Sunday, 7 March 2010

तुलना दोन मातांच्या दृष्टिकोनातली!!

http://epaper.esakal.com/esakal/20100308/5746541873137520020.htm

नंदिवाल्याची मुलगी अभियांत्रिकीच्या वाटेवर.............ही बातमी खूपच छान आहे. मला बायाडीच्या आईचे मोठे कौतुक वाटते. स्वतः फक्त चोथी पर्यंत शिकलेली आहे पण चारही मुलीना चांगलं शिकवून स्वतःच्या पायावर उभं करण्याची जिद्द त्या बाई कडे आहे हे विशेष. चार मुलींच्या पाठीवर एक मुलगा म्हणजे बायाडीच्या वडिलांचे विचार तसे परंपरागतच आहेत असे दिसते. आणि तसे पाहता तो माणूस शिकलेला पण नाही. पण त्याची बायको चोथी पर्यंत शिकल्यामुळे तिला मुलींच्या शिक्षणाचे महत्व आहे.

असेच दिसते आहे कि महात्मा गांधी म्हणत असतं कि एक पुरुष शिकला तर एक पुरूषाच शिकतो पण एक स्त्री शिकली तर एक घर शिकतं. वरील प्रसंगातून ते सिद्ध सुद्धा होता आहे. पण याच बातमीच्या पार्श्वभूमीवर माझ्या ओळखीतील एका कुटुंबात घडलेले उदाहरण आठवले आणि मी विचार करते आहे................हा महात्मा गांधीनी मांडलेला सिद्धांत कितपत खरा आहे?

माझ्या ओळखीमध्ये असेच एक कुटुंब होते. त्यांना चार मुली आणि मुलगा नाही. आई आणि वडील दोघेही शिकलेले. आईला मुलगा नाही याचे दुःख असायचे आणि तसे ती बोलूनही दाखवत असे. याला कारण ती जरी शिकलेली होती तरी तिच्यावर तिच्या वडिलांचा प्रचंड प्रभाव असे. आणि तिच्या वडिलांना मुलगा असणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आणि मुली म्हणजे फक्त खर्चच. चार मुलींपैकी एकीला बारावीला चांगले गुण मिळाले. तिला अभियांत्रिकीला प्रवेश मिळत होता. आणि तिची क्षमता सुद्धा होती. पण जेंव्हा तिने तिच्या आईला विचारले तेंव्हा आईने स्पष्टपणे सांगितले कि माझ्या कडे तुझ्या अभियांत्रिकी शिक्षणासाठी पैसे नाहीत. मग त्या मुलीने विचारले कि जर तिच्या जागी मुलगा असता तर आईने काय केले असते? तर आईने उत्तर दिले कि कर्ज काढून शिकवले असते. मग मुलीने विचारले मग मला कां नाही कर्ज काढून शिकवत? तर आईने उत्तर दिले तुझ्यावर पैसे खरच करून मला काय फायदा? तू तर लग्न होऊन दुसऱ्याच्या घरी जाणार. त्या मुलीला खूपच धक्का बसला.

आता वरील दोनही प्रसंगांमध्ये काही साम्य आणि बराच फरकही आहे. साम्य आसे कि जास्त शिकलेल्या बाईला पण चार मुली आहेत. आणि कमी शिकलेल्या बाईला पण चार मुली आणि एक मुलगा आहे. तरी जास्त शिकलेली बाई स्वतःच्या मुलीला उच्च शिक्षण नाकारते आणि कमी शिकलेली बाई स्वतःच्या चारही मुलीना चांगलं उच्च शिक्षण देण्याची जिद्द बाळगते. काय निष्कर्ष काढाल तुम्ही या दोन गोष्टींतून?

2 comments:

  1. This is the question of attitude. My elder sister who studied up to IX th standard got married at the age of 17th years way back in 1961. Her husband was a farmer in MP. she has 5 daughters and a son. She spent a strugglefull life but saw that all her daughters get formal education. The son is the youngest and is now 33 years old. She saw her daughters are earning. And now her eldest daughter is married and runs her small business. Second daughter is in Ranbaxi and well paid. Third daughter is teacher, fourthe daughter is a Railway police and her last daughter is also a teacher. The youngest son is in some private job and suffered from brain tumour and hence partly handicapped. All her daughters though married support her and visit her alternatively. Women has an inbuilt quality to face the adversities of life strongly and come out successful.

    ReplyDelete
  2. तुमच्या बहिणीचे खरोखरच कौतुक आहे. मला असा वाटते कि आपल्याकडे लोक जरी मुलीना शिकवत असले तरी त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्यासाठी आजीबात प्रोत्साहन दिले जात नाही. तसा आत्मविश्वास देखील त्यांच्या मध्ये निर्माण होत नाही. आणि बहुतेक घरात वडील किंवा भाऊ किंवा लग्न नंतर नवरा, सासरे, दीर अश्याच लोकांवर निर्णय साठी अवलंबून राहावे लागते. म्हणजे तसेच अपेक्षित असते. एखादी स्वतंत्र विचार आणि आत्मभान असलेली मुलगी (शक्यतो सापडत नाहीच) लगेच या सगळ्यांच्या लेखी आगाऊ ठरते.
    मला असे वाटते कि वरच्या प्रसंगात जरी दुसरी स्त्री स्वतः शिकलेली असली तरी तिच्या वडिलांनी तिला स्वतःच्या विचारांच्या अमालाखालीच ठेवलं होतं. त्यामुळे ती स्वतंत्रपणे विचार करूच शकत नव्हती. म्हणूनच तिने स्वतःच्याच मुलीचा तिच्या सबलीकरणासाठी, तिच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी विरोध केला आणि फक्त मुलगा नाही हाच विचार डोक्यात ठेवून वागली. हेच तर आपल्या अधिकाधिक समाजाचे वास्तव आहे. कोणी कितीही अमान्यकेलं तरी.

    ReplyDelete