Thursday 26 August 2010

इतिहास नक्की कोण बदलतंय?

इतिहास नक्की कोण बदलतंय? हे राजकारण कुठे नेतय आपल्याला?

*********************************************

परदेशातील संशोधक की केंद्रातील सरकार? पुरावा घ्या.

सध्या महाराष्ट्रात सगळीकडे छत्रपती शिवाजी महाराजां विषयीच्या काही मजकुरावरून संभाजी ब्रिगेड सारख्या गटांनी वादंग उठवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजां विषयी आपल्या लाडक्या कॉंग्रेसचे सरकार असलेल्या केंद्रात आणि केंद्रीय अभ्यासक्रमा मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नक्की काय भावना आहेत, त्यांची तसेच मराठा साम्राज्याची महती कशा प्रकारे आणि काय पातळीवर शिकवली जाते हे आपणच पहा.
सीबीएसई सातवी इतिहास धडा १०
त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख फक्त शिवाजी असे संबोधन वापरून फक्त २-३ वाक्यांत आला आहे. पेशव्यांचा उल्लेख २ वाक्यांत आला आहे. संपूर्ण सीबीएसई च्या अभ्यासक्रमात मराठा साम्राज्याच्या नशिबी फक्त ४७३ शब्द आले आहेत. संभाजी ब्रिगेड सारख्या लोकांची मजल फक्त भांडारकर संस्थेवर हल्ला करण्यात आणि दादोजी कोंडदेवांचा पुतळा लाल महालातून हटवण्या पर्यंतच आहे.  केंद्रातील सरकारला जाब विचारण्याची ना कुणाची इच्छा आहे ना हिम्मत. 
सीबीएसई च्या इतिहासाच्या पुस्तकां मध्ये मुघलांना केवढे स्थान आहे हे जर सोबत एनसीईआरटी ची लिंक दिलेली आहे तिथे बघीतल्यास दिसेलच. बरं हा युक्तीवाद मानला की भारत केवढा मोठा आहे मग सगळ्या प्रदेशांतील गोष्टी लिहीणार काय? नाही मान्य. पण कोणत्या गोष्टी आणि कशा पध्दतीने लिहायच्या हे तर या लोकांच्या हातात आहे. आता महाराष्ट्रात मराठी शाळा बंद करून इंग्रजी शाळा आणि सीबीएसईच्या शाळांचे पेव फुटले आहे (गुणांच्या राजकारणासाठी). मग खरा इतिहास मुलांना कसा आणि कोण सांगणार? बरं ऐतिहासिक महत्त्व असलेल्या पुण्यासारख्या शहरां मधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या वास्तूंवर हल्ला करायचा त्यांची तोडफोड करायची. मग पुढच्या पिढीला काय तोडफोडीचा मुघल इतिहास शिकवत बसणार? ज्या मराठा साम्राज्याच्या नावाने ही सगळी तोडफोड चालू आहे त्या साम्राज्याचा मागमूसच जर इतिहासात राहीला नाही तर काय उपयोग?

याला अजुन एक कारण सुध्दा आहे. जर इतिहासाचा अभ्यासक्रम बनवणारी समिती बघीतली तर त्यावर एकही महाराष्ट्रीय व्यक्ती नाही. ९०% लोक दिल्ली मधील आहेत. एक व्यक्ती पुणे विद्यापीठातील आहे पण ती मराठी नाही. सोबत त्याचाही दुवा देत आहे. म्हणजे हा सूर्य हा जयद्रथ होईल. 

जेम्स लेन चं पुस्तक असे किती लोक वाचणार आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणीही उठुन काहीही लिहीलं आणि कुणाच्याही गावगप्पांचा परिपाक म्हणूनही काहीही लिहीलं गेलं तरी आमची छत्रपती शिवाजी महाराजांवरची श्रध्दा इतकी कमकुवत नाहीये की लगेच तिला तडा जायला. मुख्य म्हणजे याचं श्रेय महाराष्ट्रातील पूर्वीच्या चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकांना तसेच श्री बाबासाहेब पुरंदरे यांसारख्या इतिहास संशोधकांना जाते. त्यांनी आजतागायत महाराष्ट्रातील कणाकणात छत्रपती शिवाजी महाराजांना बसवलं आहे.
ज्या समर्थ रामदासांनी स्वत:च्या समर्थ वाणीने संपूर्ण महाराष्ट्रात (मुघल साम्राज्याच्या वर्चस्वामुळे) आलेली मरगळ झटकली अशा समर्थांचा एकेरी नावाने उल्लेख आणि त्यांच्या विषयीच सध्या अपप्रचार करणे चालू केले आहे. संभाजी ब्रिगेड वाल्यांना जर असं वाटत असेल की दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे शिक्षक नाहीत (तसे पुरावे ते मान्य करत नाहीत) तर मग त्यांनी ऐतिहासिक पुरावे द्यावेत की दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे शिक्षक नसून त्यांना इतर शिक्षक शिकवायला होते. त्यांची नावे जाहीर करावीत. उगाच राजा शिवछत्रपती सारख्या पुस्तकांतील अर्धवट मजकूर (स्वत:ला पाहीजे ते शब्द उचलून आणि अतिरीक्त शब्द टाकून बनवलेली अशुध्द मराठी वाक्ये) संभाजी ब्रिगेडच्या वेबसाईट वर घालून श्री बाबासाहेबांविषयी अपप्रचार करू नये. (पहा) नुसत्या ब्राम्हण कुळात जन्म घेवून कोणी खरा ब्राम्हण होत नाही तसेच नुसत्या क्षत्रिय कुळात जन्म घेवून कुणी क्षत्रिय होत नसतं. ब्राह्मणाने जर ब्राह्मणाचे कर्म म्हणजे विद्याध्ययन, विद्यादान केलं नाही तर त्याला/तिला ब्राह्मण म्हणता यायचं नाही तसंच जर जन्माने क्षत्रिय रक्षण न करता तोड फोड करत असेल तर तो कसला आलाय क्षत्रिय? असेल हिम्मत संभाजी ब्रिगेड वाल्यांची तर त्यांनी दिल्लीत बसलेल्या केंद्र सरकारला जाब विचारावा नाहीतर सरळ बांगड्या भराव्यात.
भारत सरकारची अधिकृत वेब साईट आहे तिच्यावर तर  भारताच्या मध्ययुगीन इतिहासात तसेच इतर इतिहासांत मराठा साम्राज्याचा साधा उल्लेख नाही. महाराष्ट्र राज्याच्या  विभागात खाली दिल्या प्रमाणे उल्लेख आढळतो.
While the Bahamani rule brought a degree of cohesion to the land and its culture, a uniquely homogeneous evolution of Maharashtra as an entity became a reality under the able leadership of Shivaji. A new sense of Swaraj and nationalism was evolved by Shivaji. His noble and glorious power stalled the Mughal advances in this part of India. The Peshwas established the Maratha supremacy from the Deccan Plateau to Attock in Punjab.

यासाठी केंद्रातील कॉग्रेस सरकारला संभाजी ब्रिगेड तसेच महाराष्ट्र सरकार जाब का विचारत नाही? कारण संभाजी ब्रिगेडचा हा सगळा स्टंट फक्त राजकिय हेतूने प्रेरीत आहे. शिवाजी महाराजांच्या काळात देखिल सूर्याजी पिसाळ होते आणि आत्ता देखिल आहेत. म्हणूनच राजकिय हेतूने प्रेरीत होवून आधीच दुरावलेल्या मराठी समाजात अजुन फूट पाडण्याचे कारस्थान रचले आहे.

यांचे काय करायचे ते आपणच ठरवा!

19 comments:

  1. राजांच्या आणि समर्थांच्या नखाची सर सुद्या या बदलू इतिहासकारना येणार नाही.
    विकृत गिधाड आहेत आहेत हि राजकारणाची पोळी भाजायला इतिहास बदलायला निघालेत हे. पण
    आमची छत्रपती शिवाजी महाराजांवरची श्रध्दा इतकी कमकुवत नाहीये की लगेच तिला तडा जायला.

    ReplyDelete
  2. शान्तिसुधा,
    सप्रेम नमस्कार,
    सर्व प्रथम आपले,अतिशय सडेतोड,योग्य,अभ्यासपूर्ण विचार नेमक्या शब्दात मांडल्या बद्दल खूप खूप अभिनंदन.मला प्रचंड आवडले.आत्ता थोडा घाईत आहे म्हणून डिटेल प्रतिक्रिया नंतर देतच आहे.

    ReplyDelete
  3. अगदी योग्य शब्दात लिहिले आहे.. महाराज सर्वांनाच आदरस्थानी आहेत आणि ही लोकं तर महाराजांनीच त्यांची नेमणुक केल्यासारखी वागत आहेत.. कोण कुठली ती B-grade उगाचच माज करत फिरत आहेत पण काळाच्या ओघात शिवचरित्रच तेवढेच ते टिकुन राहिल ते मात्र बाबासाहेब पुरंदर्‍यांसारख्यांमुळेच आज राजे शिव छत्रपती आणि जाणता राजामुळेच शिवचरित्राचा प्रसार झालाय नाहीतर या सरकारने तर शुरवीरांना कधीच पडद्याआड पाठवले आहे.. बाजीराव पेशव्याबद्दल आत्ता किती लोकांना ठाऊक असेल कोणास ठाऊक.

    ReplyDelete
  4. त्यांनी स्वत:च्या संघटनेचं नाव शिवाजी ब्रिगेड असं नाव न ठेवता संभाजी ब्रिगेड असं का ठेवलंय... यावरूनच त्यांची मानसिकता काय ते ओळखा.. जास्त लिहीत नाही उगाच वाद होण्याची शक्यता..

    ReplyDelete
  5. ताई बरीच माहिती गोळा केलीस कि ही पोस्ट लिहायला.ह्यांना पुरावा हवा आहे न घ्या हे पुरावे.बघू तुम्हची हिंमत.
    मी तर कालच याबाबतीत माझ्या ब्लॉगवर लिहील आहे.अजून काय लिहू.इतर वाचकांनी माझ्या ब्लॉगची ही लिंक पहावी.
    http://sagarkinaraa.blogspot.com/

    ReplyDelete
  6. शिक्षण मंत्रालयातली या विषयाची उदासीनता लवकर जावो.
    तसे नाना फडणवीस असेपर्यंत इंग्रज मराठी राज्यात शिरकाव
    करू शकले नाहीत.इंग्रजांनी ही गोष्ट लिहून ठेवली आहे.
    आपला सर्व इतिहास फंदफितुरी,भाऊबंदकी,मत्सर,लांगुलचालन
    यांनी भरला आहे.त्यामुळे ऐतिहासिक सत्याला सामोरे जायला भारतीय घाबरतात.
    NDA आणि मिलिटरी colleges मध्ये शिवाजी महाराज
    आणि त्यांची युध्द-तंत्रे शिकवली जातात.थोरले पेशवे ब्राह्मण त्यामुळे
    त्यांचे कर्तुत्व झाकून ठेवले आहे.पैसा हा धर्म इथे आदर्श व प्रतिष्ठा पावला आहे

    ReplyDelete
  7. गल्लीत दादागिरी करत फिरणारे टवाळ टपोरी असतात ना तसे आहेत हे. दुर्दैवाने त्यांना तरुणांना हे सुद्धा ठावूक नाही कि ते काय करत आहेत. काही लोकांच्या राजकारणाचा बळी गलेले आहेत ते. असो...
    मोठ्या ठिकाणी जाऊन काही काम करून दाखवतील असे कर्तुत्व ह्यांच्या अंगी नक्कीच नाही.

    आणि आपल्या इतिहासाचे म्हणशील तर प्रत्येक गोष्ट सरकारवर सोपवून आपण आता निर्धास्त बसू शकत नाही. कारण ते किती शंध आहेत ते आपण बघतोच आहोत. आता हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे कि आपण आपला प्रेरणादायी इतिहास पुढच्या पिढीला कळवावा. त्यासाठी हवेतर प्रत्येकाने आपापल्या शाळेत जाऊन तशी छोटी व्याख्याने घ्यावीत. स्वतः अधिक वाचन करावे, लिखाण करावे. आपल्यावरची जबाबदारी वाढली आहे. पर्कीयांपेक्षा स्वकीयांनीच नेहमी जास्त घात केलेला आहे आपला. तेंव्हा.....

    मला राजांचे सामान्य जनतेला उद्देशून लिहिलेले एक पत्र आठवले. ते इकडे देतोय. राजे म्हणतात,"सर्व ज्ञातीने कस्त करून शत्रु पराभवाते न्यावा.

    http://itihasachyasakshine.blogspot.com/2009/04/blog-post_11.html

    ReplyDelete
  8. भारताचा इतिहास लिखित स्वरूपात कधीच उपलब्ध नव्हता. तो कायम एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे तोंडी गोष्टींद्वारे आला आहे. रामायण झालं का नाही? या प्रश्नाचा उत्तर कोणी देऊ शकतं? त्याविरुद्ध पण आंदोलन करणार का??? मागतील मग लेखी पुरावा!!!

    केवळ Documentation चा प्रश्न आहे आणि याच कारणाने कोणी जर संपूर्ण इतिहास जर खोटा ठरवला तर काय त्याला काहीच अर्थ नाहीये.

    ReplyDelete
  9. चेतन पवार म्हणतात तसे खरोखरच रामायण झालेय. आज दोन तीन वाक्यांत नोंद सापडतेय अजूनद दहा वर्षात कोण शिवाजी आणि कोण समर्थ अशी विचारणा झाल्यास नवल ते काय.

    लेख आवडला. खूप सविस्तर व दाखलेपूर्ण.

    ReplyDelete
  10. रोहन, आपण सरकारवर जबाबदारी टाकून शांत बसू शकत नाही मान्य. पण जर उद्या आपण आपापल्या शाळेत जाऊन हा खरा इतिहास आहे म्हणून सांगायला लागलो आणि शाळेने किंवा काही मुलांच्या पालकांनी कंप्लेंट केली की आमच्या मुलांना अभ्यासक्रमा बाहेरचं सांगत आहेत. सध्याच्या आपल्याकडच्या शाळांची स्थिती भयंकर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास गोष्टीरूपाने महाराष्ट्रात सांगू शकतो पण इतर भारताचं काय? अरे या आधीच्या पुस्तकात निदान शिवाजी महाराजांचे छायाचित्र तरी असायचे पण आताच्या पुस्तकात ते पण नाही. इतिहासाच्या पुस्तकात, इतिहासाच्या नावाखाली नको त्या गोष्टी देत असतील तर काय उपयोग? आभाळच फाटलं तर अतिरीक्त वेळात गोष्टी सांगून किती इतिहास संक्रमीत करणार? अरे रामायणाच्या गोष्टी आपल्याला आपल्या आई वडीलांनी सांगीतल्या म्हणून आपल्याला रामायण माहीती. पण हेच इतिहास कार त्याला फक्त एक काव्य म्हणतात. आता ह्या मौखिक परंपरे मुळे आपल्याकडे रामायणाचे, महाभारताचे लिखित पुरावे नाहीत पण आर्कीऑलॉजीकल पुरावे तरी कुठे मानले जातात? पण छत्रपती शिवाजीमहाराजांच्या इतिहासाचे लिखित स्वरूपातील तसेच दस्तैवज स्वरूपतील पुरावे असून सुध्दा त्यांचा इतिहास जर सरकारने दडपला, बाहेरच येवू दिला नाही तर काय उपयोग? ह्याला कुठेतरी आळा नको बसायला?

    ReplyDelete
  11. अलताई,
    हे सगळे पुरावे डोळे उघडणारे आहेत. खासकरून, जो छोटासा उल्लेख केलाय ना मराठा इतिहासाचा, तो तर मति कुंठित करणारा आहे. फक्त 'शिवाजी' हा उल्लेख मला तितकासा खटकला नाही, पण असा उल्लेख जर फक्त महाराजांचाच करण्यात आला असेल तर मला आक्षेप आहे. कारण जगभराच्या इतिहासांमध्ये सहसा सगळ्याच राजांची एकेरी संबोधने असतात. कारण तो वस्तुनिष्ठ इतिहास ह्या फॉर्मॅट मध्ये लिहिला जातो! असो. मराठा साम्राज्याच्या इतिहासाला हेतूपुरःसर डावलण्यात आलंय हे नक्की!

    ReplyDelete
  12. विभि,
    मला असं वाटतं तू आणि रोहन एकदा एक उत्सुकता म्हणून ती इतिहसाची पुस्तकं अगदी पाचवी ते दहावी डोळ्याखालून घाला आणि मग मला तुमचं निरीक्षण सांगा. माझं निरीक्षण असंच आहे की मुघल इतिहास जास्त दिला आहे. राजपूत, महाराणा्प्रताप, झांशीची राणी, राजा पुरू यांविषयी काहीही दिलेलं नाहीये. मराठा साम्राज्याला तर कसं हेतूपुरस्सर डावलंल गेलंय ते दिसलंच आहे. राजस्थानच्या राजघराण्यांचा (राजपूत राजे आणि त्यांच्या राजकन्या) उल्लेख तर कोणत्या राजकन्येने कोणत्या मुस्लीम राजाशी लग्न केलं आणि त्यांच्या मुलाचं नाव काय. इ. इ.
    मला तर हा सगळा मुघल इतिहास वाटतो आहे. लवकरच मी अजुन काही डोळे उघडणार्‍या पोस्ट्स टाकणार आहे.

    ReplyDelete
  13. अपर्णा खरचं प्रचंड चिडचिड होते ह्या बातम्या ऐकून, वाचून..... अधोगती आहे ही सगळी!!

    तुझी पोस्ट खणखणीत झालीये.... आणि खरचं आहे गं आपल्या राजांप्रतीच्या, जिजाऊंबद्दलच्या, समर्थांबद्दलच्या आणि दादोजींबद्दलच्या देखील श्रद्धा कमकुवत नाहीच अजिबात असले छुट्पुट हल्ले नक्कीच परतवले जातील....या अपप्रचार करणाऱ्या लोकांची त्यांच्या कोत्या मनोवृत्तीची आणि विकृत बालबुद्धीची मात्र किव करावी तेव्हढी थोडी....

    ReplyDelete
  14. द्वेषात त्यांच्या
    त्यांचाच पराभव आहे
    किव करा त्यांची
    त्यांचा विवेक मेला आहे...
    द्वेष ही त्यांची
    आता संस्कृती झाली आहे
    त्यांच्या पतनाची आता
    वेळ जवळ आली आहे....
    किती आले किती गेले
    इतिहास काही बदलला नाही
    त्यांनी तर अटकेपार झेंडे नेले
    ग्रेड वाल्यांना तर अजुन
    महाराष्ट्राच्या बाहेरही जाता आले नाही..

    ReplyDelete
  15. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  16. मी अभीजीत सांडभोर,

    मी एकच आव्हान करेन की आपण आपापल्या परीने जेवढे श्यक्य होइल तेवढे महाराजांची कीर्ति वाढवली पाहिजे. बाइक , टीशर्ट, खड्याल, घरात , बैग जिथे शक्य होइल तिथून महाराजांबद्दल मजकुर, फोटो, मूर्ति इतर अनेक प्रकारे वापर करून आपण प्रचार केला पाहिजे की इतराना अनुभव करून द्यायचा आजही महाराजसाठी आम्ही जीव हातात घेउन फिरतो, लाखो जिव त्यांच्या साथी जिव द्यायला तयार आहोत. कोन्या राजकर्न्यांसाठी नाही. शिवाजी महाराज असे आहेत की त्यांची कोनाशिच तुलना होऊ शकत नाही कारन ते यूगद्रश्ते (युगान उगान नंतर) यूगपुरुष आहेत आहेत. असे महान यूगपुरुष
    युगान युगान नंतर जन्म घेतात. आपन त्यांचा आदर्श ठेवला पाहिजे अणि फक्त ठेउन नाही तर तो योग्य प्रकारे सांगुन तो वाढवला पाहिजे.

    जर कोणी विचारले की तुला कोण कीवा कोनासारखे वायाचे आहे तर उत्तर उत्तर काय दयाल अम्बानी, टाटा, एश्वर्या, शारुख, अमिताभ हे देणार की खालील उत्तर दयाल.

    एकच आले पाहिजे माला त्या क्षेत्रातला शिवाजी बनायचे. जेवा तुम्ही अशी भावना ठेवाल तेव्हा आख जग पण त्याला नाकारु नाही शकत. आणि तेव्हाच महाराजां बद्दल बोलायची कोनाचिच हिम्मत होणार नाही. आणि अप्पोआप शिवाजी महाराजांच्या इतिहासाची चाललेली विटाम्बना थाम्बेल.

    मराठीचा अभिमान रखा, जपा, वागंयातुन दाखवा, महाराजांचा आदर्श बालगा

    ReplyDelete
  17. अभिजीत,

    शतपावलीला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. शिवाजी महाराजांची चित्रं, पुतळे सगळीकडे नुसते लावून काहीही होणार नाही. जो पर्यंत शिवाजी महाराज आणि त्यांच्यासारखे इतर महापुरूष, युगपुरूष यांचे गुण, त्यांचे तत्त्वज्ञान आत्मसात करून त्याप्रमाणे वागत नाही तोपर्यंत त्यांचा आपण खरंच आदर राखतो आहोत असं म्हणता येणार नाही. उदा. शिवजयंतीच्या किंवा आंबेडकर जयंतीच्या किंवा बुध्दपौर्णिमेच्या दिवशी ध्वनीक्षेपकाच्या मोठमोठ्या भिंती लावून विकृत नर्तन या महापुरूषांच्या मूर्तींसमोर चालू असते ते व्हायला नको. शिवाजी महाराजांच्या नावाने जी तोडफोड चालू आहे ती बंद झाली पाहीजे. गो, ब्राह्मणप्रतिपालक अशा शिवाजी महाराजांच्या नावाने सध्या अवघ्या महाराष्ट्रात जो ब्राह्मण्द्वेष पसरवला जात आहे तो थांबवायला हवा. आणि मगच खरा इतिहास दडपणार्‍या लोकांकडे बघितलं पाहीजे.

    ReplyDelete
  18. या सर्व प्रकारांना कोणतेही एकच कारण नाही. या गोष्टी आपापसात जोडलेल्या आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र मराठी शाळांची कमी होत जाणारी संख्या, पालकांचा शिशुवर्गापासून इंग्रजी आणि सीबीएसई-आयसीएसई च्या शाळांकडे वाढणारा कल, ही स्लो-पॉइझनिंग सारखी कारणे यामागे आहेत. जोपर्यंत केंद्रात काँग्रेस चे ‘निधर्मी’ सरकार आहे, तोपर्यंत केंद्रीय शिक्षण संस्थानांवर कपिल सिब्बल सारख्यांचाच अंकुश राहणार. त्यामुळे ते असेच तथाकथित ‘सेक्युलर’ अभ्यासक्रम तयार करीत राहतील. कारण, महाराजांचा किंवा पर्यायाने हिंदुत्वाचा-हिंदु साम्राज्याचा समावेश अभ्यासक्रमात करण्याने शिक्षणाचे ‘भगवाकरण’-saffronisation होईल, आणि मग यांना एकगठ्ठा मते मिळणार नाहीत.

    दादोजी कोंडदेव आणि बाबासाहेबांचा अपमानकारक उल्लेख-संभाजी ब्रिग्रेड-शिवधर्म-जेम्स लेन-पुरुषेत्तम खेडेकर इ. विषयांवर तर आपण विचार करायचा नाही हेच ठरवावे. दुर्लक्ष करणे हाच चांगला उपाय आहे. ओरडून ओरडून हे किती ओरडणार ? काही दिवसांनी होतील चूप. त्यांना इतर काही कामेच नाहीत, म्हणून ते हेच खुटीउपाड धंदे करीत बसतात. आपण त्यांच्याकडे लक्ष देणे आणि त्यांना उत्तरे देत बसणे म्हणजे आपला बहुमूल्य वेळ फुकट घालवणे आहे. तो वेळ समाजकार्यात लावला, तर कितीतरी जास्त उपयोग होतो.
    असो. लेख नेहमीप्रमाणेच उत्तम आणि तपशीलवार झाला आहे. सोबत लिंकही दिल्यात हे चांगले झाले.

    ReplyDelete
  19. MItra Ho,
    Tumha Saglyanchya pratikriya baghun Khrach Chhan Vatla... Aaj hi Chatrapati Shivaji Maharajacha naav ghetla ki Angaat ek prakarchi Urja nirmaan hote ani kahi tari changla karnyachi prerna nirmaan hote..

    Ani Samajat je vait bolla jatay tyabaddal Jabar Santaap yeto ahe Kharach he kadhi thmbnaar.. ??

    ReplyDelete