्टेटमेंट्स म्हणजे त्या सगळ्यांचा घोर अपमान आहे.
Deleteधन्यवाद, एकदम मर्मभेदी आणि अचूक परिक्षण.
ReplyDelete’सत्यमेव जयते’ न आवडणारा/टाळणारा आंतरजालावर मी एकटाच माणुस आहे की काय अशी भिती मला वाटत होती.
पहिल्या भागाची उत्कंठा होती, त्याचे कौतुक वाटले. दुस-या भागातला काही भाग अनावश्यक आणि सेल्समनशिप वाटला, तिस-या भागानंतर हळुहळु ह्या कार्यक्रमाचा ’तकलादु ढाचा’ समजायला लागला आणि बघण्याची इच्छा संपत चालली. गेले २ भाग बघितले नाही, फ़ार काही मिस्स केले किंवा नुकसान झाले असे वाटत नाही.
बादवे, लोकांना ’सत्यमेव जयते’ ही क्रांती वाटते. मजा आहे.
- छोटा डॉन
धन्यवाद छोटा डॉन. शतपावलीवर स्वागत. मी यु-टुय्बवर (अर्ध)सत्यमेव जयतेचे भाग आवर्जुन बघते म्हणजे नक्की लोकांना कसं आणि किती घोळात घेतलं जातंय हे समजतं. :-)
Deleteसमाधान !! मी एकटाच नाही ! लोग मिलते गएँ और कारवाँ बनता गया ! :) आखा फ़ार मोठी क्रांती घडवतोय हे जे चित्र माध्यम-सोने साइट्स लोकांपुढे आणत आहेत ते फ़ार हास्यास्पद वाटतं मला. :)
ReplyDeleteहो ना. मला तर हे असं चित्रं रंगवणं (आखा फार मोठं सामाजिक कार्य करतो आहे आणि त्याच्या टीमचा रिसर्च म्हणजे किती महान रिसर्च वगैरे) म्हणजे लोकांचं लक्ष इतर महत्तवाच्या रजकीय घडामोडींपासून दूर ठेवण्यासाठी जाणूनबुजून केलेला बनाव वाटतो.
Delete