साहित्य: शेवग्याची कोवळी/थोडी जून पाने. (प्रमाण आपल्या चवीनुसार), शिजवलेली तूरडाळ किंवा भिजवलेली मूग डाळ, चवी प्रमाणे हिरव्या मिरच्या, फोडणीचे साहित्य, मीठ चवी प्रमाणे, एक चमचा साखर, एक चमचा गोडा मसाला.
 |
शेवग्याची पाने डहाळीत असलेली. |
 |
शिजवलेली तुरीची डाळ |
कृती: शेवग्याची डहाळी झाडावरून काढावी किंवा विकत आणावी. त्याची पाने व्यवस्थीत सुटी करून घ्यावीत आणि स्वच्छ पाण्यात १-२ वेळा व्यवस्थीत धुवून घ्यावी.
 |
व्यवस्थीत सुटी करून आणि धुवून घेतलेली शेवग्याची पाने |
पानांच्या प्रमाणात १ ते १.५ वाटी तूरडाळ शिजवून घ्यावी. (मूग डाळ असेल तर भिजवून घ्यावी). तेलाची फोडणी करून त्यात आवश्यक तेवढ्या प्रमाणात मोहरी, हिंग, हळद टाकून हिरव्या मिरच्यांचे तुकडे, शिजवलेली तूर डाळ किंवा भिजवलेली मूग डाळ आणि शेवग्याची पाने घालावीत.
 |
फोडणीत टाकलेली डाळ आणि शेवग्याची पाने |
 |
शेवग्याच्या पानांचे तूरडाळीतले वरण |
चवी पुरते मीठ, साखर, गोडा मसाला टाकून मिश्रण छान हलवावे आणि झाकण लावून वाफवायला ठेवावे. ५-७ मिनीटांनी गॅस बंद करून शेवग्याच्या पानांची भाजी किंवा वरण खायला घ्यावे. डाळीचं प्रमाण जास्त असेल तर शेवग्याच्या पानांचं वरण तयार होईल आणि शेवग्याच्या पानांचं प्रमाण जास्त असेल तर भाजी होईल. हिरव्या मिरच्या आणि हिरवी पानं अशी जरी गल्लत होईल असे वाटले तरी हिरव्या मिरच्यांची चव फक्कड लागते. ही भाजी किंवा वरण भात, पोळी, भाकरी यांपैकी कशाही बरोबर खाता येते.
पौष्टिक मूल्य: शेवग्याच्या पानांत लोहाचे प्रमाण भरपूर असते. पानांना थोडा कडवटपणा असला तरी चव छान लागते.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteविदर्भात हा पदार्थ प्रसिद्ध असल्याचे आमच्या ६वी इयत्तेतील मराठीच्या एका ध्द्यात्वाच्ल्याचे आठवते. मुंगन्याच्या शेंगा म्हणतात तिकडे शेवग्याच्या शेंगांना! एकदा भारतात आलो की ट्राय करतो हा प्रकार! thanks for sharing ताई!
ReplyDeleteहेमंत, भारतात आल्यानंतर करण्याच्या किंवा खाण्याच्या प्लॅन्स मधला अजुन एक प्लॅन. खोपेलीत कदाचित शेवग्याच्या शेंगाचं झाड असेल. इथे भाजीवाल्याकडेच मिळतो हा पाला. :-)
Deleteशेवग्याच्या पानाची भाजी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे चविष्ट होते. तुरीच्या डाळीप्रमाणे मुगडाळीत शेवग्याची पानांची सुकी भाजी देखील चविष्ट होते. आपली पोस्ट आवडली.
ReplyDeleteमाझा ब्लॉगः
http://adf.ly/BukZb
धन्यवाद आणि शतपावलीवर स्वागत!
Deleteभारीये हे वरण... आवडलं :) :)
ReplyDeleteसुहास, नक्की करून बघ. फक्त शेवग्याच्या शेंगांचं झाड शोधायला लागेल तुला मुंबईत. :-)
Deletehow this can be helpful to reduce weight & pressure accordingly. Same has been used in Kenya to treat blood pressure. no doubt test is really best
ReplyDelete