गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेद्वार श्री नरेंद्र मोदी यांनी जगातील सगळ्यात उंच असा पुतळा केवडिया येथील सरदार पटेल धरण (नर्मदा धरण) च्या परिसरात उभारण्याची घोषणा केली काय आणि सहा महिन्यांत त्याची कोनशीला देखिल रोवली गेली. इतक्या वर्षांत भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या विषयी कधीच कुठेच काहीच बातमी दिसली नाही पण यावर्षी त्यांच्या जयंतीच्या दिवशीच स्टॅच्यु ऑफ युनीटी ची कोनशीला रोवल्यामुळे सगळ्या पैसे चारलेल्या वृत्तवाहिन्यांनी नरेंद्र मोदींनी वल्लभ भाई पटेलांना कसं हायजॅक केलेलं आहे हे सांगण्यासाठी तरी किमान वल्लभ भाई पटेलां विषयी काहीतरी माहिती दाखवली. असो. त्यानंतर अनेक विचारवंत (की विचारजंत) लोकांनी असल्या पैशाच्या अपव्ययाची गरजच काय? देशामधे इतका मोठा पुतळा उभारण्यात पैसा वाया घालवण्यापेक्षा ते पैसे गोरगरीबांच्या उद्धारासाठी, देशापुढील इतर महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी का नाही वापरत, हे सगळं राजकारण आहे इ. इ. प्रतिक्रीया देण्यास सुरूवात केली. बरोबरच आहे इतकी वर्षे षंढ लोकांनी शासन केल्यामुळे ह्या लोकांमधे राष्ट्रीय अस्मिता वगैरे काही प्रकार नाहीच आहे.
पर्वाच लोकसत्ताच्या दिवाळी अंकातील जमशेदजी टाटांवर लिहीलेला एक लेख वाचण्यात आला. जमशेदजी कसे व्हिजनरी होते आणि अनेक अडचणींतून त्यांनी काही संस्थांची उभारणी प्रचंड विरोध पत्करून धसास नेली याची माहिती आहे. जमशेदजींनी म्हैसूर मधे रेशीम उद्योग सुरू केला. त्यासाठी परदेशातून उत्तम प्रतिच्या रेशमाच्या किड्यांच्या पैदाशीसाठी रोपे आणली. त्या रोपांच्या लागवडीसाठी जमीन खरेदी केली. आज म्हैसूरचं रेशीम सर्वोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. जमशेदजींनी अशाच प्रकारे बंगलोर मधील सुप्रसिद्ध संशोधन संस्था आय आय एस सी ची स्थापना केली. त्यावेळी लॉर्ड कर्झन ने खूप मोडते घालण्याचा प्रयत्न केला. भारता सारख्या भिकारड्या देशाला कशाला हवी संशोधन संस्था इ. तरी देखिल जमशेदजींनी आपले प्रयत्न चालूच ठेवले आणि शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. याचप्रकारे त्यांनी देशात पोलाद कारखाने चालू केले. मुंबईतील गेटवे ऑफ इंडीया होण्या आधी जमशेदजींनी तेथील जमीन एक फाईव्ह स्टार हॉटेल बांधण्यासाठी ९९ वर्षांच्या कराराने भाड्याने घेतली. हॉटेल ताज ची कथा खूपच रोचक आहे. त्यावेळी अनेकांनी त्यांना वेड्यात काढले. कशाला हे भटारखान्याचे उपदव्याप हे देखिल ऐकावे लागले. पण त्यावेळी त्यांचे उत्तर एकच होते की आमच्या देशात देखिल जागतिक दर्जाचे उत्तम हॉटेल आम्ही बांधू शकतो हे सगळ्या जगाला दिसलं पाहीजे. हे सगळं त्यांनी स्वत:च्या वैयक्तीक पैशांतून केलं. उत्तम क्वालीटीचा माल जगाच्या विविध भागांतून आणला. ज्या काळात हॉटेल ताज बांधलं गेलं त्याकाळात आपल्या देशात फरच कमी सोयी होत्या. सुधारणा, शिक्षण कशाशी खातात याचा पत्ता नव्हता. जर जमशेदजींनी स्वत:च्या द्रष्टेपणावर आणि देशाच्या अस्मितेवरील प्रेमावर विश्वास दाखवला नसता आणि टीका कारांच्या टीकांना बळी पडले असते तर ताज सारखं उत्तम क्वालीटीचं हॉटेल उभंच राहू शकलं नसतं.
या स्टॅचू ऑफ युनीटी कडे मी या दृष्टिने बघते आहे. श्री नरेंद्र मोदी हे एक द्रष्टे आहेत. माझी अजुन एक सूचना आहे की हा पुतळा नुसताच उभा न करता त्याचा उपयोग प्रेक्षणीय स्थळ म्हणून तर होईलच पण आपल्या पश्चिमेकडील सागरी हद्दींवर लक्ष ठेवण्यासाठी त्याचा उपयोग एक वॉचटॉवर म्हणूनही केला जाऊ शकतो. अजुन १० वर्षांनी हाच स्टॅचू भारताची क्षमता दाखवून देईल. नरेंद्र मोदींच्या या पुतळ्यासाठी गावागावातून थोडं थोडं लोखंड/पोलाद जमा करण्याची कल्पना तर अफलातून आहे. त्यामुळे देशातील सर्वांना....अगदी सामान्यातील सामान्याला हा पुतळा आपला वाटेल. ही संकल्पना मा. एकनाथजी रानडे यांनी कन्याकुमारीचे रॉक मेमोरीअल उभं करताना वापरली होती. त्यामुळे इतक्या वर्षांनंतरही ज्या ज्या लोकांनी अगदी १ रूपया देणगी दिली होती त्यांना देखिल रॉक मेमोरीअल आपलं वाटंतं आणि ते आवर्जून कन्याकुमारीला भेट देतात. ही संकल्पना मूळ स्वामी विवेकानंदांची आहे. त्यांना अमेरिकेतील शिकागो धर्म परिषदेसाठी लगणारे पैसे त्यांनी सामान्य जनते कडून देखिल १ पैशाच्या देणगीतून गोळा केले. याचा अर्थ त्यांना त्यावेळचे संस्थानिक पैसे देत नव्हते असा नव्हे. त्याचं कारण सांगतांना त्यांनी सांगीतलं की मी माझ्या देशातील हिंदूंचा प्रतिनिधी म्हणून जात आहे ना की देशातील संस्थानिकांचा प्रतिनिधी म्हणून. केवढा मोठा विचार स्वामी विवेकानंदांनी केला होता त्यावेळच्या मरगळ आलेल्या समाजात थोडे चैतन्य आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता.
१५ डिसेंबरला होणारी ही रन फॉर युनीटी हा सुद्धा असाच काहीसा प्रकार आहे. समाजाला एकूणच नैराश्याने घेरलेलं आहे. या रन फॉर युनीटीचा हेतू सांगतानाच त्यांनी सांगीतलंय की चांगलं शासन मिळवणे हा आपला अधिकार आहे आणि त्यासाठी सगळे भेद विसरून आपल्या देशाच्या अस्मितेसाठी सर्वांनी एकत्र दोन किमी पळूया. एकाच वेळी इतक्या मोठ्या देशात इतक्या मोठ्या प्रमाणात लाखो लोक पळतील हा एक जागतिक विक्रम ठरेल. त्यातून देशाची एकता दिसून येईल की जी सध्याची गरज आहे. आपणच ठरवा काहीही व्हिजन नसलेल्या आणि भ्रष्टाचार, देशद्रोह यात आकंठ बुडालेल्या कॉंग्रेसच्या अपप्रचाराकडे लक्ष द्यायचं की नरेंद्र मोदींसारख्या द्र्ष्ट्या नेत्याची देशाच्या अस्मितेसाठी घातलेली साद ऐकायची. चला मग सगळ्या देशप्रेमी आणि देशाच्या अस्मितेच्या रक्षणासा पाठींबा दर्शविणार्यांनी १५ डिसेंबरला आपापल्या शहरात रन फॉर युनीटी मधे सहभागी होऊया आणि देशाच्या उज्वल भवितव्याची पायाभरणी करूया. चला तर मग सहभागी होण्यासाठी या लिंकवर टिचकी मारून रजिस्ट्रेशन करा.

, फक्त एक दुरुस्ती ! … हा पुतळा समुद्रात नाही, तर केवडिया येथील सरदार पटेल धरण (नर्मदा धरण) च्या परिसरात उभारला जाणार आहे ... :)
ReplyDelete