Friday 14 January 2011

रडीचा डाव...!!

लेखाच्या नावावरून तुम्ही ताडलंच असेल की लेख रडीच्या डावाच्या खेळावर आधारित आहे. फक्त हा रडीचा डाव लहानपणीच्या खेळातला नसून मोठ्या मोठ्यांच्या खेळातला आहे. अगदी परवाच टीव्ही वर एक जाहीरात बघीतली. "डाग चांगले असतात वाली" की ज्यामध्ये एका मुलाला (त्याची शाळेच्या गणवेषातली पॅंट खाली घसरल्याने मुलं त्याला चिडवत असतात आणि बाईंनी सस्पेंड करायची धमकी दिल्यावर तोच मुलगा आम्ही सॅक रेसची प्रॅक्टीस करत होतो असं सांगून बाजू सावरून घेतो. आणि पुढच्याच क्षणी त्याच्या वर्ग मित्रांना आपली चूक समजून ते त्याच्या मध्ये सामील होतात. काय गंमत आहे नाही. आपण लहान मुलांच्या जगात अनेक गोष्टी होताना बघतो आणि त्यावेळी ते लहान असतात म्हणून हसून सोडूनही देतो. लहान मुलं सुद्धा त्यांची झालेली भांडणं झटक्यात विसरतात आणि पुढच्या क्षणाला एक होतात. बर्‍याचवेळा आपण हे दृष्य बघतो की लहान मुलं जबरदस्त भांडतात. मग त्यावरून त्यांचे मोठे एकमेकांशी भांडतात. मोठ्यांचं भांडण तसंच रहातं पण लहान मुलं काही वेळाने भांडण विसरून एकत्र खेळायला सुरूवात करतात. मग आपण मुलांची भांडणं झाली की त्यांना असं का म्हणतो की "लहान मुलांसारखं काय वागतोयस"? खरंतर मोठी माणसंच घडलेल्या मनात धरून त्याप्रमाणे वागत असतात. लहान मुलं एकदम निरागसपणे सगळं सोडून देतात. मग हे असं का? हा प्रश्न मला नेहमीच पडतो.
आज मकर संक्रांत! सगळेच "तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला" असं म्हणतात. पण आपल्याला हे पक्क माहीती आहे की गोड गोड बोलणारे सगळेच चांगल्या हेतूने गोड बोलत नाहीत. किंबहुना आपण असं अनुभवतो की अधिक गोड बोलणारेच गळा कापतात. आपले राजकारणी नाही का, निवडणुकांसाठी मतं मागत हिंडताना एकदम गोड गोड बोलतात आणि मग एकदा का सत्तेवर आले की सर्वच बाजूंनी जनतेचे गळे कापतात.........स्वत:च्या तुंबड्या भरातात. लहान मुलांच्या खेळामध्ये अजुन एक प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे एखाद्याच्या मालकीचे खेळाचे साहित्य असेल किंवा एखाद्याच्या घरात किंवा घराच्या अंगणात सगळे खेळत असतील किंवा एखाद्याचे आई-वडील त्यातल्यात्यात पॉवरफुल्ल असतील तर तो मुलगा अथवा ती मुलगी लगेच मी सांगेन तेच व्हायला पाहीजे असं करून घेतांना दिसते. म्हणजे समजा क्रिकेट खेळत असताना साहित्य त्या मुलाच्या मालकीचं असेल तर कितीही वेळा आऊट झाला तरी जोपर्यंत त्याला बॅटींग करायची आहे तोपर्यंत तो आऊट नाही द्यायचा. लहान असताना ठीक आहे त्याचा इतरांच्या आयुष्यात फारसा फरक पडत नसतो पण हीच सवय मोठेपणीसुद्धा चालू ठेवली तर सगळ्यांनाच डोके दुखी होते.

आता थोडं स्पष्टच सांगायचं तर आपल्या भारत सरकार मधील राजकीय तसेच बाबू लोकांचं उदाहरण घेऊया. ’कॅग’ समीतीने २-जी स्पेक्ट्रमचा घोटाळा झालाय असा अहवाल दिला......(म्हणजे यात सरकारची विकेट गेली....) पण कपिल साहेब (एक दीड महिन्यानंतर) ’कॅग’चा अहवाल चुकीचा आहे म्हणून डंका पिटायला लागले. कॉंग्रेस्ने आतापर्यंत सत्तेत असताना सगळ्याच तपास यंत्रणा तसेच पोलीस यंत्रणांचा वापर असा ’रडीचा डाव’ खेळण्यासाठी करून घेतलेला आहे. १९८४ च्या दंगलींमधील आरोपींची विनाशर्त आणि विनाआरोप सुटका हे त्याचं एक ताजं उदाहरण आहे. बोफोर्स प्रकरणातील क्वात्रोचीला जामीन मिळवून देऊन देशाबाहेर पलायन करण्यास मदत करून आता पुन्हा त्याचे नाव वर आल्यावर तो निर्दोष असल्याची याचिका सीबीआय मार्फतच दाखल करणे हे दुसरे ताजे उदाहरण. आदर्श घोटाळा, राष्ट्रकुल घोटाळा, गुलमोहर घोटाळा इ सगळ्या घोटाळ्यांच्या बाबतीत तेच होणार आहे जे बोफोर्स आणि २-जी मध्ये झालंय. इथे देशाच्या आणि देशवासीयांच्या घामाच्या संपत्तीची लूट केली गेलीय. देशासाठी प्राणार्पण करणार्‍या अनेक सिनिकांच्या बलिदानाची खिल्ली उडवली जाऊन त्यांच्या कुटुंबियांची फसवणुक केली गेलीय.

आता त्या २६/११ च्या हल्ल्यात सुद्धा कसाब पकडला गेला. त्याचावर खटला चालवण्यात आला. त्याच्यावरचा आरोप अनेक साक्षी-पुराव्यांनीशी सिद्ध होऊन त्याला फाशीची शिक्षा सुनावण्याचं नाटकही झालं. पण आता कोणा स्वामी असीमानंदांच्या एका साक्षीचं  (ही सुद्धा खरी आहे की नाही याबाबत काहीही ठोस पुरावा नाही) सूत गाठून २६/११ चा बाकी हल्ला पाकीस्तानी अतिरेक्यांनी केला पण करकरेंना एकट्याला हिंदू अतिरेक्यांनी कामा हॉस्पिटलच्या गल्लीत गाठून मारलं असा जावई शोध लावला जातो आहे. करकरेंना हिंदू अतिरेकी मारत असताना त्यांच्या बरोबर असलेले इतर अधिकारी श्री कामटे आणि साळसकर पहात बसले होते का? की त्यांना देखिल हिंदू अतिरेक्यांनीच मारलं असं पुढे आणलं जाणार आहे. कसाब, अफजल गुरू यांच्याबाबतीत इतकी तत्त्परता दाखवून कोणीच नार्को टेस्ट वगैरे केली नव्हती. पण मालेगावच्या संदर्भात मात्र अगदी तत्त्परतेने नार्को टेस्ट करून बेकायदेशीरपणे संशयीत म्हणून पकडलेल्यांची बदनामी करण्याचं कंत्राटच एटीएसने इलेक्ट्रॉनीक प्रसारमाध्यमांना दिलं होतं. ते त्यांनी व्यवस्थित पूर्ण केलं. सध्या स्वामी असीमानंद या व्यक्तीला हाताशी धरून प्रचंड उलट सुलट माहीती इलेक्ट्रॉनीक प्रसारमाध्यमं हिंदूदहशतवाद, हिंदूदहशतवादी या नावांखाली पुरवत आहे. हे सगळं कुठपर्यंत प्री-प्लॅन्ड आहे, ह्याची पाळंमुळं कुठं आहेत हे सगळ्यांच्या आतापर्यंत समोर आलं असेलच. तरी पुन्हा एकदा ज्यांना हे लक्षात आलं नसेल त्यांच्यासाठी स्प्ष्टपणे लिहीणं हे मी माझं कर्तव्य समजते.
१) नुकतंच वीकी-लिक्स च्या भांडा फोड मध्ये राहूल गांधीनी अमेरिकन परराष्ट्रमंत्रालयातील अधिकार्‍यांशी वार्तालापात "हिंदूदहशतवाद" हा शब्द वापरला हे उघड झालं. रडीच्या डावाप्रमाणे त्यांनीही घुमजाव केले आणि कोणताही दहशतवाद अशी मखलाशी केली.
२) २६/११ चा हल्ला झाल्या झाल्या तत्कालीन केंद्रीय मंत्री ए आर अंतुले यांनी करकरे यांच्या शहीद होण्यावरच प्रश्नचिन्ह उभं केलं होतं आणि हिंदू अतिरेक्यांनी करकरेंना मारलं असा सूरच लावला होता. त्यावेळी वातावरण प्रचंड गरम असल्याने त्यांची डाळ शिजली नाही आणि लगेचच्या निवडणुकीत त्यांना जनतेने घरी बसवलं. तरी हा सगळा एका मोठ्या षडयंत्राचा भाग आहे अशी शंका येण्यास वाव आहे. कोणते षडयंत्र ते पाहण्यासाठी आधी अजुन काही तपशील बघुयात.
३) कॉंग्रेसचे एक ज्येष्ठ नेते, दिग्वीजय सिंग यांनीही विकी लिक्सच्या भांडा फोड प्रकरणानंतर लगेचच ए आर अंतुले यांचं २००८ सालचं वक्तव्य उचलुन धरलं.
४) विरोधी पक्षांनी कॉंग्रेसनेत्यांच्या या प्रचंड भ्रष्टाचाराविषयी रणशिंग फुंकण्यास सुरूवात केली.
४) ताबडतोब (कुठुनतरी) असीमानंद प्रकरण बाहेर काढलं आणि सगळीकडे कॉंग्रेसने केलेल्या घोटाळ्यांच्या बातम्यां ऐवजी हिंदू दहशतवाद, आरएसएसचा दहशतवादी आणि राष्ट्रद्रोही संघटनांमध्ये उल्लेख चालू करणे नव्हे त्या दृष्टीने अर्व इलेक्ट्रॉनीक माध्यमांत मोहीमच चालू करणे.
५) २६/११ मधील तपासाची एक दिशा आणि श्रीमती विनीता कामटे आणि श्रीमती करकरे यांनी "त्यांच्या नवर्‍यांना कंट्रोलरूमकडून अतिरेक्यांच्या ठीकाणाविषयी चुकीची आणि अपुरी माहीती पुरवली गेल्या संदर्भातील तसेच त्यांना योग्यवेळी शक्य असूनही मदत न पुरवल्या संदर्भातील अजुनही अनुत्तरीत राहीलेल्या प्रश्नांना दिलेली पद्धतशीर बगल. कंट्रोल रूममधील तेव्हाचे पोलीस अधिकारी राकेश मारीया, तसेच त्यावेळचे पोलीस आयुक्त अनामी रॉय यांच्यावर कॉंग्रेसचा कृपाहस्त अजुनही आहे.........या दोघांच्या संदर्भातच श्रीमती विनीता कामटे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
६) अमेरिकी तपास यंत्रणांनीसुद्धा २६/११ च्या हल्ल्यातील पाकीस्तान आणि लष्करे तैय्यबाचं कनेक्षन बाहेर काढलं.
७) मुंबई पोलीसांकडूनच करकरेंचं सो-कॉल्ड बुलेट-प्रुफ जॅकेट हॉस्पीटल मधून गहाळ (गायब केलं गेलं) झालं.
८) दिग्विजय सिंग यांनी २६/११ रोजी त्यांचं आणि करकरे यांचं झालेलं दूरध्वनी संभाषण याचा पुरावा दिला (पण नक्की काय संभाषण झालं हे गुलदस्त्यातच आहे)

मला संशय येत असलेलं षडयंत्र:

गुजरात मधील गोध्रा प्रकरण आणि दंगलींनंतर नरेंद्र मोदींची "मौत का सौदागर" अशी कुप्रसिद्धी करूनही काहीही फरक पडला नाही कारण "कर नाही त्याला डर कशाला" हेच बाहेर आलं. गुजरात मधील आतापर्यंतच्या शांततापूर्ण वातावरणाने, आर्थिक प्रगतीच्या घोडदौडीने तसेच नरेंद्र मोदींनी पुन्ह:पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवडून येणे यामुळे सिद्ध झालंच आहे.
संपूर्ण भारतभर विशेषत: हिंदू मंदिरांमधील बॉंब स्फोटांमध्ये सीमी आणि मुस्लीम लोकांचीच नावं बाहेर येत असल्याने कॉंग्रेसला आपल्या मतपेटीवरचा ताबा सुटेल की काय अशी भिती वाटू लागली. त्यामुळे त्यांनी सीमीच्याच लोकांच्या मदतीने समझौता एक्सप्रेस, हैद्राबाद मधील मशीद आणि मालेगाव स्फोट ह्यामध्ये हिंदू संघटनांच्या तसेच लष्करातील काही सोयीच्या नसलेल्या अधिकार्‍यांना गुंतवण्याचा कट रचला. त्याच बरोबर २६/११ चा कटही रचला गेला. काही मोजक्याच लोकांना याची माहीती असणार. २६/११ चे अतिरेकी हे गुजरात हद्दीतून आले म्हणून गुजरात सरकारच्या सुरक्षा क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उमटवण्याचाही यात कट होता. खर्‍या अर्थाने धर्मनिरपेक्ष करकरे यांनी जेव्हा मालेगाव बॉम्ब स्फोटाची सूत्रे हाती घेतली तेव्हा त्यांनाही हे काम हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केलं असेच पुरावे पुढे करण्यात आले. मग त्या सगळ्यांच्या बेकायदेशीर नार्को टेस्ट्स आणि त्याचे बेकायदेशीरपणे इलेक्ट्रॉनीक प्रसारमाध्यमांमधून प्रक्षेपण केले जात होते. करकरेंवर "वरून" तशाप्रकारचा दबाव येत होता. त्यांनी मला हिंदू संघटनाम्पासून धोका आहे असं वक्तव्य करण्याचाही दबाव येत होता. श्रीमती कविता करकरे यांनीच स्पष्ट केलं की श्री करकरे यांना हिंदू संघटनांकडून धोका आहे असं आजीबात वाटत नव्हतं. असं जर असतं तरे ही बाब त्यांनी स्वत:च्या पत्नीशी एकदा तरी उघड केली असती. त्याच सुमारास अधिक खोलवरच्या तपासात यात यासगळ्यांना गोवले गेल्याचं करकरेंच्या लक्षात आलं असेल. त्यांनी तसा कॉन्फीडेन्शीअल रीपोर्ट वरीष्ठांपर्यंत पोहोचवला असेल. याच संदर्भात करकरे यांनी कदाचित दिग्विजय सिंग यांना २६/११ ला फोन लावला असेल. यासगळ्यात अनामी रॉय आणि राकेश मारीया काहीही करत नसल्याचेच त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचे असेल. त्याच दरम्यान २६/११ हल्ला झाला. यासगळ्यांना आयतीच संधी मिळाली करकरे, कामटे आणि साळसकर या तिघांचाही काटा काढण्याची. कामटे हे अतिशय कर्तव्य तत्त्पर आणि निधड्या छातीचे अधिकारी होते. साळस्कर तर शार्प शूटर असल्याने तसेच त्यांनी अनेक एनकाऊंटर्स केल्याने ते गुंड आणि पोलीस अधिकार्‍यांचं लक्ष असणार. 
म्हणूनच करकरेंना निकृष्ट दर्जाचं "बुलेट-प्रुफ" (??) जॅकेट घालायला दिलं गेलं. पूर्व भागातील अधिकारी कामटे यांना मुद्दामहून दक्षिण मुंबईत तातडीने करकरे यांच्या बरोबर राहण्यासाठी बोलावून घेण्यात आलं. साळस्करांना त्या दोघांच्या मदतीला पाठवलंय असं दाखवण्यात आलं. तिघंही एकाच जीप मधून सीएसटी कडे जात असताना मध्येच कंट्रोलरूमकडून अतिरेकी कामा हॉस्पीटलकडे पळाल्याची आणि तिथे गोळीबारात एक पोलीस इन्स्पेक्टर जखमी झाल्याची माहीती दिली जाते. पण अतिरेकी नक्की कुठे आहेत याची माहीती नंतर या तिघांपासून पद्धतशीरपणे लपवली जाते. हे तिघेही नेमके अतिरेकी ज्या गल्लीत मुक्त संचार करत होते त्याच गल्लीत जातात. (काही स्थानीक नागरीकांनी अतिरेकी कामा हॉस्पीटलच्या मागच्या गल्लीत फिरत असल्याची सूचना हे तिघे अधिकारी तिथे पोहोचण्याआधी पोलीस कंट्रोलरूमला दिली असल्याचे पुरावे आहेत.) तिथेच या तिघांवर अतिरेकी हल्ला होतो आणि त्यात तिघेही जबर जखमी होतात. हे सगळं एका पोलीस चौकीपासून अवघ्या काही मिनीटांच्या अंतरावर घडलेलं आहे. त्याचवेळी एक पोलीस पेट्रोलींगची व्हॅन तिथून भरधाव वेगाने गेल्याचं प्रत्यक्ष दर्शी नागरीकांनी आपल्या साक्षीत नमूद केलं आहे. तसेच त्या हल्ल्यात जीवंत वाचलेले एकमेव पोलीस शिपाई त्यांच्या साक्षीतूनही हे सिद्ध झालेलं आहे. त्या पोलीस पेट्रोलींग व्हॉनला अतिरेक्यांच्या गोळीबाराचा आवाज सुद्धा आला नाही आणि गणवेषात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले अधिकारीही दिसले नाहीत. खूप मोठं आश्चर्य आहे. का ती व्हॅन या तीनही अधिकार्‍यांना खरंच गोळ्या लागल्या आहेत की नाहीत याची खात्री करण्यासाठी आली होती? हल्ल्यानंतर तब्बल चाळीस मिनीटे ह्या जबर जखमी अधिकार्‍यांना अतिशय तत्त्पर अशा मुंबई पोलीस द्लाकडून (??) मदत मिळत नाही. साळस्कर तर हॉस्पीटल मध्ये जाईपर्यंत जीवंत होते. हे असं का घडलं याचा कुणालाही विचार करावासा वाटत नाही. इथे हिंदू अतिरेकी येतातच कुठे? मग आता करकरे यांच्या शहीद होण्याचा तपास हिंदू अतिरेक्यांनी मारलं या अंगाने करण्यात काय मतलब आहे? राकेश मारीयांनी पोलीस कंट्रोलरूम मध्ये बसून करकरे, कामटे आणि साळस्कर यांच्यावरील प्राणघातक हल्ला कंट्रोल केला असं म्हंटलं तर त्यात काय चुकीचं आहे? २६/११ च्या हल्ल्याची, तो आटोक्यात आणण्यात उशीर लागण्याची जबाबदारी राकेश मारीया यांचीही तेवढीच आहे जेवढी तत्कालीन गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची होती. यांपैकी फक्त दोघांनी राजीनामे दिले ते सुद्धा तोंडदेखल्या सारखे. नंतर त्यांचं अधिक वरच्या जबाबदारीत पुनर्वसन झालं तो भाग निराळा. राकेश मारीयांना तर चक्क बढती देण्यात आली. हे सगळं सोयीस्कररित्या कसं दडपलं जातं. काय चालू आहे हे? आणि ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रप्रेमा विषयी कोणीही शंका घेण्याची शक्यताच नाही कारण त्या संघटनेमध्ये काही मूलतत्त्ववाद असेल पण राष्ट्रप्रेम हा त्या संघटनेचा मूलभाव आहे. अशा रास्वसंघालाच राष्ट्रद्रोही ठरवून आपल्या विरोधातील, भ्रष्टाचाराच्या रस्त्यातील मोठा अडधळा दूर करण्यासाठी पाकीस्तानी अतिरेक्यांच्या मदतीने कॉंग्रेसनेच हे सगळं भलं मोठं षडयंत्र रचलं आहे. म्हणूनच राहूल गांधी थेट अमेरिकेतील अधिकार्‍यांना असं सांगू शकतात की भारताला अल-कायदा आणि लष्करे तैयब्बाच्या अतिरेक्यांपासून धोका नसून हिंदू मूलतत्त्ववादी संघटनांपासून धोका आहे. अगदी गेल्या काही वर्षांपर्यंत भारता बाहेरच आपलं वास्तव्य ठेवलेल्या या महामूर्खाला भारतीय समाज, संस्कृती आणि राजकारण याची किती समज आहे याचे पुरावे त्याने वेळोवेळी केलेल्या विविध वक्तव्यांवरून सिद्ध होतेच. त्या महामूर्खामुळेच कॉंग्रेसच्या या कटाचे पितळ उघडे पडले ते विकी लिक्सच्या भांडा फोड मुळेच. २६/११च्या महत्त्वाच्या मुद्द्यापासून रोजची जगण्याची लढाई लढण्यात व्यस्त सामान्य जनतेचं लक्ष हटवण्यासाठी त्यासगळ्या प्रकरणातच पूर्णपणे गोंधळ सदृष्य परिस्थीती निर्माण केली जात आहे. म्हणजे मग नक्की कोणावर विश्वास ठेवावा याचा गोंधळ सामान्य माणसांमध्ये चालू होतो आणि ते त्यांचं लक्ष आपल्या दैनंदिन जीवनातील कामाकडे वळवतात. यामुळेच यालोकांचं फावत चाललं आहे. पण यामुळेच ते खर्‍या देशद्रोही आणि देशविघातक शक्तींना मदत करत आहेत. राहूल गांधी म्हणतात ते खरं आहे, कॉंग्रेस आणि अल-कायदा, लष्करेतैयब्बा यांच्यात करार नक्कीच झाला असेल. कॉंग्रेसने भारत देशातील देशप्रेमी लोकांना देशद्रोही ठरवायचे आणि लष्करे तैयब्बाने मग कॉंग्रेसवाले सांगतील तोपर्यंत हल्ला करायचा नाही. त्याचप्रमाणे कॉंग्रेसने काश्मीरमधील लष्कर काढून घेऊन काश्मीर भारतापासून वेगळा करण्यास पाकीस्तानला मदत करायची. सध्या हेच तर चालू आहे.......नीट बघीतले तर सगळं स्पष्ट आहे.

12 comments:

  1. अल ताइ...दिग्गी राजाचं डोक फ़िरलय...काश्मीर प्रश्नाबाबत म्हणशील तर कालच लष्करप्रमुखांनी सरकारला सणसणीत चपराक दिली आहे.त्यांनी काश्मीर मधुन लष्कर काढुन घ्यायला विरोध केला आहे...तु मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुशंगाने विचार केला तर हे अस पण होऊ शकत किंब बहुना हेच चालु असेल याची शक्यता नाकारता येउ शकत नाही.

    ReplyDelete
  2. >>दिग्गी राजाचं डोक फ़िरलय...

    +१ व तसेच काहीतरी कारण काढून जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा हा क्रॊग्रेसचा रडीचा डाव आहे व हे पहिल्यांदा करत नाही आहे, या आधी ही अनेकवेळा हीच ट्रिक वापरली आहे.

    तुमच्या लेखाशी १००% सहमत आहे.

    ReplyDelete
  3. ताई,
    तुझ्या लेखाशी मी १००% सहमत आहे! सगळ्या गोष्टी उकरून पाहण्याची वेळ पाहता चटकन षड्यंत्र असल्याचं लक्षात येतं...
    कॉन्ग्रेसी राजकारण वर्षानुवर्षं हेच आहे..आणि आता ते नवनवे तळ गाठत आहे! :-|

    ReplyDelete
  4. बाबा +१. उद्या कसाब हा मारेकरी नाहीच मुळी हेही म्हणायला कमी करणार नाहीत. :(

    ReplyDelete
  5. त्यांचा तोच तर प्रयत्न चालू होता. पकडला गेला त्यानंतर कसाब सारखं मला मारून टाका असं म्हणत होता. नंतर त्याने पोलीसांना त्याचा खरा जबाब दिला. (त्यावेळी बाकीचे नऊ अतिरेकी आणि कसाब यांना कोणीच वाली नव्हता) त्यावरूनतर कुबेर बोटीचं रहस्य उलगडलं. नंतर जेव्हा पाकीस्तान सरकारने कसाब आमचा नागरीक आहे असं जाहीरपणे मान्य केलं त्यानंतर कसाबने त्याचं स्टेटमेंट बदललं होतं. त्याचं आणि त्याच्या वकीलांचं म्हणणं होतं की कसाबला मुंबई हल्ल्याच्या आधीच पाच दिवस मासेमारी करत हद्दीत आला म्हणून पकडलं आणि नंतर मुंबईवर हल्ला होईपर्यंत मुंबई पोलीसांनी त्याला आपल्या कस्टडीत ठेवलं होतं. जेव्हा मुंबईवर हल्ला करणारे अतिरेकी मारले गेले त्यावेळी कसाबला पकडला गेलेला अतिरेकी म्हणून पुढे केला. हे सगळं षडयंत्र किती खोलवर आहे याची कल्पना येईल.

    ReplyDelete
  6. http://blog.sureshchiplunkar.com/2011/01/hindu-terror-cbi-and-nia-india-lashkar.html?utm_source=feedburner&utm_medium=feed&utm_campaign=Feed:+sureshChiplunkar+(%3F%3F%3F%3F%3F%3F+%3F%3F+%3F%3F%3F%3F%3F+%3F%3F%3F%3F%3F%3F%3F%3F+(Suresh+Chiplunkar))
    ताई वेळ मिळाल्यास या ब्लॉग वर एक नजर मार...काँग्रेसच्या घाणेरड्या राजकारणाचा पुराव्यानिशी केलेला पडदाफाश आहे

    ReplyDelete
  7. नमस्कार,
    आपण लिंक दिल्याप्रमाणे लेख वाचला. तुम्ही तर २०११ सालीच हे लिहिले आहे, मी काल आलेल्या पुस्तकावर आधारित लिहिले आहे आणि या सर्वावरून हे स्पष्ट होते की जनता दुधखुळी नाही. तिला कुठे पाणी मुरते आहे हे समजते.
    लेख छान आणि तथ्याधारित झाला आहे. पहिल्यांदाच वाचला आपला ब्लॉग. छान आहे. :)

    ReplyDelete
  8. विक्रमजी शातापावालीवर स्वागत आणि धन्यवाद. जनता दुधखुळी नाही हे तितकेच खरे असले तरी सगळं माहीत असूनही आपण काहीही करू शकत नाही (कारणं काहीही असतील) याची खंत वाटते. आपला देश विकायला काढलाय या लोकांनी.

    ReplyDelete
  9. अप्रतिम लेख !
    सारे फार गंभीर आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद वरदराज आणि शातापावालीवर स्वागत. सत्तेच्या लालसेपोटी खेळलेले राजकारण फारच घाणेरडे असते……

      Delete
  10. Mastak Ekdam Badhir zale ahe ...evdhya nich vrutti che lok apan aplya deshyat nivdun deto ahot....Dusara mudda asa Ki R.S.S. che deshprem khare ahe tar Evdha Motha BJP sarkha virodhi paksh astana te ya viruddha kahi halchal kartana disat nahit..ka Congress ne tyannahi "manage" kele ahe?

    ReplyDelete
    Replies
    1. RSS kaahi directly rajkaranat naahiye. Tyancha kaam samajat agadi ground level la chalu aahe. Je lok IB aani CBI yancha dekhil ekmekanchya virodhat vapar karu shakatat tyanchya drushtine RSS sarakhi deshabhaktanchi sanghatana kis zad kee patti? RSS madhe gund aani bhrshtachari lok naahit tyamule RSS valyana manage karanyacha prashnach yet naahi.

      Delete