{ताजा कलम: हे पोस्ट पूर्ण वाचल्यावर आपल्याला काहीही समजलं नाही आणि जर डोक्यात खूप गोंधळ निर्माण झाला तर त्याला लेखिका जबाबदार नाही. }
देका: नमस्कार मंडळी या गप्पा मारायला.
अल: नमस्कार बुवा ही घ्या फिल्टर कॉफी (_)० (_)०
लॅरी: हाय फोक्स, मी लॅरी पेज. धन्स फॉर कॉफी. अगदी गरज होती मला.
अल: ओह लॅरी, आज इकडे कसे काय तुम्ही?
लॅरी: काय आहे की आम्ही बझ्झ चालू केल्यावर आमच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे बझ्झ ची प्रसिध्दी चेक करण्यासाठी आमच्या मेन ऑफीसच्या (अमेरीकेत) एका रूम मध्ये आम्ही सर्व भिंतींवर मोठा वर्ल्ड मॅप लावला आहे. त्या मॅपला दिवे जोडले आहेत. जस जसा बझ्झ वापरला जाईल तसतसे दिवे लागत जातात. आणि आम्हाला ऑन द फ्लाय कोण कोठून बझ्झ वापरतंय हे समजतं.
कांक, आप, हेओ: पण मग आज तुम्ही इथे कसे काय?
लॉरी: तर त्या मॅप वर गेले बरेच दिवस आम्हाला सारखे दिवे लुकलुकताना दि्सायला लागले. कुठुन कुठुन दिवे लागायचे. पहिला दिवा मुंबईच्या पश्चिमेला लागायचा. मग एकदम दोन साऊथ मध्ये. त्यानंतर अमेरिकेत, पुन्हा मधुनच मुंबई, पुणे आणि जास्तीत जास्त महाराष्ट्र, कर्नाटक, हैद्राबाद, अमेरिका, नॉर्वे, इटली असे वेगवेगळ्या ठिकाणांहून दिवे लुकलुकायला लागले. सुरूवातीला आम्ही दुर्लक्ष केलं. पण नंतर आम्हाला अल-कायदा च्या दहशतवादी कट शिजण्याची शंका यायला लागली.
आप: एकदम अल-कायदा?
लॅरी: हो, कारण तुमच्या बझ्झ मध्ये बर्याच वेळा अल, अल असं दिसायला लागलं. मग आम्ही आमचे अननोन आयडेंटीटी वाले काही कर्मचारी तुमच्यातील बर्याच जणांच्या बझ्झ वर सोडले.
कांक: ओह म्हणजे ते करमचंद तुमचे आहेत तर.
अल: हो ना, मी तर रोज सकाळी त्यांना घालवून द्यायची पण ते आपले पुन्हा दुसर्या दिवशी हजर असायचे.
लॅरी: आम्ही त्यांना तशी सक्त ताकीदच दिली होती. अल-कायदा चा प्रश्न होता ना.
आप, आका, सपा, विपि, कांक, देका: हंम, आमच्या अल-चा प्रश्न आला का!
देका: पण नंतर नंतर तर त्यांना कितीही घालवून देण्याचा प्रयत्न केला तरी ते जात नव्ह्ते की नाही अल?
अल: हो ना.
आप, विपि: मग आम्हीच अल ला सांगीतलं की दुर्लक्ष कर म्हणून आणि काही पर्सनल लिहू नको.
लॅरी: बरोबरे कसे जातील? आम्ही त्यांना तुमच्या बझ्झ मध्ये डीफॉल्ट सेटींग करून दिले ना. मग त्यांनी तुमच्या बझ्झ चा माग काढायला सुरूवात केली.
श्रेर: इथे सुध्दा आपला मूळ स्वभाव सोडू नका.
लॅरी: आपण काही म्हणालात? तर आमच्या अननोन आयडेंटीटींना काही समजेचना काय चाललेले असायचे. कधीपण कोणी येउन "मी दात घासायला चाललोय, थोड्यावेळाने येइन." "मी आत्ताच आलोय ऑफीस मधून आता सितारात खादाडी करायला जातोय". मधुनच शॉर्ट फॉर्म्स सुसं, सुप्र, शुरा, शुत्री, सुरा. आमचं ग्रामरचं सॉफ्टवेअर पूर्णपणे फाफललं. हा शब्द सुध्दा आम्ही इथेच शिकलोय.
सोबा: लॉरीबाबा आपलं साहेब मी तुम्हाला याचा एक मन तयार करून देवू का म्हणजे तुमचा घोळ होणार नाही.
लॅरी: आता हे मन काय? तुमच्या कडे काही ग्रामरचे नियम वगैरे पाळतच नाहीत. किती ती होमोनिम्स?
देका: होमोनिम्स म्हणजे काय?
लॅरी: आहो म्हणजे एकच उच्चार असलेले पण वेगवेगळे अर्थ असलेले शब्द. उदा: सुरा हा शब्द. आमच्या सॉफ्टवेअर मध्ये सुरा चे तीन अर्थ आहेत. पण ते कुठलेच तुमच्या बझ्झ मधील सुरा ला जुळत नाहीत. आता आम्हाला एकच मन माहीत आहे आणि ते तयार करता येत नाही. पण हे काय मन तयार करून देतो?
रको: अरे व्वा, इथे रोज काही तरी नविन शिकायला मिळतं. म्हणजे आलंच पाहेजे रोज.
लॅरी: काय हे दिलीपजी तुम्ही तरी काही कंट्रोल करा. तुम्ही मराठीचे प्राध्यापक आहात ना.
दिबी: काय आहे लॉरी साहेब, आमच्या कॉलेज मधल्या मुलांना मराठीचं ग्रामर शिकवुन मी थकलोय. काहीच उपयोग नाही हो. सगळेच बिर्याणी आणि भेळ भाषा वापरतात. इथे सगळे नविन नियम तयार करायला मुभा दिली आहे.
रोचौ, तंबोरबुवा: काय बिर्याणी आणि भेळ कोण देतंय? चला पटापटा पोस्टा.
विपि: मी पण आहे इथं.
देका: हा लॅर्या सगळ्यांना ओळखतोय की.
लॅरी: बस का आता, उगाच का आम्ही करमचंद गीरी केली इतके दिवस. आम्हाला माहीती आहे तुमचं इतिहास प्रेम रोचौ आणि विपि.
रोचौ: माझ्या त्या दिवशीच्या पोस्ट ची कॉफीत पटापट पेस्ट टाकायची का?
लॅरी: आता हेच बघाना हे लोक काय बोलतील याचा नेम नाही. खादाडी हा शब्द तर इथे जादूच करतो. खादाडी काढायचा अवकाश की इथलं वातावरणच बदलतं. आता चार दिवसा पूर्वीची गोष्ट. काय खाल्लं कोण जाणे सगळेच सुटले होते. आणि कोण नविन लोक त्यांना प्रत्येक वेळी नविन पदार्थ घेऊन जॉईन होत होते समजतच नव्हतं. म्हणे "नावात काय असतं हे महाभारतात अत्यानंदबाबांनी म्हंटलंय". तुम्हाला सांगतो दिलीपजी, या लोकांनी आमच्या शेक्सपीअरने ते वाक्य काय संदर्भात म्हंटलंय ते काहीच लक्षात न घेता त्याची पार वाट लावली.
श्रेर: आता आम्ही तुला वाटेला लावू का?
लॅरी: तुम्ही मघाशी सुध्दा काहीतरी पुटपुटत होतात. जाऊ देत. तर आम्ही आमच्या अननोन आयडेंटीटींना सांगेतलं होतं की तुमचा बझ्झ ४०० च्या वर जाऊ द्यायचा नाही. तसं त्यांनी इमाने इतबारे २-३ आठवडे केलं पण नंतर ते पण रमले हो इतके की त्यांना डायरेक्ट ४९२-४९३ लाच जाग यायची. मग मीच सगळं हातात घ्यायचं ठरवलं.
तंबोरबुवा: मग काही फरक पडला का? आमचा खरड फलक हालताच राहीला ना.
लॅरी: तेच तर सांगतोय ना मी. आहो तुम्ही तो २०१२ पाहीलाय का जगबुडीचा सिनेमा. त्यात तो मुख्य लामा त्याच्या शिष्याला सांगतो नं की आधीच एखादं भांडं भरलेलं असेल तर ते रिकामं झाल्या शिवाय त्यात नविन कसं जाईल?
हेओ: काय बोअर आणि फाल्तू सिनेमा
आप: हो ना. सगळंच अॅनिमेशन आणि किती बॉलीवुड चा फिल्मीपणा? ह्या लॅर्याने तरी काय बोअर लावलंय.
अल: पण मला त्याने विचार करायला लावला.
आप: त्या हाउस फुल्ल ने मला सुध्दा विचार करायला लावला की हा सिनेमा मी का पाहीला? :-)
लॅरी: तर मी इकडे तातडीने येण्याचं कारण थोडं वेगळं आहे.
हेओ, आहो मग सांगा की ते पटापट. कशाला उगीच पाल्हाळ लावलंय. इथे ऑफीस मध्ये आम्हाला काम असतं. नाहीतर इथे उद्या पासून साहेब माझ्या मागे करमचंद लावतील.
लॅरी: तर ते बझ्झ मीच हातात घेतलं तर मी सुध्दा हारलो. काय एकेक चविष्ट पदार्थांचे फोटो आणि काय त्या कधीही न ऐकलेल्या न पाहीलेल्या रेसीपीज.
आणि आता परवा पासून तर दिवसातून दोन दोन बझ्झ काढायची वेळ येते आहे. गप्पांना काही तोटा नाही.
मग आपण मानलं बुवा आपल्या या बझ्झ ला.
आप: (म्हणजे आता हा खलनायकाचा चरित्र नायक होतोय तर काही हरकत नाही)
लॅरी: म्हणून तर आपण स्वत: प्रत्यक्षच तुमचं अभिनंदन करायला आलो.
देका, रको: टाळ्या
श्रेर: आता अभिनंदन कशाचं?
तंबोरबुवा: आगं आज्जे जरा थांब की लॅरीबाबा आपलं साहेब काय सांगतायत ते ऐक ना.
लॅरी: तर मि देव, तुमच्या अत्यानंदबाबा बझ्झ चं आपलं कट्टयाचं आपलं मठाचं नाव आम्ही गिनीज बुकात नोंदवायचं ठरवलंय.
सोबा: मंडळी एका ट्रेनिंगला जायचय .. रात्रौ भेटू !!
शुत्री !!
लॉरी: आत्ता रात्रच आहे नं?आहो सोबा जरा क्लायमॅक्स तर ऐकून जा.
सोबा: नाही ओ साहेब, मी क्लायमॅक्स प्लेबॅक करून ऐकेल.
लॉरी: हो गिनीज बुकात कारण तुमच्या एवढा अवघ्या भूमंडळात या बझ्झ चा वापर कोणी केला नाही आणि भविष्यात एक आव्हान लोकांना असू द्यावे म्हणून आम्ही हा निर्णय एक मताने घेतला आहे.
देका: अरे वा...वाजवा रे वाजवा!
सगळेच: अरे वा...वाजवा रे वाजवा!
लॅरी: तसेच तुम्हाला अजुन ५०० खरडी एक्स्ट्रा मिळतील जेव्हा तुम्ही एका बझ्झ च्या ५०० खरडी पूर्ण कराल तेव्हाच.
देका: अरे वा..बोनस? की सानुग्रह अनुदान...काय म्हणायचं हे.
अल: देका, बहुधा ते सअट अनुदान आहे.
लॅरी: हो आणि अजुन एक. देका स्पेशल. मि देव तुम्हाला आम्ही एक खास सर्व्हर स्पेस देतो आहोत बझ्झ वर तुमच्या आवाजातील गाणी अप्लोड करायला. तसेच केवळ तुमच्या बझ्झ ला स्मायली टाकायची फॅसीलीटी पण देत आहोत.
अत्यानंदबाबा आणि भक्तमंडळी: झकाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ
बोले तो एकदम झऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽकाऽऽऽ
हा हा हा हा !!!
ReplyDeleteलॅरी पेज, कॉट *मठ-मंडळी* बोल्ड *अत्यानंद बाबा* फॉर डक !!!!! ;-)
अत्यानंदबाबा मालाडकरांचा मठ चिरायु होवो...
ReplyDeleteatyananda maharajancha vijay aso..
ReplyDeleteअत्यानंद बाबा की जय......
ReplyDeleteलँरी हमारे बाबा का मठ हर बुरी नजर से बचाये.......
झकाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽस! बोले तो एकदम झकाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽस.
ReplyDeleteएकदम चकाटेश !!
ReplyDeleteएकदम सही...... फक्त कालच्याच नाही तर जुन्या एक-दोन बझचे अफलातुन मिश्रण होते.. भारी मजा आली.. हेरंबची बझ हिरोईन मात्र देवकाका घेऊन पळाले होSSSSSSs
ReplyDeleteअत्यानंद बाबांचा विजय असो!!!
ReplyDeleteधन्स आप! मला जरा शंका आहे की माझ्या जालावर किती जणांना हे कळेल? :-):-)
ReplyDeleteपण बरेच जण राहून गेले सुझे, योमु, साबो,श्रीमंत, सोके, मीनल इ.
नमस्कार, शांतीसुधा-जी!
ReplyDeleteम्या गौतम.. ओळख असेल अशी अपेक्षा आहे :)
तुमचा blog गावला, अप्रतिम लिहीलंय राव! मैनु मज्जानु आवे छे!
असंच लिहीत जावा, आम्ही वाचत जातु... आमचं लिवणं कदी सुरु व्हतंय ते बघु..
अरे गौत्या, तुला का नाही ओळखणार. धन्स. आधीची पोश्टे वाचली का? आजुन मजा यील. तू पण लिव्हायला सुरूवात कर आता. आम्ही आहोतच वाचाया.
ReplyDeleteDhishkyaaw Ekdum :D
ReplyDeleteझकास............!
ReplyDeleteतत्तड तत्तड तत्तड.. :)
बोले तो यकदम झक्कास्स्स लिखेला हय... :)
ReplyDeleteबोला मठाधिपती मोदबुवा मालाडकर की जय !!!
बाय द वे... हे तंबोरेबुवा कोण बरं ? ;)
धन्स तंबोरबुवा. हे तंबोरबुवा आपणच.....त्यांना बरीच नावं आहेत. त्यातीलच एक मदनबाण सुध्दा. :-)
ReplyDeleteसुन्दर झालीय पोस्ट.
ReplyDeleteहा इ कॉमेडी प्रकार आवडला. ह्या प्रकाराचा बझविनोद ह्या नविन नावाने साहित्य यादीत समावेश होईल. ह्या चा पहिला नियम, नावाचे व रुढ शब्दांचे लघूकरण करण्यास पूर्ण स्वातंत्र्य. विषयाची असंबधता आवश्यक. पोस्त पाठवून गोंधळ माजवीणे हा मुख्य हेतू असावा.
ReplyDelete