![]() |
http://theonlinecitizen.com/2007/05/decriminalising-homosexuality-in-singapore/ |
त्याआधी हिजडा ही संकल्पना माहीती होती पण त्याविषयी इतकंच ज्ञान होतं की ते टाळ्या वाजवून पैसे मागतात आणि कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी जाता जात नाहीत. मुंबईसारख्या ठीकाणी हे लोक काही लहान बाळाशी संबंधीत समारंभ असेल तर बाळाला आशीर्वाद देण्यासाठी अचानक उपस्थीत होतात आणि आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने प्रचंड पैसे उकळतात. असो.
पुढे इंग्लंड मधे शिकत असताना या संकल्पनांविषयी अधिक माहीती मिळाली. म्हणजे तिथे दोन मुली किंवा दोन मुलं हाताला धरून चालत असले म्हणजे त्यांना लेस्बियन कपल किंवा गे कपल म्हंटलं जायचं. त्यामुळे कोणाही मैत्रिणीचा हात धरायचा नाही हा धडा मिळालेला होता.
त्याच दरम्यान दीपा मेहताचा "फायर" चित्रपट पाहण्यात आला. त्यातील सीता आणि राधा अशा दोन सेन्सीटीव्ह नावांमुळे (ती भारतीय संस्कृतीचा अभिमान असणार्यांच्या भावना मुद्दाम दुखावण्यासाठीच अधिक असे वाटते) तो चित्रपट वादग्रस्त ठरला. त्यात एका पंजाबी घरातील दोन सख्या जावा लेस्बियन असलेल्या/बनलेल्या दाखवल्या आहेत. हा चित्रपट पाहील्यावर एक गोष्ट लक्षात आली की सीता आणि राधा ही नावं न घेता सुद्धा दीपा मेहता यांना हा सामाजिक प्रश्न दाखवता आला असता कारण स्टोरीलाईन, अॅक्टींग खूप प्रभावी आहे. मोठीचा नवरा कायम कामात असल्यामुळे तो तिला वेळ देत नाही आनि मूलही होऊ देत नाही. खरं तर त्याला मेडीकल प्रॉब्लेम असतो. याची त्या माणसाला पूर्ण कल्पनाही असते. फक्त ते छातीठोकपणे अॅक्सेप्ट करण्याची ताकद नसते. त्यामुळे संयुक्त कुटुंबात मोठ्या सुनेवरच ठपका ठेवला जातो. दर्म्यान धाकट्या मुलाचं लग्नं होतं. लग्न झाल्या दिवसापासून धाकटा मुलगा रात्री बाहेरच. त्याचे एका दुसर्या बाईशी संबंध असतात. धाकटीला लग्न होऊन सहा महिने होत आले तरी गुड न्युज नाही म्हणून बोल लावायला सुरूवात होते. खरं तर त्या घरात दोघींचीही मानसिक आणि शारीरीक घुसमट होत असते. त्याचाच परिणाम म्हणजे त्या एकमेकींना शारीरीक आनंद द्यायला सुरूवात करतात. संपूर्ण चित्रपट या भोवती गुंफलेला आहे.
त्याच काळात गेम थिअरी मधे इकॉनॉमीक्सचं नोबेल पारितोषिक मिळवणारा जॉन नॅश याची बायोग्राफी "ब्युटीफुल माईंड" वाचनात आली. चरीत्रामधे तो बायसेक्षुअल (दोन्ही लिंगांकडे आकर्षित होणारे, समलिंगी तसेच भिन्न लिंगी व्यक्तींशी शारीरीक संबंध ठेवणारे) असल्याच्या घटना लिहीलेल्या होत्या. जॉन नॅश तर लग्नानंतर सुद्धा एका गे-बीच वर पकडला गेला होता आणि रात्रभर लॉकअप मधे होता अशा घटना सांगीतल्या आहेत. फक्त हाच नाही तर अनेक गणितज्ज्ञ, शास्त्रज्ञ त्यंच्या तरूणपणात बायसेक्षुअल होते. त्यांच्यामधे ऑटीझम स्क्रीझोफेनिया यांसारख्या आजारांचा प्रदुर्भाव होता असंही वाचनात आलं.
त्यानंतर अनेक वेळा माझा या संकल्पनांशी वाचन, चित्रपट, चर्चा-गप्पा यांसारख्या माध्यमातून सामना झाला. अगदी गाडी सिग्नलला थांबवल्यावर हिजडे दिसल्यावर पूर्वी वाटत असलेली भिती कमी झालेली होती. पण त्या हिजड्यांच्या एका गोष्टीचं निरीक्षण लक्षात आलं आणि ते म्हणजे ते पुरूषांकडेच पैसे मागतात. स्त्रिया मुलींकडे मागतात कधी कधी पण दुर्लक्ष केलं तर निघून जातात. हेच पुरूषांनी दुर्लक्ष केलं तरी जात नाहीत आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून काहीतरी बडबड चालू करतात. त्या बडबडीला घाबरून की काय पण बरेचसे पुरूष हिजडा दिसला की खिशातून पैसे काढून लगेच देऊन टाकतात. कुणीतरी सांगीतलं की हिजडा बनवण्याचा एक विधी असतो. तो विधी झाला की तो माणूस हिजडा बनतो आणि त्या कम्युनीटी मधे जातो.
आपल्याकडे क्वचितच एखादं मूल मुलगा/मुलगी म्हणून जन्माला येतं पण त्यांचे अवयव आतल्याबाजूने त्या त्या लिंगाचे नसतात. त्यामुले त्यांची मोठं झाल्यावर खूप गोची होते. आजकाल डॉक्टर्स ऑपरेशन करून ते फिक्स करण्याचा प्रयत्न करतात पण निसर्गापुढे त्यांचंही फारसं चालत नाही.
गेली काही वर्षे समलिंगी संबंध हा पाश्चात्य देशांतील अतिशय सेन्सीटीव्ह विषय आहे. अनेक मोर्चे आणि संघर्षांनंतर आता तिथे समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता लाभलेली आहे. नुसते संबंधच नाहीत तर समलिंगी लग्नांना सुद्धा कायदेशीर परवानगी मिळालेली आहे. दोन वर्षांपूर्वी टोरंटो मधे गे-परेड पाहण्याचा योग आला. लक्षात आलं की हे लोक एकमेकांबरोबर खूपच आनंदी आहेत. आयुष्यात आनंदी रहाणं हे फार महत्त्वाचं आहे. माझ्या नवर्याचा एक मित्र गे आहे.गेल्यावेळेच्या कॅनडा ट्रीप मधे त्यालाही भेटले होते. त्या गे मित्राचा पूर्वीचा एक पार्टनर (बॉयफ्रेंड) भारतीय होता. त्या भारतीय मुलाचे आई-वडिल लग्न कर म्हणून त्याच्या मागे लागलेले आणि हा मुलगा लग्नाचा विषय टाळत होता. कॅनडात सेपरेट गे-पब्स आहेत. तिथे गे-लोक एकमेकांना भेटतात. चार विरंगुळ्याच्या गप्पा करतात.
मधे एका व्यक्तीने मला सांगीतलं की त्याला एका व्हाईट प्रोफेसरने (की जो भारतात काही कामा निमीत्त काही वर्षं रहात होता) सांगीतलं की त्याने इंजीनीअरींग कॉलेजमधल्या ९०% विद्यार्थ्यांबरोबर लैंगिक संबंध ठेवलेले होते. रोज एक नविन मुलगा यायचा. त्याच्या म्हणण्यानुसार भारतातील हॉस्टेलमधे राहणार्या मुलांच्या ९५% मुलं ही सुरूवातीला समलिंगी संबंध ठेवतात. त्याची कारणंही तशीच आहेत. मुलांना प्युबर्टी पिरीयड उशीरा चालू होत असला तरी त्यांचा सेक्स ड्राईव्ह खूप जास्त आसतो आणि त्यांची लैंगिकता ही शारीरीक जास्त असते. ह्या उलट मुलींची प्युबर्टी शाळेत असतानाच आलेली असते आणि त्यांचा सेक्स ड्राईव्ह हा तुलनेने कमी असतो. अपवाद सगळीकडेच असतात. मुलींची लैंगिकता ही जास्त इमोशनल असते. ज्याकाळात त्यांचा सेक्स ड्राईव्ह अॅक्टीव्हेट होतो त्याकाळात त्यांना आपल्या समाजात मुलींशी संबंध ठेवता येत नाहीत. (कारणं काहीही असोत) त्यामुळे ते एकमेकांमधे त्यांची लैंगिकता एक्सप्लोअर करतात. त्यातून पुढील आयुष्यात गंभीर परीणाम होत असतील किंवा नाही हे त्या त्या मुलाच्या सेन्सीटीव्हीटीवर अवलंबून आहे.
कालच अमिर खानच्या सत्यमेव जयते कार्यक्रमात लहान मुलांचे लैंगिक शोषण हा विषय दाखवला. त्यातील हरीश अय्यर हा एक व्हिक्टीम दाखवला आहे की ज्याच्यावर वयाच्या ७ व्या वर्षापासू्न ११ वर्षं म्हणजे १८ व्या वर्षांपर्यंत एका पुरूषा कडून बलात्काराला सामोरं जावं लागलं. आज वाचलं की हरीष एक गे म्हणून वावरतो. तसेच गे-हक्कांसाठी लढतो. आपल्या शरीराचं भान येण्यापूर्वीपासूनच जर एखाद्यावर अत्याचार झाला असेल आणि तो सुद्धा सतत ११ वर्षे (तो का थांबवता आला नाही किंवा तत्सम प्रश्न इथे तसे महत्त्वाचे नाहीयेत कारण चर्चेचा मुद्दाच वेगळा आहे) होत असेल तर यात आजीबात आश्चर्य नाही की ती व्यक्ती गे आहे. त्याच कार्यक्रमात एक गणेश नावाचा तरूणही दाखवला होता की जो स्वत:ला गे म्हणवतो की नाही ते समजले नाही पण त्याला एकूणच शारीरीक संबंध याचा तिटकारा आलेला आहे. अशी अजुनही अनेक आपल्या समोर प्रकाशात न आलेली अनेक उदाहरणं असतील (मुलं/मुली) की जे लहान असताना लैंगिक किंवा इतर अत्याचारांना सामोरे गेले आहेत आणि त्यांच्या आयुष्यात त्या घटना कुठे ना कुठे तरी कमी जास्तप्रमाणात प्रभाव टाकणार्या ठरलेल्या आहेत. अमिर खानने चाईल्ड अॅब्युझचे दिलेले सरकारी आकडे परीस्थीती फारच गंभीर असल्याचं द्योतक आहे. हे केवळ सरकारी आकडे आहेत. प्रत्यक्षात न नोंदवल्या गेलेल्या, न बोलल्या गेलेल्या अनेक केसेस असतील.
आपल्याकडे पूर्वी मुलीचं लग्नं तिच्या सातव्या वर्षी आणि मुलाचं लग्न तो १२-१३ वर्षांचा असताना करायचे ते अतिशय योग्य होतं. त्याचेही दुष्परीणाम बाहेर पडले म्हणून लग्नाचं वय वाढत गेलंय. आपल्याकडचे सामाजिक नियम चालीरीती या अनेक वर्षे मानवीस्वभावाचा अनुभव घेतल्याने बनलेल्या आहेत. वयाच्या २५, ३० वर्षापर्यंत व्हर्जीन रहाणं हे मुलगा किंवा मुलगी यांच्या दृष्टिकोनातून खरंच खूप अनैसर्गिक आहे. त्यातून मुलामुलींचा भावनिक कोंडमारा होत असतो. कदाचित हे अत्याचार करणारे लोक कोणत्यानाकोणत्या प्रकारे त्यांच्या लहानपणीच्या घटनांच्या परीणामातून भावनिक कोंडमार्याला सामोरे जात असावेत. त्याचीच अभिव्यक्ती लैंगिक शोषण करण्याच्या प्रवृत्तीत होत असावी असं वाटतं.
ढोबळ मनाने विचार करता अगदी नर आणि मादी यांचं प्रयोजन किंवा स्त्री आणि पुरूषष यांचं नैसर्गिकरित्या एकत्र येण्याचं कारण लक्षात घेतलं तर प्रजनन किंवा पुनरूत्पादन हेच आहे. प्रजनन हे फक्त दोन भिन्न लिंगातच होते. त्यामुळे हे नैसर्गिक आहे. समलैंगिकता ही नैसर्गिक की अनैसर्गिक हे सांगणं तितकं सोप्पं नाहीये. फायर मधलं उदाहरण घेतल तर तिथे त्या दोघींना त्यांचा स्त्री असण्याचा अधिकारच नाकारला जात होता. एकूणच परीस्थीती बिकट होती. त्या दबावाची वेगळ्या प्रकारे अभिव्यक्ती झाली. जॉन नॅश च्या उदाहरणात नेमकी परीस्थीती वेगळी होती. त्याचा प्रश्न हा प्रोफेशनल फ्रस्ट्रेशन मधून उद्भवलेला होता. सामान्यत: असं समजतात की मॅथमॅटीशीअन म्हणून करीअर, नविन शोध लावायचे असतील ते तुम्ही वयाच्या २५-२८ पर्यंतच करू शकता. त्यानंतर तुमची बुद्धी तितकीशी प्रभावी रहात नाही. त्यामुळे वयाच्या २८-३० व्या वर्षी या लोकांना फ्रस्ट्रेशन येतं. जॉन नॅशचंही तसंच झालेलं. त्याचा स्क्रीझोफेनीया सुद्धा त्यचाच परिपाक होता. अगदी हरीष अय्यर च्या बाबतीतही त्याच्यावर लहानवयात होत असलेला अत्याचार कारणीभूत आहे. अगदी हिजडे सुद्धा गे-या प्रकारात मोडतात. ते एकमेकांमधे शारीरीक संबंध ठेवतात. यासगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट स्प्ष्ट आहे की मेडीकली लिंगच वेगळं असणं किंवा आतील अवयवांमधे प्रॉब्लेम असणं हेच केवळ नैसर्गिक आहे. या व्यतीरीक्त लोक जे गे किंवा लेस्बीअन या कॅटेगरीत जातात ते तत्वत: नैसर्गिक नाही. पण, आपण लहानाचे मोठे होत असताना आजूबाजूला घडणार्या बर्या-वाईट घटनांचा प्रत्येक मूलाच्या सेन्सीटीव्हीटीच्या पातळीप्रमाणे कमी अधिक परिणाम होत असतात. काही वेळा मुलींच्या बाबतीत खूपच दबलेल्या असल्या की त्याचाही परिणाम नेमका उलट होतो. हे सगळे परीणाम इतके प्रभावी असतात की ते आपली मानसिक जडण्घडण बदलतात. मनाचा आणि शरीराचा अत्यंत जवळचा संबंध आहे. त्यामुले मनातील बदलांचे परीणाम हे शरीरावर नक्कीच दिसतात. त्यामुळे गे-लेस्बियन ह्या संकल्पना नैसर्गिक आहेत असे वाटायला लागते.
गे-लेस्बीयन हे नैसर्गिक (बाय डेफीनेशन) नसले तरी त्याला एखादं व्यंग म्हणूनपण हाताळू नये. खरं तर एकूणच सामाजिक परीस्थीतीचा, अशी लोकं लहानाची मोठी होत असताना सामोरे जात असलेल्या परीस्थीतीचा अभ्यास केल्यास चांगले. त्यातून आप्ल्याला आपल्याच समाजातील चालीरीती, एकूणच बदलती सामाजिक परीस्थीती यांचा यासगळ्यावर किती प्रखर परिणाम होतो ते समजेल. ही वाईट सामाजिक परिस्थीती बदलून लहान मुलांना अधिकाधिक चांगलं लहानपण कसं देता येईल याचीही दिशा मिळेल. सुधीर कक्कर म्हणून एक प्रसिद्ध लेखक आहेत. एकूणच संस्कृतींचा सायकोसोमॅटीक अंगाने विचार करून त्याविषयी अभ्यासपूर्ण लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या एका पुस्तकात मुला-मुलींच्या मानसिकतेवर आणि लैंगिकतेवर परिणामकरणार्या घटनांमधे महत्त्वाचा घटक म्हणजे टॉयलेट ट्रेनींगची पद्धत हा दिलेला आहे. एकूणच विषय हा वरवर विचार करण्याचा नाही. लैंगिकतेशी संबंधीत अनेक प्रश्न हे सामाजिक चालीरीती किंवा समाजची सद्य परीस्थीती, कौटुंबिक परिस्थीती यांच्याशीच सांगड घालणारे अधिक असतात. त्यामुळे दिवसेंदिवस भयानक स्वरूप धारण करणार्या या प्रश्नांचा, त्यांच्या सखोल परीणामांचा आपल्या देशाच्या, संस्कृतीच्या तुलनेत व्यव्स्थीत अभ्यास व्हायला हवा असं मला वाटतं.