आडीच वर्षांपूर्वी मी मुंबई मध्ये नोकरी साठी गेले आणि एका वर्षाच्या आंत (साधारण १० महिन्यांनी) मला बंगलोर येथे संशोधनाची संधी मिळाली. मुंबई सारख्या ठिकाणी जागा मिळणं तसं मुश्किलच. पण मला पाच महिन्यांनी (एक महिना पेईंग गेस्ट, एक महिना एका नातेवाईकांकडे, तीन महिने दुसरया नातेवाईकांकडे) एक जागा मिळाली. या सगळ्या काळात माझ्या office मधील सहकार्यांनी माझी सगळी धावपळ बघीतली होती. (म्हणजे सुरुवातीला गोरेगाव ते सांताक्रुझ -अंधेरी........प्रचंड गर्दीत आणि लोकल मध्ये लटकून, नंतर, पनवेल ते अंधेरी......दोन्ही शेवटची स्थानके म्हणून बसून प्रवास......पण जाणे-येणे मिळून तीन तास, सायन ते दादर-सांताक्रुझ-जुहु जाणे-येणे मिळून दोन तास, शेवटची जागा मुलुंड मध्ये..........म्हणजे दोन लोकल्स बदलणे......आणि हे सगळं office hours मध्ये.) माझी तर हालतच झाली होती जरी हा सगळा प्रवास पहिल्या वर्गाच्या डब्यांतून होत असला तरी. रोज परतीच्या प्रवासात परमेश्वराची प्रार्थना करत असे या सगळ्यांतून सुटका व्हावी आणि जरा कमी धावपळीच्या ठिकाणी नोकरी मिळावी. दहाव्या महिन्यांत परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली. माझ्या बंगलोरच्या संधी विषयी आणि शिफ्टिंग करण्या संबंधी सांगितल्यावर एका सहकारयाने मला एक काळजीने प्रश्न विचारला........settle कधी होणार?? मी माझ्याच भूतकाळात डोकावले...........खरंच तळपायावर चक्रं असल्या सारखं किंवा पायाला भिंगरी लावल्या सारखी मी शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने देशभर आणि परदेशात हिंडले. तरी लोकमान्य अशा व्याख्येत मी settled या प्रकारात मोडत नव्हते आणि आता सुध्धा मी त्या अर्थी settled नाही. (settled ची लोकमान्य व्याख्या म्हणजे: कायम स्वरूपाची नोकरी, कायम स्वरूपी घर इ.) पण मला तर त्यात काहिच विचीत्रं वाटत नाही. माझ्या मते settled असणे ही एक मानसिक अवस्था आहे शारिरीक किंवा भौतिक ही नाही.
या जगात सगळंच क्षणोक्षणी बदलत असतं. अगदि आपल्या शरिरातील पेशीसुधा बदलत असतात. जे आपण काही क्षणांपूर्वी असतो ते आपण काही क्षणांनंतर नसतो. हे सगळं इतकं सूक्ष्मरित्या चालू असतं की आपल्याला त्याची जाणीवसुधा होत नाही. वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा............. कायमस्वरूपी असं काहिच नाही. आपल्याला त्याची जाणीव नसते इतकंच. सगळ्याच जड वस्तुंमध्ये हे जडत्व (inertia) असते. सहजासहजी आपल्या स्थितीमधील बदल कोणीच स्विकारत नाही. म्हणून मानसिक त्रास होतो. जरा बदल झाला तरी बरयाच जणांना तो आवडत नाही. मग सर्व तक्रारी (मुख्यतः शारिरीक) चालू होतात. पण हेच बदल जर मानसिक द्दृष्ट्या स्विकारले तर मन स्थिर (settle) होतं. हे काही खूप अवघड आणि आध्यात्मिक आहे असं मला तरी वाटत नाही. फक्त समजून घ्यायला पाहिजे. यामुळे आपण जीवनाचा अधिक आनंद घेवू शकतो असं मला वाटतं.
असं विंचवाचे बिरहाड पाठीवर सारखी स्थिती असली की सामानही कमी रहाते..........म्हणजे गरजे पुरते....स्वछता आणि आवराआवरी करायलाही सोपे. जास्त संग्रह नसल्याने एखादी गोष्ट काम झाल्यावर फेकून देतांना त्रास होत नाही.........किंवा गोंधळही होत नाही........की काय फेकायचे आणि काय नाही ते. आपल्याला काय वाटतं या विषयी??

या जगात सगळंच क्षणोक्षणी बदलत असतं. अगदि आपल्या शरिरातील पेशीसुधा बदलत असतात. जे आपण काही क्षणांपूर्वी असतो ते आपण काही क्षणांनंतर नसतो. हे सगळं इतकं सूक्ष्मरित्या चालू असतं की आपल्याला त्याची जाणीवसुधा होत नाही. वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा............. कायमस्वरूपी असं काहिच नाही. >>>>
ReplyDeleteसत्य वचन!
स्थिरता ही मनाचीच एक अवस्था असते हेही खरेच!!
आणि ज्याला हे उमगलाय, तो खरोखरीच धन्य नाही का?
म्हणून तुम्ही धन्य आहात.
मीही धन्य होण्याच्याच प्रयासात लीन आहे.
गोळेकाका,
ReplyDelete>>
स्थिरता ही मनाचीच एक अवस्था असते हेही खरेच!!
आणि ज्याला हे उमगलाय, तो खरोखरीच धन्य नाही का?
म्हणून तुम्ही धन्य आहात.
मीही धन्य होण्याच्याच प्रयासात लीन आहे. <<
हे मी नक्की कसं घेऊ तेच समजलं नाही. पण तुम्ही उपरोधाने नक्कीच बोलत नसणार असे समजते आणि सांगते की मला तसं वाटत नाही की मी धन्य आहे म्हणून कारण अजुन अनेक पावसाळे पहायचे आहेत. :-)
Suren: Change is the only Constant in this Universe...accept, adjust and accomodate or else perish! The world around us is changing so fast that to go behind, one just have to stay where he/she is!!
ReplyDeleteI really liked the originality in your writing, Aparna...thanks.
सुंदर...
ReplyDelete